मुंबई : राज्यात आज 1800 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2182  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात सहा दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,16, 615 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11,370 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11370 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5194  इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 1630   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण (Coronavirus Cases Today in India )


मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220
 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत