मुंबई : राज्यात आज 1723 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1845 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,34, 878 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 11743 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11743 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5177  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2449  सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 9520 नवीन कोरोनाबाधितांची नोंद (Coronavirus Cases Today )


 देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 12 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 875 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात कोरोनाचे 87 हजार 311 सक्रिय रुग्ण आहेत. देशात सध्या दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.50 टक्के आहे. तर आठवड्याचा रुग्ण सकारात्मकता दर 2.80 आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.62 टक्के आहे.