मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 16  हजार 998  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. 
 
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 089  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (12), नंदूरबार (1),  धुळे (7), जालना (69), परभणी (47), हिंगोली (19), नांदेड (14),  अकोला (25), अमरावती (10),  वाशिम (05), अकोला (25), बुलढाणा (15), नागपूर (69), यवतमाळ (09),  वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3),   गडचिरोली (1५ ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 29 हजार 627 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,34,807व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,027  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 09 ,09, 998 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,26,566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5183 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1141दिवसांवर गेला आहे.


देशात गेल्या 24 तासात 15 हजार 981 नव्या रुग्णांची नोंद 


देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 15 हजार 981 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 166 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या आधी गुरुवारी कोरोनाच्या 16 हजार 862 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 379 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 लाख 51 हजार 980 इतकी झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या जरी कमी होत नसली तरी देशातील सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही दोन लाख एक हजार 632 इतकी झाली आहे तर त्याचे प्रमाण 0.60 टक्क्यावर आलं आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 97.23 कोटी इतके डोस देण्यात आले आहेत.