मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात 207 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील काही दिवसातील रूग्ण संख्या
8 जानेवारी - 41, 134 रूग्ण
7 जानेवारी - 40, 925 रूग्ण
6 जानेवारी - 36,265 रूग्ण
5 जानेवारी - 26, 538 रूग्ण
4 जानेवारी - 18, 466 रूग्ण
3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण
राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 72 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 05 , 45, 105 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 19,474 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
मुंबईत आज 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देताय? मग आधी या गोष्टी तपासा; BMCकडून टोल फ्री नंबरही जारी
- मुंबई महानगरात प्रत्येक महापालिकेची वेगळी नियमावली, नागरिक संभ्रमात