मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज तब्बल  3 हजार 900 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1309  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने तीन हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात आज  85 ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात  आज   85  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 252 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 99 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


मागील चार दिवसातील रूग्ण संख्या 


28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर –  1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर –  1485 रूग्ण


राज्यात आज 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 6 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे.   सध्या राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 87 , 68, 760 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत 2510 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


मुंबई महानगपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये 2510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत सात लाख 48 हजार 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा