मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1,078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 095  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 53  हजार 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. 
 
राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3204 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (1), जालना (20), बीड (62),  लातूर(87),  परभणी (37), हिंगोली (20), नांदेड (23),  अकोला (16), अमरावती (17),  वाशिम (02), अकोला (17), बुलढाणा (07), नागपूर (67), यवतमाळ (05), वर्धा (7), भंडारा (2), गोंदिया (2),  चंद्रपूर (18) गडचिरोली (3) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 15 हजार 485  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,91,497 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 919  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 28 , 43, 792 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


देशात 24 तासांत 443 रुग्णांचा मृत्यू


 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 10,423 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण  4,58,880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसच्या (Corona Cases Update) सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन सक्रिय रुग्णसंख्या 1.53 लाखांवर पोहोचली असून हा आकडा जवळपास 250 दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांचा आकडा आहे. देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत सातत्यानं घट होताना दिसून येत आहे. अशातच मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 3,36,83,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.