मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 893 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  1040  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 89 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.  महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे


राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6286  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 170  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 63 , 88, 902 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 250 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


 मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत 250 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. याच कालावधीत मुंबईत 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 863 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2915 दिवस झालाय. 


 देशात मागील 24 तासांत 8439 कोरोनाबाधित, तर 195 जणांचा मृत्यू


 देशात मागील 24 तासांमध्ये 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822  इतकी झाली आहे. देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या मागील 555 दिवसांमधील कमी संख्या आहे. मागील 24 तासांत 195 बाधितांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी कोरोनाबाधितांबाबतची नवीन आकडेवारी प्रसिद्ध केली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 4,73,952 इतकी झाली आहे. देशात मागील 12 दिवसांपासून दररोज नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी झाली आहे. मागील 164 दिवसांपासून 50 हजारांपेक्षा कमी प्रकरणे समोर येत आहेत. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :