Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येत वाढ होत आहे. काहीसा कमी झालेला कोरोनाचा आलेख पुन्हा वर चढू लागला आहे. त्यात ओमायक्रॉन (Omicron) या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटने आता हात-पाय पसरल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. राज्यात सोमवारी (27 डिसेंबर) 26 नवे ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. ज्यामुळे एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 167 वर गेली आहे. राज्यात सोमवारी 1 हजार 426 कोरोनाबाधित आढळले असून 21 जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

 

राज्यात कुठे आणि किती ओमायक्रॉन रुग्ण 

 

सोमवारी समोर आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण 11 ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यात (पनवेल पालिका) 5 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. तसंच ठाणे पालिका भागात 4 आणि नांदेडमध्ये 2 तर नागपूर, पालघर, भिवंडी निमामपूर आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी 1 ओमायक्रॉनबाधित आढळला आहे. नव्याने आढळलेल्या या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे.

 

नव्या रुग्णांची प्रकृती स्थिर

 

राज्यात सोमवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 0 ते 18 वर्षांखालील रुग्ण 4, 60 वर्षांवरील रुग्ण 2 असून इतर रुग्ण 18 ते 60 वर्ष वयांतील आहेत. यामध्ये 14 पुरुष आणि 12 स्त्रियांचा समावेश आहे. नव्या रुग्णांतील 21 जणांना कोणतीही लक्षणं नसून 5 रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. 

 

संबंधित बातम्या : 





LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha