मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारं कोरोनाचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊनची छाया गडद होताना दिसत आहे. 


राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात राज्यात एकूण 21,63,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण (Recovery Rate) 91.26 टक्के इतकं झालं आहे. तर आज राज्यात 23,179 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 84 कोरोना बाधित रुग्णाच्या मतृयांचूी नोंद झालीय. सध्या राज्यातील मत्यूदर 2.24% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,78,35,495 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 23,70,507 (13.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण 1,52,760 अॅक्टिव रुग्ण आहेत.


देशात कोरोनाची दुसरी लाट?
देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


पाच राज्यांमध्ये 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात  15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये  1,054  नवीन रुग्ण आढळले आहेत.