मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीनंतर केंद्राकडून यासाठी मान्यता देण्यात आली. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही केंद्राचे आभार मानत राज्यातील लसीकरणाच्या नव्या टप्प्याच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल उचललं.
एकिकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत असतानाच आता लसीकरण प्रक्रियेला मिळणारा वेग कोरोना नियंत्रणात आणण्यास हातभार लावतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनं वारंवार काही निर्देश देऊनही अनेक ठिकाणी नागरिकांचा बेजबाबदारपणा हा संसर्ग आणखी वेगानं पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्यामुळं अनेक उपाययोजनांनंतरही रुग्णसंख्यावाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
Coronavirus Guidelines | कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत, मंगळवारी दिवसभरात हाती आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा सर्वांसमोर आणला. 'राज्यात आज 28,699 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2247495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 230641 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे', असं त्यांनी ट्विट करत सांगितलं.
मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवार आणि मंगळवारी नव्यानं सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा काही अंशी कमी झाला. पण, तरीही हे संकट काही टळलं नाही याकडेच लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे.