Maharashtra Corona Cases : राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात आज 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात आज दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 86 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 






लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी - आरोग्य मंत्री राजेश टोपे


राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  आज अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.