मुंबई : राज्यात आज 3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे.
राज्यात आज 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (11), नंदूरबार (2), धुळे (1), जालना (40), परभणी (55), हिंगोली (18), नांदेड (24), अकोला (30), वाशिम (01), यवतमाळ (04), वर्धा (3), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (52), गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यातील 46 महानगरपालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. धुळे, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,63,61,089 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,07,930 (11.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,356 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 514 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 514 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4602 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1277 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 37 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.