मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज  256 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 315 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 


राज्यात  315  रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 


राज्यात सोमवारी  256 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 315 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात  दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,67, 629 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.13 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 3641 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 3641 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 717 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 418 सक्रिय रुग्ण आहेत.


 देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांची नोंद  (India Corona Update)


देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2.51 टक्के आहे. आधीच्या दिवशी म्हणजे शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. म्हणजे एका दिवसात 648 रुग्णांची घट झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कारण कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सणांवरचे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून मुक्त होत उत्साहात सण साजरे केले जात आहेत.