मुंबई :   राज्यात आज 2015 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1916  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. 


सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज  सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,71,507 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. 


ओमायक्रॉनच्या सब-व्हेरियंट्समध्ये वाढ  


महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron च्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे.  राज्यात  बी ए. 4 आणि बी ए. 5 व्हेरीयंटचे 30 रुग्ण तर बी ए.2.75  चे 18 रुग्ण आढळले आहेत. त्यात पुण्यातील 101, मुंबईतील 51, ठाण्यात 16, नागपूर, पालघरमधील 4 आणि कोल्हापूरमधील 2 जणांचा समावेश आहे.


राज्यात एकूण 14692 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 14692 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 5075  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1817   सक्रिय रुग्ण आहेत.


 कोरोनाबाधित आणि मृत्यूंच्या संख्येत किंचित घट


देशात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली असून कोरोनाबळींची संख्यादेखील 50 टक्क्यांहून अधिक घटली आहे. शुक्रवारी देशात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद आणि 67 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 67 इतका होता. त्यामुळे देशात कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही घटल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 18,143 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 32 लाख 10 हजार 522 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 5 लाख 26 हजार 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.