हिंगोली : शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Sanotsh Bangar) यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.  बील दिल्या शिवाय मृतदेह दिला जाणार नाही असा पवित्रा हिंगोली मधील एका नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टरने घेतल्यावर आमदार संतोष बांगर हे त्या डॉक्टरवर चांगलेच भडकले. माणूस मेल्यावरही पैसे घेता का? असे म्हणत बांगर यांनी डॉक्टरचा चांगलाच समाचार घेतल्याचे या रेकॉर्डिंगमधून दिसून येत आहे. आमदार बांगर आणि संबंधित डॉक्टरमधील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. 


हिंगोलीमधील रूग्णालयात एका महिलेला दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना संबंधित महिलेचा मृत्यू झाला. परंतु, उपचाराचे पैसे भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही असा संबंधित रूग्णालयातील डॉक्टरांनी पवित्रा घेतला. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी आमदार संतोष बांगर यांना फोन करून पैसे भरल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचे डॉक्टर म्हणत असल्याची तक्रार केली. शिवाय महिलेला रूग्णालयात दाखल करताना पिवळ्या कुपनवर उपचार करण्यात येतील असे डॉक्टरांनी सांगितले होते आणि आता पैसे मागत आहेत, अशी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी बांगर यांच्याकडे केली. 


डॉक्टरांच्या या भूमिकेवर आमदार बांगर चांगलेच भडकल्याचे व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून पाहायला मिळत आहे. पेशंटचा जीव गेल्यानंतर देखील पैसे घेता का? एकही रूपया न घेता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्या, अशा सूचना संतोष बांगर यांनी संबंधित डॉक्टरला दिल्या. परंतु, पैसे भरावेच लागतील असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संतोष बांगर डॉक्टरांवर चांगलेच भडकले.  
   
पेशंट मेल्यानंतर त्या लोकांचे पैसे घेता का? लाज वाटायला पाहिजे, अशा कडक शब्दात बोलल्यानंतर संबंधित डॉक्टर मृतदेह सोडण्यास तयार झाल्याचे कॉल रेकॉर्डिंगवरून समजते. दरम्यान, आमदार बांगर आणि संबंधित डॉक्टरांमधील कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Shiv Sena: गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा; बंडखोर आमदार संतोष बांगर यांची चिथावणी