मुंबई : राज्यात आज 781 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1523 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात  चार कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,42, 981 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.05 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 9887 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 9887 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3691  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2338  सक्रिय रुग्ण आहेत.


देशात गेल्या 24 तासांत 7,946 नव्या रुग्णांची नोंद (Covid-19 in India)


 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या (Coronavirus Updates) 7,946 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी काल (बुधवार) पेक्षा जास्त आहे. बुधवारी देशात 7231 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या  (Corona Active Cases) आता 62,748 वर आली आहे. यापूर्वी बुधवारी, सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली होती. बुधवारी ही संख्या 64,667 वर पोहोचली होती. गेल्या 24 तासांत 9 हजार 828 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, डेली पॉजिटिविटी रेट 2.98 टक्क्यांवर पोहोचला आहे.