मुंबई : कोरोनाच्या कालच्या आकडेवाडीमुळे काहीशी चिंता वाढली होती. कारण राज्यात काल 3378 रुग्ण बरे झाले होते, तर 9336 रुग्णांची भर पडली होती. मात्र आज राज्यातील कोरोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. आज राज्यात 6740 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 हजार 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 61 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के आहे. 


राज्यात आज 51 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 827 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (57), हिंगोली (84), गोंदिया (88) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,960 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर 


धुळे, नंदुरबार, हिंगोली, भंडारा, नांदेड या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1234 रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईत आज 489 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 10 जणांचा मृत्यू


मुंबई गेल्या 24 तासात 489 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 645 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंतर 6 लाख 9 9 हजार 341 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 7947 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर आता 802 दिवसांवर गेला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


पुण्यात 150 नव्या रुग्णांनी नोंद


पुणे महापालिका क्षेत्रात आज 150 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 2679 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज पुण्यात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.