Maharashtra Politics नागपूर : भाजपला (BJP) सत्तेतुन हटवणे एवढच महाविकास आघाडीचे लक्ष आहे. आता कुठलंही डिस्कशन किंवा चर्चा होणार नाही. निकालानंतरच महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) त्या संदर्भात चर्चा करेल. सरकार बनवने एवढंच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निवडणुकीत कोणीच लहान भाऊ नाही किंवा मोठा भाऊ नाही. या निवडणुकीत अनेक छोट्या पार्टी आहे या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत. लोकसभेमध्ये ज्या प्रमाणेच भाजपला धक्का दिला तसाच धक्का आता विधानसभेलाही (Vidhan Sabha Election 2024) देणार. सोबतच भ्रष्टाचारी भाजपचं सरकार उलथून टाकणार. असा थेट इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी भाजपला दिला आहे. ते नागपूर (Nagpur News) येथे बोलत होते.


महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणे जनतेला अपेक्षित आहे


संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणे जनतेला अपेक्षित आहे. मात्र अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, त्या लवकर करत देखील नाही. वन नेशन वन इलेक्शनवर बोलणारे लोक हरियाणा, जम्मू-काश्मीर सोबत का असे वागतात? तेथे निवडणुका का घेत नाहीये. महाराष्ट्रात काय सुरू आहे. लवकरात लवकर निवडणुका घोषित झाल्या पाहिजे. जनता सत्ता परिवर्तन करून महाविकास आघाडीला समर्थन देईल. असा विश्वास ही रमेश चेन्नीथला यांनी बोलताना यावेळी व्यक्त केला आहे.  


इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसचा गड


महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात तीन दिवसांचा चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात सगळे पार्टीचे लोक ते ठरवतील. विदर्भ काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसच्या सोबत राहिलेला आहे. किंबहुना यावेळी सुद्धा मतदार मविआ सोबत राहतील. लोकसभेतही विदर्भाने सपोर्ट केला आहे. जागावाटपाच्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊ आणि जागावाटापासंदर्भात निर्णय घेऊ, अशी माहितीही ही रमेश चेन्नीथला यांनी बोलताना दिली.


नागपुरातील सहाही जागांवर काँग्रेस दावा


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार पूर्व नागपूर मतदारसंघात इच्छूक संगीता तलमले यांनी प्रचार सुरु केला आहे. नाना पटोले, रमेश चेनिथला यांच्या उपस्थितीत कालंच नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारीबाबत बैठक झाली होती. दरम्यान आज (सोमवार) पूर्व नागपूर मतदारसंघात इच्छूक संगीता तलमले यांची परिवर्तन प्रचार रॅली सुरू केली आहे. नाना पटोले यांनी नागपूरातील सहाही जागांवर दावा केला होता. सोबतच इच्छूक उमेदवारांनाही   काही सुचना केल्या होत्या. विशेष म्हणजे पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गट आणि पवार गटाचाही दावा आहे. असं असतानाही पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार इच्छूक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे नागपुरात मविआमध्ये पुढे नेमकं काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


हे ही वाचा