CM Eknath Shinde : अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. राम मंदिर हे स्वप्नवत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं असे शिंदे म्हणाले. राम जन्मभूमीत वेगळच वलय जाणवल्याचे शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही असे शिंदे म्हणाले. 


राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही 


श्री राम प्रभुच्या आशिर्वादाने आम्हाला पार्टीचे नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं अत्यंत चांगलं नियोजन केलं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आज रात्री शरयू नदीवर यात्रा होणार आहे. राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विकासाची अनेक कामं याठिकाणी होत आहेत. त्याबबदल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिराचे अतिशय वेगानं काम सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 


गेल्या आठ महिन्यात आमच्या सरकारनं चांगलं काम केलं


आज शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे, याचा लोकांना आनंद असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या आठ ते नऊ महिन्यात आमच्या सरकारनं चांगलं काम केल्याचे शिंदे म्हणाले. आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे. गरीब, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही. मी अयोध्येतून अवकाळीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  सत्तेसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. कालपासून लखनौ विमानतळापासून आमचं स्वागत केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. याठिकाणी सर्वत्र भगवं वादळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  


हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम करु 


दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची बैठक होती. मात्र, तरीसुद्धा रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी ते आले. दर्शन घेतल्यानंतर ते लगेच दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आनंदाचा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच माझी अयोध्या यात्रा आहे. महाराष्ट्रात आमच्या विचारधारेबरोबर आम्ही सरकार स्थापन केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकांनी हिंदुत्व बदनाम करण्याचे काम करत आहे. काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी बदनामी केली त्यांची आज काय स्थिती आहे असेही शिंदे म्हणाले. हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करु असेही शिंदे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


ऊर्जा, प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जाऊ, शिंदे-फडणवीस रामलल्ला चरणी लीन