मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा' मंजूर करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य केली गेली.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकणार आहे. या चौकशीची सुनावणी इन कॅमेरा घेता येणार आहे.

राज्यात लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी 2019 पासून राळेगणसिद्धी येथून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याबद्दला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले होते. पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 'लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा' मंजूर करण्यात आल्याने अण्णा हजारेंची मागणी मान्य केली गेली.