Buldana: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 चं काम सुरू असल्यानं खामगाव नांदुरा दरम्यान असलेल्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं लावलेल्या स्टोन क्रशर व डांबर प्लांटमुळं प्लांट वरून ये- जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्लांटमुळं नजीकच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यानं वाहनांचा रस्ता अडवला. त्यामुळं कंपनीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी 8 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यानं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आवारात मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.
शेतकाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, शेतीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवताडे हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्लांट वर या शेतकऱ्यांसह धडकले. स्वाभिमानी संघटना आंदोलन करण्याची माहिती मिळताच कंपनीचे प्लांट वरील अधिकारी व कर्मचारी प्लान्ट बंद करून निघून गेले होते. स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी प्लांट वरील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना बोलावून आणण्याचे सांगितलं. पण कुणीही प्लांटवर नसल्यानं कर्मचाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागलं.
कंपनीच नुकसान होतंय, पण या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे शेतकाऱ्यांच गहू, हरबरा, कांदा पिकांचं नुकसान होतंय त्याच काय? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण याबद्दल कंपनीकडून कुणीही बोलत नाहीये. हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. वेळोवेळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना ही बाब लेखी निदर्शनास आणून देऊनही काही फायदा होतं नसल्यानं लोकशाही मार्गानं न्याय मागायला गेले. परंतु, शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आले, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय.
यासंदर्भात पोलीस प्रशासनानंही कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर एबीपी माझानं कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर चे अधिकारी रवींद्र जैन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "दिवसभर आमची हॉटमिक्स असलेली 14 ते 15 वाहने अडविण्यात आल्यानं कंपनीचे जवळपास आठ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. तसेच आम्ही शेतकरी विरोधी नाहीत. शेतकऱ्याचं खरोखर नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर, आम्ही त्यांना नक्की मदत केली असते.
हे देखील वाचा-
- Sahyadri Devrai : सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला भीषण आग, दोन एकरवरील झाडाचं नुकसान
- अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव अण्णांनी केला मान्य...
- राष्ट्रवादीत वाढलं कलाकारांचं इनकमिंग; अभिनेत्री आसावरी जोशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha