Pune News Updates : 'जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले?' अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला आहे. पुण्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते पाटील कधीपासून भविष्य सांगू लागले. चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च रोजी राज्यातील महविकास आघाडी सरकार नक्की पडणार असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरच मंत्री छगन भुजबळ यांनी हा टोला लगावला आहे .
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता. त्यावर भुजबळ यांनी मुख्यमंत्री असेल धंदे करत नाहीत. पुणे महापालिकेत जे घडलं ते अपघातानं घडलं असं देखील भुजबळ यांनी सांगितलं आहे. देशात मोदी सरकार हे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय तसेच इडीचा वापर करत आहे असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
दहा मार्च नंतर महाविकास आघाडी सरकार जाणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. काल चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अशा प्रकारच्या दाव्याबाबत विचारले असता पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. महाविकास आघाडीतील मंत्री एकामागोमाग एक घोटाळ्यात अडकत असल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं.
मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मांजरी भागातील एका सभेत बोलताना दहा मार्चनंतर महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं म्हटलं होतं. मात्र सभेनंतर त्या वक्तव्याबद्दल विचारले असता कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दहा मार्चची तारीख दिल्याच चंद्रकांत पाटील यांनी म्हटल होतं. मात्र काल पुन्हा एकदा त्यांनी दहा मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार जाईल नमस्कार असं वक्तव्य केलं होतं.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा