: आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा (oath taking ceremony) संपन्न झाला. यामध्ये तिन्ही पक्षाच्या 39 नेत्यांनी शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. पंकजा मुंडे शपथ घेताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
आज नागपूरमध्ये राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी शपत घेतली. यामध्ये सर्व पक्षांच्या मिळून 39 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या सध्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न होत असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. मी ... ईश्वर साक्ष शपथ घेतो की, असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळाला आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25 . संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरतशेठ गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबीटकर
राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी
34. माधुरी मिसाळ
35. आशिष जैयस्वाल
36. पंकज भोयर
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis Cabinet Minister List : तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!