= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता ; सूत्रांची माहिती BJP : मुख्यमंत्री मराठा, उपमुख्यमंत्री ब्राह्मण, त्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल; संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा Maharashtra Cabinet Expansion : दारव्हा-दिग्रच मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जनसंपर्क कार्यालयात एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्या सारमर्थनार्थ घोषणा बाजी केली. जनसंपर्क कार्यालय आणि घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा करून बॅण्डच्या तालावर कार्यकर्यांनी ठेकाही धरला. संजय राठोड यांना एका प्रकरणांमध्ये आपलं वन मंत्रिपद गमावावं लागल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यात एकही मंत्रीपद नसल्यानं पालकमंत्री पद हे माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे होते. तर आता पुन्हा आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानं जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी त्यांची निश्चितच वर्णी लागल्यास जिल्ह्याचा विकास होईल. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांची कामं तातडीनं होईल, शिंदे सरकारमध्ये वंचित घटकाला आता न्याय मिळेल. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला विकास आता पूर्ण क्षमतेनं आणि जलद गतीनं होणार असल्याचाही विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष Maharashtra Cabinet Expansion : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष साजरा
खासदार सुजय विखे यांच्या संपर्क कार्यालया समोर एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष, तर आनंद साजरा करत जोरदार घोषणाबाजी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिंदे समर्थकांचा जल्लोष, दिपक केसरकर आणि उदय सामंत यांची शपथविधी झाल्यानंतर सिंधुदुर्गात जल्लोष Maharashtra Cabinet Expansion : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सुपुत्रांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडीत शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून उदय सामंत आणि दिपक केसरकर यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आनंद साजरा केला. जिल्ह्याच्या विकासात दोन्ही सुपुत्राच्या हातभार लागून जिल्हा विकसनशील होण्यासाठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : भर पावसात सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष Maharashtra Cabinet Expansion : सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी भर पावसात जोरदार जल्लोष केला. भरपावसात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून मागील युती सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा कार्यकर्त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. गेले अडीच वर्ष चंद्रपूर जिल्ह्याची विकास प्रक्रिया खंडित झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. आता पुन्हा मूलभूत विकासासह जिल्ह्यात रखडलेले मोठे विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. चंद्रपूर शहरातील पाच प्रमुख मंडळांमध्ये भाजपच्या वतीने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. चंद्रपूर जिल्ह्याला विकासप्रक्रियेत वेगाने पुढे नेण्यासाठी मुनगंटीवार यांचा समावेश लाभदायक होणार असल्याची भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदींकडून राज्याच्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : शपधविधीनंतर राधाकृष्ण विखेंच्या लोणी गावात जल्लोष Maharashtra Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शपथविधीचा पहिला मान मिळाला आणि विखे यांच्या लोणी गावात जल्लोष करण्यात आला. लोणी गावातील विठ्ठलराव विखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोषाला सुरवात झाली. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब शिंदे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते.
दरम्यान यावेळी राधाकृष्ण विखे याना काल पहिला फोन आला आणि आज मंत्रिपदाची शपथही प्रथम देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं. विखे यांचा आजपर्यंत अनुभव पाहुन महसूल खातं मिळालं पाहिजे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Supriya Sule on Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीमंडळात महिलांना स्थान नसणं हे धक्कादायक : सुप्रिया सुळे Supriya Sule on Maharashtra Cabinet Expansion : आज अखेर रखडलेला शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. यामध्ये एकूण 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 9 तर शिंदे गटाच्या 9 जणांना मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. तसेच हे खेदजनक असल्याचे सुळे यांनी म्हटलंय.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही Maharashtra Cabinet Expansion : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच... लवकरच... म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया.... Maharashtra Cabinet Expansion : "उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं", अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. या शपथविधी सोहळ्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : संजय राठोडांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी, चित्रा वाघ यांचा संताप, ट्वीट करत म्हणाल्या... Maharashtra Cabinet Expansion : पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चोहीकडून होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केलीय. राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसंच राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असून ही लढाई जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदावर उघड नाराजी व्यक्त केलीय..राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राठोड यांना पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिलीय. मात्र यावरुन आता वादाची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने पाळधीसह धरणगावात जल्लोष Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यानंतर आता या शिंदे सरकारमध्येही गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा त्यांच्या पाळधी या गावी तसेच धरणगावात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे जल्लोष करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेतून बंड फुकल्यानंतर वेगळा गट तयार झाला होता. शिंदे गट आणि भाजप युतीतील सरकारची स्थापना झाली होती. मात्र मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. अखेर प्रतीक्षेत असलेला मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांना शिंदे सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं धरणगाव पाळधी येथील त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्रीपद मिळाल्याचा फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, सर्व 18 मंत्र्यांनी घेतली शपथ, सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, लोढा हे भाजपचे मुंबई अध्यक्ष = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही Maharashtra Cabinet Expansion : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच... लवकरच... म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातून शंभूराज देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून अतुल सावे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातून दीपक केसरकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातून अब्दुल सत्तार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, ठाकरे सरकारमध्ये सत्तार राज्यमंत्री होते = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपकडून रविंद्र चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, फडणवीस सरकारमध्ये होते कॅबिनेट मंत्री = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातील तानाजी सावंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातील उदय सामंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून सुरेश खाडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातील संजय राठोड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, मागील सरकारमध्ये होते वन मंत्री, वादात सापडल्यानं दिला होता राजीनामा = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातील दादा भुसे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, मागील सरकारमध्ये होते कृषी मंत्री = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, मागील सरकारमध्येही होते कॅबिनेट मंत्री = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून विजयकुमार गावित यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही उपस्थिती, शिंदे गटातील महत्वाचे नेतेही उपस्थित = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sanjay Sirsat LIVE : मी नाराज नाही, कोणताही आमदार नाराज नाही, भविष्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार मजबूतपणे काम करेल, संजय सिरसाटांचं वक्तव्य Sanjay Sirsat LIVE : मी नाराज नाही, कोणताही आमदार नाराज नाही, भविष्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार मजबूतपणे काम करेल, संजय सिरसाटांचं वक्तव्य
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपली, शिंदे गटाचे सर्व आमदार सह्याद्री अतिथीगृहावर, काही क्षणात शपथविधी Maharashtra Cabinet Expansion Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपली, शिंदे गटाचे सर्व आमदार सह्याद्री अतिथीगृहावर, काही क्षणात शपथविधी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची फायनल यादी समोर शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
भाजपकडून मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : तासाभरात महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार, राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात पुढच्या तासाभरात महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. त्यासाठी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. भाजपची ९ जणांची यादी तयार झालीय. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या यादीला सह्याद्री अतिथीगृहामधील बैठकीत अंतिम स्वरुप दिलं जातंय. ठाकरे सरकारमधील अब्दुल सत्तार वगळता पाच मंत्र्यांचा समावेश निश्चित आहे. संजय राठोड यांचाही पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे. केसरकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त, सरकार कसं चालणार हे यावरुन दिसतंय : अशोक चव्हाण Maharashtra Cabinet Expansion : आज नऊ ऑगस्टला क्रांती दिनी तरी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. महिन्याभरापासून हा विस्तार प्रलंबित होता अखेर त्याला आज मुहूर्त मिळाला आहे. हे सरकार कसं चालणार हे यावरुन दिसत आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद आमचं असावं, असा आमच्या सर्व नेत्यांना वाटतं. त्यानुसार विचार केला जाईल. यात समन्वय नाही असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : ठरलं! 18 मंत्री शपथ घेणार, राजभवनातील सभागृहात 18 खुर्च्या लावल्या Maharashtra Cabinet Expansion Live : ठरलं! 18 मंत्री शपथ घेणार, राजभवनातील सभागृहात 18 खुर्च्या लावल्या
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिंदे गटातील 50 आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार MAharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाचे 50 आमदार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. आजच्या यादीवर काही आमदार खूश नाहीत. त्यामुळे शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आमदार संजय राठोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निघून गेले, माध्यमांशी बोलणं टाळलं आमदार संजय राठोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निघून गेले. माध्यमांशी बोलणं टाळलं. चेहऱ्यावर नाराजी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion LIVE : आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री शपथ घेणार, भाजपकडून नऊ तर शिंदे गटाकडून नऊ जणांचा शपथविधी : उदय सामंत Maharashtra Cabinet Expansion LIVE : आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री शपथ घेणार, भाजपकडून नऊ तर शिंदे गटाकडून नऊ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्री शपथ घेणार, उदय सामंतांची माहिती आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपचे 9 तर शिंदे गटाचे 9 जणांचा असा एकूण 18 जणांचा शपथविधी आज होणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपकडून आज नऊ मंत्री शपथ घेणार, 'ही' नावं निश्चित Maharashtra Cabinet Expansion LIVE : भाजपकडून आज फक्त नऊ मंत्री शपथ घेतील. नेमकं कोण शपथ घेणार याची उत्सुकता असताना भाजपने काही नावं निश्चित केली आहेत.
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा मुंबई
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काही आमदार दाखल Maharashtra Cabinet Expansion LIVE : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी काही आमदार दाखल झाले आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत पोहोचले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाकडून अंतिम यादीतील नावं आणि पुन्हा चर्चा सुरु असलेल्यांची नावं Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. यामध्ये शिंदे गटाकडून काही नावं अंतिम झाली आहेत तर काही नावांवर अद्याप चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मंत्र्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एकूण नऊ मंत्री शपथ घेणार आहेत. जुन्या सर्व मंत्र्यांना पुन्हा नव्याने संधी देण्यात येईल. या या नावांमुळे काही नवे चेहरे नाराज असल्याचं कळतं. पाहूया शिंदे गटाच्या अंतिम यादीतील नावं आणि अद्याप चर्चा सुरु असलेल्यांची नावं.
अंतिम यादी
उदय सामंत
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संभुराजे देसाई
संदीपन भुमरे
तानाजी सावंत
दीपक केसरकर
चर्चा सुरु असलेली नावं
अब्दुल सत्तार
संजय राठोड
भरत गोगावले
संजय शिरसाट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Cabinet Expansion Live : सह्याद्री अतिथीगृहावर 9 वाजता महत्वाची बैठक, बैठकीनंतर मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार Maharashtra Cabinet Expansion Live : सह्याद्री अतिथीगृहावर 9 वाजता महत्वाची बैठक, बैठकीनंतर मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ 1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरीश महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ 1) उदय सामंत (Uday Sawant)
2) दादा भुसे (Dada Bhuse)
3) संजय शिरसाट (Sanjay Sirsat)
4) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
5) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
6) भरत गोगावले (Bharat Gogawale)
7) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता आज मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपतील संभाव्य 9 जणांची नावं समोर येत आहे. पण त्यातही आज भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या महिला आमदार कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात एक महिला असणार आहे. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्या आहेत. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.