Maharashtra Cabinet Expansion:

  राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 37 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरलेला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात  मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 


विस्ताराबाबत प्रश्न आणि फडणवीसांचा अजित पवारांना टोला


महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हा प्रश्न ऐकून तुम्ही देखील कंटाळला असाल. मात्र तेच तेच उत्तर देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही कंटाळेले दिसत नाहीत. कारण लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं पठडीतलं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा दिलं आहे. तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करणाऱ्या अजित पवारांना देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यामुळं त्यांना हे आठवावं लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला. विस्तार लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा. अधिकार सचिवांना द्यायचे तर मग तुम्ही दोघे घरी बसा, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. 


पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता 

पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं यात प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळणार नाही तरी प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. शिंदे गटातून पहिल्या टप्प्यात औरंगाबादचे तब्बल तीन मंत्री होत आहेत, याचा पेचही आहे. 


भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)


सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)


गिरीश महाजन (Girish Mahajan)


राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)


बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)


प्रवीण दरेकर (Pravin Darekar)


रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)


नितेश राणे (Nitesh Rane) 


शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?


गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)


उदय सामंत (uday Samat)


दादा भुसे (Dada Bhuse)


शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)


अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  


दीपक केसरकर (Deepak Kesarkar)


संदीपान भुमरे (Sandipan Bhumare)


संजय शिरसाट (Sanjay Shirsat)