Cabinet Expansion: राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटपाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण हा विस्तार प्रत्यक्षात कधी उतरणार याची वाट सगळेच पाहत असल्याचं चित्र सध्या आहे. पण तरीही हा प्रश्न अजून काही मार्गी लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात तिघांचं सरकार आलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा तेढ आणखीच वाढला असल्याचं आता म्हटलं जात आहे. 


आता  आमदार आणि मंत्र्यावरचा दबाव वाढत चालला असून प्रत्येक आमदार आपल्या नेत्याच्या अक्षरशः मागे लागल्याचं सांगितलं जात आहे. याच मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका देखील होत आहेत. पण यावर तोगडा मात्र अजूनही निघाला नाही. सोमवारी मध्यरात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या तिघांमध्ये या मुद्यावर चर्चा झाली. पण यातही काही तोडगा निघाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीनंतर त्यांच्या मागण्यादेखील वाढल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. 


खातेवाटपासाठी तारेवरची कसरत ?


महायुतीला मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप करताना तारेवारची कसरत करावी लागत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगल्या खात्यांची मागणी होत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. महायुतीमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुभवी आणि जेष्ठ मंत्रीपदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे मंत्रीपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री अजित पवार मागणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


सोमवारी वर्षा बंगल्यावर  झालेल्या बैठकीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीमध्ये  भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कशा पद्धतीने खाते वाटप करायचे याचा फॉर्मुला देखील ठरला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार अजित पवार आता त्यांच्या सहकारी मंत्र्यांची समजूत काढत असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आग्रही मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात देखील सोमवारच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी 2 जुलै रोजी मंत्रीपदाची  शपथ घेतली पण अद्यापही या सर्वांचे खातेवाटप झाले नाही. पण या नऊ जणांनी जरी मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अजूनही काही मंत्रिपदं शिल्लक आहेत. त्यामुळे जोपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत खातेवाटप होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप होणार असल्याचं शक्यता आहे. 


राष्ट्रवादीकडून कोणत्या खात्यासाठी आग्रह?


राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून  सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 


हे ही वाचा : 


Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी अन् लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट