राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणावेळीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजीही विरोधकांकडून करण्यात आली.
18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यासोबतच या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सादर केली जातील. तर विरोधकांनीही नोटाबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, ईव्हीएम घोळावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे
- देशभरात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली.
- परकीय गुंतवणुकीत गेल्या 6 महिन्यात 50 टक्के वाढ
- जलयुक्त शिवारमुळे 11 हजार गावं दुष्काळमुक्त झाली.
- कायदा सुव्यवस्थेसाठी मुंबई, पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले.
- मागेल त्याला शेततळं, ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली.