अवकाळीमुळं पिकांचं मोठं नुकसान, अजूनही पंचनामे नाहीत
सरकार सातत्यानं सांगत आहे की मागच्या सरकारने हे केलं आणि आता आमळी पावसाने आणि गारपिटीमुळं च्या सरकारनं हे केलं. मागच्या सरकारमधील निम्मे मंत्री इकडे आहेत. त्यावेळी तुम्ही म्हणता त्यांनी चुका केल्या मग तुम्ही देखील त्याला जबाबदार असल्याचे खडसे म्हणाले. मागील 15 दिवसांपासून राज्यात अवकामोठ्या प्रमाणात झालं आहे. अजुन मंत्री बांधावर गेले नाहीत. मग मंत्री आहेत तर कुठं? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. मी गुहाटीला चौकशी केली तर तिथं नाहीत असं कळलं मग गुजरातलां पण चौकशी केली तिथं देखील नसल्याचं सी आर पाटील यांनी सांगितलं. मग हे गेलेत कुठं? असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजुनही पंचनामे नाहीत. मंत्री लक्ष देत नाहीत. आता तलाठी कामावर नाहीत. मग पंचनामे कोण करणार? असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत उपस्थित केला. नुकसान होऊन 15 दिवस झालं. पंचनाम्यासाठी अधिकारी गेले नसतील तर शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं पीक तसेच ठेवायचं का? जर त्याने साफ केले तर हे परत म्हणतील की नुकसान झालं नाही. त्यामुळं नकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे खडसे म्हणाले.
मागच्या सरकारचं जाऊ द्या, तुम्ही काय दिवे लागले ते सांगा
शेतकऱ्यांचं हजारो कोटींचे कर्ज माफ करा. निरव मोदी सारखे लोकं पैसै बुडवून गेले मग तुम्ही इथ असलेल्या शेतकऱ्यांवर अनन्या करु नका, असेही खडसे म्हणाले. शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करा, खतांचे भाव कमी करा. कापसाला अजून अनुदान दिलेलं नाही ते तात्काळ द्या. मागच्या सरकारनं काय केलं ते जाऊ द्या तुम्ही काय दिवे लागले ते सांगा असेही खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :