Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.  शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प होय... आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्वच क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आलेल्या आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कौतुक केलेय. पण या अर्थसंकल्पात विदर्भाला नेमकं काय काय मिळालं? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. पाहूयात या अर्थसंकल्पात विदर्भाला नेमकं काय काय मिळालं? 


काटोल, कळमेश्वर, मोर्शी आणि बुलढाणा या ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्र..


अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेला अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा..


राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष तरतूद अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, एलआयटी इन्स्टिट्यूट नागपूर, गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर यांचा समावेश...


नागपूर जवळच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरू करणार...


विदर्भातील राष्ट्रीय सिंचन प्रकल्प गोसेखुर्द साठी 1500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल...


विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षा निमित्ताने दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाईल...


सिंदखेड राजा ते शेगाव दरम्यान चौपदरी महामार्ग बांधला जाईल


संत सेवालाल महाराज आणि बिरसा मुंडा जोड रस्ते योजना - दोन्ही योजनांसाठी 4000 कोटींची तरतूद..


नागपूरमधील मिहान या विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद....


ज्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले अशा ठिकाणी विशेष स्मारक बांधणार.. ( विदर्भातील तीन ठिकाण)


नागपूर आणि अमरावती सह मुंबई, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक येथे शिवचरित्र वरील उद्याने उभारल्या जातील त्यासाठी 250 कोटी ची तरतूद...


नागपुरात कृषी सुविधा केंद्र उभारले जाईल या केंद्रातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा संशोधन, प्रसार केला जाईल.. यासाठी 228 कोटी रुपयांची तरतूद...


विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिका धारकांना थेट आर्थिक मदत दिले जाईल.. अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल.. प्रतिवर्षी प्रती शेतकरी अठराशे रुपये दिले जाणार...


विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद...


नदीजोड प्रकल्प अंतर्गत - वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणाऱ्या पाण्याला वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे थांबवले जाईल त्याचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यांना होईल...


वर्धा जिल्ह्यातील पवणार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी पर्यंत महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग उभारला जाईल त्यासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद..  हे नागपूर - गोव्याला जोडणारे महामार्ग ठरेल..


नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या 43.80 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी सहा हजार सातशे आठ कोटी रुपयांची तरतूद...


खामगाव-जालना तसेच वरोरा-चिमूर या रेल्वे मार्गा च्या एकूण खर्चापैकी 50 टक्के वाटा राज्य सरकार उचलेल...


नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार केला जाईल शिवाय अमरावती मधील बेलोरा आणि अकोला मधील शिवनी या विमानतळांचा विकास केला जाईल...


नागपुरात एक हजार एकरांवर लॉजिस्टिक हब उभारले जाईल 


पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, रत्नागिरी, मुंबई यासह नागपूर असे सहा सर्क्युलर इकॉनोमी पार्क उभारले जातील..


नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये खर्च केले जातील..


संत गाडगेबाबा समाधी स्थळ रेड मोचन विकासासाठी 25 कोटी रुपये


नागपुरात जगनाडे महाराज यांच्या आर्ट गॅलरीसाठी सहा कोटी रुपये


अमरावती येथील महानुभाव पंथाचे पवित्र ठिकाण रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यात येईल


बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवीच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्यात येईल...


अमरावती येथे रासू गवई यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये