Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; राजकारण तापलं

Maharashtra Breaking Updates: आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस देखील कोसळत आहे. राज्यातील या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील विविध अपडेट्स, पाहा एका क्लिकवर...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 14 Jul 2025 06:20 PM
माथेरानमध्ये चालत्या ई रिक्षावर झाड कोसळून तीन जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली

रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका ई रिक्षावर झाड कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. माथेरान परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील एका तीव्र उताराच्या मार्गावर एक भले मोठे झाड कोसळले आणि अपघात घडला. या घटनेत ई रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. तर ई रिक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.



 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काल (13 जुलै) अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोपानंतर प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक केला आहे. सदर घटनेचे राज्यभरात पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्यातच आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस देखील कोसळत आहे. राज्यातील या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील विविध अपडेट्स, पाहा एका क्लिकवर...

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.