- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Breaking Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
Maharashtra Breaking Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
Maharashtra Breaking Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
डोंबिवली मिलाप नगर परिसरात महानगर गॅस पुरवठा बंद. दुपारी चार वाजता अचानक महानगर गॅस पुरवठा बंद. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर मधील ओमकार टावर जवळ महानगर गॅस कडून मेंटनस चे काम सुरू असल्याने परिसरातील गॅस लाईन बंद. दोन तासांपासून गॅस पुरवठा बंद . मागील तीन महिन्यात गॅस पुरवठा बंद होण्याच्ची चौथी घटना
देशात प्रसिद्ध असलेल्या खिरेश्वर(ता.जुन्नर) हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश आले. सदर घटना शुक्रवारी (ता.११)दुपारी तीनच्या दरम्यान घडली. काळू धबधबा हा पाच टप्यांत खोल दरीत कोसळत असतो.त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. खाली शेकडो फुट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला असता.तेथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ, ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती. जर या पर्यटकाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला.सदर व्यक्ती हा पुणे येथून हैद्राबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Nanded Accident : बस आणि दुचाकीच्या अपघातात झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक आणि 3 वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे.
दर्शन रांगेतील ठेकेदाराला मंदिर प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटीस. वायर तुटून उड्डाण पुलावर पडल्याने उतरला होता वीज प्रवाह. दर्शन रांगेतील भावीक पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळाला होता. मात्र यात तीन कुत्र्यांना जीव गमवावा लागला होता.
पुणे : खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथम वर्ष कार्य अहवालाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी साडे चार वाजता सुरू होईल. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पुणे : कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 16 जून रोजी रात्री जेवणासाठी गेलेल्या अश्विनी शिरसाठ (31, रा. दापोडी) यांना सूपमध्ये झुरळ सापडल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तपासानंतर हॉटेल व्यवस्थापक अमन हुसेन शेख आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित सूप अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात आली. पुण्यातील काही हॉटेलमधून अलीकडे वारंवार अशा घटना समोर येत असून, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रायगड : जनसुरक्षा विधेयकाची आवश्यकता किती आहे? हे येणाऱ्या काळाच्या ओघानुसार ठरेल, असे मत रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधायक कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्यातील अनेक वरिष्ठ मंडळींनी आपली बाजू मांडली. खासदार सुनील तटकरे यांनी देखील या ठरावाला समर्थन दर्शवले आहे.
मुंबईच्या मालाड मालवणी पोलिसांची मोठे कारवाई,
भारतीय बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुस सोबत एका आरोपीला अटक,
अटक आरोपी हा गोवा राज्यातून मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बंदूक विकण्यासाठी आला होता,
अटक आरोपीचे नाव आरिफ इस्माईल शहा वय 35 वर्ष असून रत्नागिरी जिल्हा मधला राहणारा आहे.
अटक आरोपी विरुद्ध मालवणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा सह 37(1)(अ),135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
अटक आरोपीने मुंबई शहरात कोणाला हे बंदूक विकणार होते त्यासोबत मुंबई शहरात कशासाठी या पिस्टलचा वापर करणार होते या सर्व संदर्भात मालवणी पोलीस अटक आरोपी कडून अधिक तपास करत आहे...
युनेस्कोच्या जागतिक मानांकन स्थळ यादीत राज्यातील 12 गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश आहे..पर्यटन स्थळ निधीमधून साल्हेर किल्ल्यासाठी यापूर्वीच निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आता आपल्या सर्वांची किल्ला जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आहे.. साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक मानांकन स्थळ यादीत समावेश होणे ही आपल्या सर्वांसाठी मानाची, अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांचे देखील मंत्री दादा भुसे यांनी आभार मानले.
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माकडी गावात एक 3 वर्षीय चिमुकला आपल्या आजीला शोधायला शेताकडे जात असताना शेताकडे जात असताना मुरुम खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यात पडून त्या चिमुकल्याचा मृत्यु झाला नित सोनवाने 3 वर्ष रा. माकडी असे मृतक चिमुकल्यांचे नाव आहे. याची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी पाठविले असून पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहे.
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या ना कारणाने सध्या गाजत आहे. सामान्य रुग्णालयातील ढिसाळ व्यवस्था आणि अव्यवस्थापन सध्या सुरू आहे. आज सामान्य रुग्णालयातील सुरक्षित व महत्वाच असलेल्या महिला रुग्ण कक्षात रुग्णांच्या नातेवाईकामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली. या मुळे रुग्णालय परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुसऱ्यांदा पाहणी;
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुसऱ्यांदा पाहणी करत आहे
या आधी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसोबत एकत्रित पाहणी केली होती.
काही महिन्यांमध्ये हे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार असल्याची शक्यता.
विमानतळात चार टर्मिनल्स, दोन समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता.
कोस्टल रोड, मेट्रो व बुलेट ट्रेनशी थेट कनेक्टिव्हिटी.
नावावरून वाद – बाळासाहेब ठाकरे व दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांमध्ये मतभेद.
प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संपर्कात आणि विकासात महत्त्वपूर्ण भर पडणार.
विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले आहेत
सोबत मंत्री गणेश नाईक ही आहेत
केंद्राच्या अख्त्यरीत येणारे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारचे केंद्राच्या पुरातत्व विभागाला पत्र
हे प्रमुख किल्ले पुरातत्व विभागाच्या अख्त्यारित येत असल्याने राज्य सरकारला या गड किल्यांच्या संवर्धनात अडचणी येत होत्या
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकित याबाबत केंद्राला पत्र लिहून हे गड किल्ले राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अख्त्यारित घेण्यासंदर्भात चर्चा केली होती
त्यानुसार राज्य सरकारने आता केंद्राला पत्र लिहून या गड किल्यांच्या संवर्धनाबाबत राज्यसरकारला परवागी मिळावी याबाबत पत्र लिहिले आहे
याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील चर्चा ही अंतिम टप्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली
वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच पेरलेले पीक वाया गेलीत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर 13 हजार 152 हेक्टर वर दुबार पेरणीच संकट ओढावल आहे. ही बाब शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे.
वाशिम जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 लाख 62 हजार 832 हेक्टरवर खरिपाची पीक पेरणी झाली आहे. यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर पावसाने खंड दिला 25 जून आणि 26 जूनला वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. यात सर्वाधिक फटका हा रिसोड तालुक्यात बसला असून 9 हजार 450 हेक्टर वर दुबार पेरणीची संकट असून, मालेगाव तालुक्यात 2 हजार 380 हेक्टरवर आणि वाशिम तालुक्यात 700 हेक्टरवर तर मंगरूळपीर तालुक्यात 590 हेक्टर वर दुबार पेरणीच संकट ओढावलं आहे.
दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात वेगळा ट्विस्ट.
अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग कोर्टात सादर केले.
जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच शिक्षिकेच्या प्रेमात होता असे पुरावे शिक्षिकेकडून कोर्टात सादर.
आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याने केलेले इमेल्स, प्रेमपत्र, गिफ्ट आणि व्हॉट्सअप चॅटिंग कोर्टात सादर केले.
शिक्षिकेने कोर्टात आपल्या अर्जात म्हटलेले आहे की ती विद्यार्ग्यासोबत तात्पूरत्या प्रेमसबंधात होती. अल्पवयीन विद्यार्थी तिला पत्नी असे म्हणायचा.
किकी आणि पुकी या नावाने शिक्षकेला बोलवायचा असे मेसेज आरोपी शिक्षिकेने कोर्टात सादर केलेले आहेत.
शिक्षिकेने या अल्पवयीन विद्यार्थ्याला वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केलाचा आरोप तिच्यावर आहे.
शिक्षिका सध्या अटकेत असून तिच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेल्या बाबींमुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आलेला आहे.
- फेसबुक फ्रेंड महिलेकडून 55 लाख रुपयांचा गंडा घातल्याने जव्हारच्या कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या
-
ऑइल व्यवसाय सुरू करण्याचे अमिश दाखवून फसवणूक झाल्याचा कुटीबीयाचा आरोप
- फसवणूक झाल्यान कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत नाशिकमध्ये राहत असलेल्या प्रशांत पाटील यांची गळफास घेत संपवले जीवन
-
- फेसबुक फ्रेंड महिलेने आपको ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे दिले होते अमिष
- मृत प्रशांत पाटील हे पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीचे कृषी अधिकारी होते
- प्रशांत पाटील यांनी 30 तोळे दागिने विकत कर्जांनीही रक्कम घेतली होती
- नाशिकच्या अंबड पोलिसात आत्महत्येची नोंद तर मृत प्रशांत पाटील यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा
- सायबर पोलिसांकडूनही फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू
- फेसबुक फ्रेंड महिलेकडून 55 लाख रुपयांचा गंडा घातल्याने जव्हारच्या कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या
-
ऑइल व्यवसाय सुरू करण्याचे अमिश दाखवून फसवणूक झाल्याचा कुटीबीयाचा आरोप
- फसवणूक झाल्यान कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत नाशिकमध्ये राहत असलेल्या प्रशांत पाटील यांची गळफास घेत संपवले जीवन
-
- फेसबुक फ्रेंड महिलेने आपको ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे दिले होते अमिष
- मृत प्रशांत पाटील हे पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीचे कृषी अधिकारी होते
- प्रशांत पाटील यांनी 30 तोळे दागिने विकत कर्जांनीही रक्कम घेतली होती
- नाशिकच्या अंबड पोलिसात आत्महत्येची नोंद तर मृत प्रशांत पाटील यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा
- सायबर पोलिसांकडूनही फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू
भंडारा: स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली 45 हजार रुपयांची रोकड चोरट्यानं चोरून नेली. ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी इथं घडली. स्कुटी चालक महिला औषधी घेण्याकरिता मेडिकलमध्ये गेली असता तिची नजर नसल्याची बाब हेरून चोरट्यानं डीक्कीतील रक्कम पडविली. ही संपूर्ण घटना मेडिकल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
पंढरपूर: आषाढी यात्रा संपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला मात्र विठ्ठलाच्या कृपेने अनर्थ टळला असला तरी दर्शन रांगेतील उड्डाणपुलात विद्युत करंट उतरून तीन कुत्र्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शना रांगेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या लोखंडात अचानक विद्युत करंट उतरला, मात्र यावेळी भाविकांची दर्शन रांग या ठिकाणापर्यंत आली नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ठीक ठिकाणी भाविकांना वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मंदिर समितीने अशा ठिकाणी लोखंडी उड्डाण पूल दर्शन रांगेमध्ये बनविले आहेत. यातील एका उड्डाणपुलामध्ये रात्री सहा ते सातच्या सुमारास वीज प्रवाह उतरला होता. परंतु या उड्डाणपूलावर कोणताही भाविक रांगेत थांबला नव्हता यामुळे अनुचित प्रकार टाळला. परंतु पुलानजीक गेलेल्या तीन कुत्र्यांना आपला त्या ठिकाणी प्राण गमवावा लागला आहे. हा प्रकार स्थानिक नागरिकांना दिसताच त्यांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याला संपर्क साधला. कर्मचारी घटनास्थळी आला मात्र त्यांनी काहीच न केल्याने अखेर स्थानिकांनी वीज वितरण विभागाशी संपर्क साधून या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर संबंधित वायरिंग दुरुस्त करण्यात आली. मात्र प्रशासनाने इतकी तयारी करून देखील असा गलथानपणा ज्याच्यामुळे झाला त्याच्यावर कारवाईची मागणी आता नागरिक करू लागले आहेत. विठ्ठल कृपेने भाविकांचे प्राण वाचले असले तरी तीन मुक्या जनावरांना या जीव गमवावा लागला आहे. दरम्यान मंदिर समितीने या सर्व प्रकाराचा सीसीटीव्ही चेक करून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
नागपूर: राज्य सरकारने महाराष्ट्रातील बार व परमिट रूमवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध 14 जुलै रोजी विदर्भातील सर्व बार परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन तर्फे 14 जुलै रोजी बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास बार परमिट रूम बंद करून चाव्या जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात येणार असल्याचे ही बार परमिट रूम संघटनेचे म्हणणे आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीय.
सरकारने वॅट नूतनीकरण फी तसेच वाढवलेली एक्साईज ड्युटी कमी करावी, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली.त्यांनी प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आमचे आंदोलन करण्याची वेळ आल्याची माहिती नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन दिली आहे.
आदिवासी आयुक्तलाय बाहेरील बिऱ्हाड आंदोलन कायम
रात्रभर आंदोलनकर्त्याचे आयुक्तलया बाहेर सुरू होते आंदोलन
वर्ग 3 आणि 4 च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या
बाह्य सेवा भरती बंद करा आशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून टप्याटप्याने सुरू आहे आंदोलन
शुक्रवारी दुपारी आंदोलनकर्ते आदिवासी आयुक्तलायावर धडकले
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठववण्याचा इशारा
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलिसांना एका गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की काही इसम हे धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा बाळगून आहेत त्यानुसार पोलिसांनी खुलताबाद फाटा येथे जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी काही इसम हे त्यांना त्या ठिकाणी आढळून आले. ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, चार धारदार तलवारी आणि एक कोयता असा मुद्देमाल आढळून आला या सर्व मुद्देमालाची एक लाख 9 हजार रुपये किंमत असून पाचही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आता खुलताबाद पोलीस करीत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे 87 नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. या सर्वांवर जवळच्याच विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात अचानक सुरू झालेल्या डायरीच्या त्रासामुळे व वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात हजर नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला व गावातील महिलांनी जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. सध्या गावात जिल्हास्तरीय वैद्यकीय पथक पोहोचल असून वरिष्ठ आरोग्य अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार.. प्रवाशांचा जीव धोक्यात. पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधील प्रकार. प्रवाशांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार.
पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक व वाहकाने दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घडली. या प्रकारामुळ 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस व एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.
अकोट आगाराची एमएच-१४- ६१४० क्रमांकाची बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. चालक संतोष रहाटे व वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील दावरवाडी परिसरात हरणांच्या कळपाकडून शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबिन, तुर, पीक हरणांच्या कळपाने फस्त केल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे वनविभागाने या हरणांसह अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे.
धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली होती.. विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना ही रक्कम मिळून आल्याने समितीमधील आमदारांना देण्यासाठीच हे पैसे आणण्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता... याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. सर्वप्रथम या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी काल धुळे जिल्हा न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काल रात्री धुळे शहर पोलीस ठाण्यात कलम 308 कलम 233 आणि कलम 241 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि संशयित सह आरोपी राजकुमार मोगले यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.अजित पवारांनी बारामती शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांची आज सकाळपासून पाहणी केली आहे. अजित पवार पाहणे दौरा झाल्यानंतर जनता दरबार देखील घेणार आहेत. यानंतर बारामतीतील काही खाजगी कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार आहेत. तर काही खाजगी रुग्णालयाची उद्घाटन ही अजित पवारांच्या हस्ते पार पाडणार आहेत.
वातानुकुलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या केडीएमटी कडून प्रत्यक्षात प्रवाशाच्या पदरात उपेक्षित प्रवासच पाडण्यात आलाय . डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे.एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटीला मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
७ ते ९ जुलै दरम्यान भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सातही तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. अतिवृष्टीनं शेकडो हेक्टर शेतजमीन आणि अनेक घरं पाण्याखाली आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. भंडारा जिल्हा प्रशासनानं या अतिवृष्टीच्या नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल तयार केला आहे. या पुराचा भंडारा जिल्ह्यातील २११ गावातील १० हजार ९०२ शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्याखाली आलं असून त्याची नासाडी झाली आहे. भातपीक, तुर, सोयाबीन, कापूस, भाजीपाला या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतचं ४८१ घरं आणि ५७ गोठ्यांचं नुकसान झालं असून ८ जनावरं पुरात वाहून गेली आहे.
विरोधकांच्या अनुपस्थितीत विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर... ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआतील घटक पक्षांचा विरोध, राज्यपालांची भेट घेऊन निषेध नोंदवणार
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर ६४ तासांनी अदखलपात्र गुन्हा दाखल...एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश...आय डोन्ट केअर म्हणत गायकवाडांची मुजोेरी मात्र कायम...
आपल्याच बेडरूममधला व्हिडीओ असल्याचं संजय शिरसाटांकडून मान्य...पण नोटांची नाही तर कपड्यांची बॅग असल्याचा दावा... राऊतांविरोधात करणार मानहानीचा गुन्हा दाखल...
सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाटांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडीओ समोर...बॅगेट नोटांची बंडलं असल्याचा राऊतांचा दावा...आणखी नवे व्हिडीओ बाहेर काढणार, राऊतांचा इशारा..
शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती...रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश..
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्याचा समावेश यामध्ये समावेश आहे. तसेच सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाटांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडीओ समोर आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बॅगेट नोटांची बंडलं असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच आणखी नवे व्हिडीओ बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...