Maharashtra Breaking News Live Updates : बोईसर एमआयडीसी कार्यक्षेत्रात विराज कंपनीला भीषण आग

Maharashtra Election Results News 07 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 08 Dec 2024 10:28 PM
बोईसर एमआयडीसी कार्यक्षेत्रात विराज कंपनीला भीषण आग

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट क्रमांक जी 35 मध्ये विराज कंपनीला भीषण आग लागली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलंय. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

280 आमदारांचा शपथविधी आटोपला, पण 8 जण आलेच नाहीत, समोर आलं महत्त्वाचं कारण

काल आणि आज 280 आमदारांचा शपथविधी पार पडला, पण 8 आमदार अधिवशनाला आले नाहीत, त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचं कारण समोर आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Maharashtra Vidhansabha 2024 : अद्याप 8 आमदारांचा शपथविधी बाकी

- शपथविधीच्या कामकाजावेळी 8 आमदार अनुपस्थित होते.  


- उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके


- उद्या उर्वरित काही आमदार शपथ घेणार.  


- याउलट काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेणार. 

पुणे रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमाक 3 बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलीस अलर्ट मोडवर

पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीकडून फोन.सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याची माहिती.


फोन करणार व्यक्ती वय 40 पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती. या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, 


सदरील व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती.  पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास? पत्ता कट होणार?

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार.


राज्य मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले.


शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास.


शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास.


शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे ५ आमदार पास.


शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे पास.


महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्री पद मिळणार असल्याची माहीती. या पैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्री पदाची शपथ दिली जाणार.


शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले आणि मंत्री पदाची शपथ घेणार संभाव्या मंत्र्यांची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

राहुल नार्वेकर यांनी दाखल केला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे, महाविकास आघाडीचे नेत्यांनी मुख्यमंत्र्यापुढे ठेवला प्रस्ताव

महाविकास आघाडीचे नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे या संदर्भातला प्रस्ताव समोर ठेवला आहे


 विधानसभा अध्यक्ष उद्या निवडला जाणार आहे आणि त्याआधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं  हा एक प्रकारचा प्रस्ताव समोर ठेवला आहे

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे दीड एकर ऊसाच्या शेतीला आग

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे दिड एकर ऊसाच्या शेतीला आग लागल्याची घटना घडलीय..


तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात अचानक आग लागल्याने शेतक-यांची चांगलीच धावपळ झाली यावेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले यामध़्ये दिड एकर शेतातील ऊस जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले

महाविकास आघाडीदेखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?

महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?


महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा 


शपथविधी पार पडल्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार आणि विधानसभा अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरणार की नाही याबाबत निर्णय घेणार 


सूत्रांची माहिती

विरोधकांच्या सभात्यागवरून चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, संविधानाचा अपमान होत असल्याचा आरोप

विरोधकांच्या सभात्याग वरून चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक


विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते


बावनकुळेंची विरोधकांवर सडकून टीका


आमदारकीची शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान - बावनकुळे


संविधानाचा अपमान म्हणजेच बाबासाहेबांचा अपमान - बावनकुळे


चंद्रशेखर बावनकुळेंनी केला विरोधकांचा निषेध

शरद पवार यांचे मारकडवाडीमध्ये हेलिकॉप्टरने आगमन

शरद पवार यांचे मारकडवाडीमध्ये हेलिकॉप्टरने आगमन ..


राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष विद्याताई चव्हाण , रिपाई अध्यक्ष सचिन खरात आदी मान्यवर उपस्थित

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात सर्व विरोधी आमदारांची बैठक... 


विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात सर्व विरोधी आमदारांची बैठक... 


सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे आमदारांची बैठक... 


पुढील भूमिका ठरवण्यासंदर्भात बैठकीत होणार चर्चा 


त्यानंतर पायऱ्यावर आंदोलन केल जाणार असल्याची माहिती

राज्य सरकारच्या शपथविधीनंतर नंदुरबारमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये बॅनर वॉर

नंदुरबार ब्रेकिंग


* राज्य सरकारच्या शपथविधीनंतर नंदुरबार मध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये बॅनर वार

* शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदन चे लावलेत बॅनर
* भाजपाचे नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांनीही नंदुरबार शहरात मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेत मात्र त्यावर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारासमोर बंडखोरी करणाऱ्या माजी खासदार डॉ हिना गावित यांचाही फोटो
* शिंदे गट मदत करत नसल्याचा डॉ विजयकुमार गावितांचा निवडणूक काळात होता आरोप....


* दोघी नेत्यांनी शहरभर बॅनर आणि होल्डिंग्स लावल्याने चर्चेचा विषय

नाशिकच्या सिडको भागातील सहा वर्षीय मुलीने गिळला कॉइन, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला

नाशिकच्या सिडको भागातील सहा वर्षीय मुलीने गिळला कॉइन, कुटुंबाच्या आव्हानानंतर आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला


औषध उपचाराने कॉईन शस्त्रक्रिया न करता बाहेर पडेल - डॉ. वैभव देवरे


मुलीच्या पोटातील कॉइन बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू...

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक


हिवाळी अधिवेशनासंदर्भात आज मुहूर्त ठरणार


नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार


विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल? यावरही चर्चा होणार 


विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का? याकडे सर्वांचे लक्ष

मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी

कोल्हापूर


मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये  प्रवेश बंदी


बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार


मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला देखील कर्नाटक प्रशासनाने दिली नाही परवानगी


महामेळावा घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम


कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्या बेळगावकडे जाण्याच्या तयारीत


महामेळासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाकडून स्पष्ट

भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरातील भंगारच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी ब्रेक 


भिवंडीत आगीचे सत्र सुरूच 


भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात ग्लोबल कॉम्प्लेक्स मधील भंगारच्या गोदामाला भीषण आग


मध्यरात्रीच्या सुमारास आग लागले असून आगीचे कारण अस्पष्ट


तीन भंगारचे गोदाम व शुभम इंटरियर सोलुशन कंपनीला लागली भीषण आग 


या आगीमुळे आसपासच्या परिसरातील घरांना देखील झळ 


गोदामात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिक वस्तू साठवणूक 


या आगीत  भंगार गोदामासह इंटरियर चे शोरूम जळून खाक 


गोदामा शेजारी असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. 


आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण 


अजूनही काही ठिकाणी आग धुमसत आहे

नाशिकच्या मेळा बसस्थानकात चौकशी कक्षाला बस थडकली, बसचे नियंत्रण सुटल्याने तीन प्रवासी चिरडले

नाशिक ब्रेकिंग...


- नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस थडकली,बसचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घुसली स्थानकात...
- महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बसने चिरडले दोन ते तीन प्रवासी 
- बस चालकच नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती...
- रात्रीच्या वेळी बस ठरल्या वेळेत बस स्थानकात आल्यानंतर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती
- बस चालकला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती...

नाशिकच्या मेळा बसस्थानकात चौकशी कक्षाला बस थडकली, बसचे नियंत्रण सुटल्याने तीन प्रवासी चिरडले

नाशिक ब्रेकिंग...


- नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस थडकली,बसचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घुसली स्थानकात...
- महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बसने चिरडले दोन ते तीन प्रवासी 
- बस चालकच नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती...
- रात्रीच्या वेळी बस ठरल्या वेळेत बस स्थानकात आल्यानंतर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती
- बस चालकला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती...

गुलाबी थंडीत वसई विरार मॅरेथॉनला जोशपूर्ण सुरुवात; साक्षी मलिकने दाखवला झेंडा

गुलाबी थंडीत वसई विरार मॅरेथॉनला जोशपूर्ण सुरुवात; साक्षी मलिकने दाखवला झेंडा


विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने आयोजित १२ व्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला आज पहाटे पासून उत्साहात सुरुवात झाली. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्णपदक विजेती साक्षी मलिक हिने इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात 7 डिसेंबर रोजी सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी झाला. तर आज म्हणजेच 8 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी होणार आहे. कालच्या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आज नेमक्या काय-काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात सर्वदूर थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.