Maharashtra Breaking News Live Updates: संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा; मनोज जरांगेही पोहचले!

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.

मुकेश चव्हाण Last Updated: 28 Dec 2024 03:08 PM
अंजली दमानिया बोगस आरोप करत, बेछूट आरोपांमुळे हे सगळं बिघडतंय; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर 

पुणे : अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत? सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. आरोपींना तातडीने अटक केला जाईल. या प्रकरणी 6 एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणार नाही असेही ते म्हणाले. 


 

अंजली दमानिया बोगस आरोप करत, बेछूट आरोपांमुळे हे सगळं बिघडतंय; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर 

पुणे : अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत? सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. आरोपींना तातडीने अटक केला जाईल. या प्रकरणी 6 एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणार नाही असेही ते म्हणाले. 


 

अंजली दमानिया बोगस आरोप करत, बेछूट आरोपांमुळे हे सगळं बिघडतंय; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर 

पुणे : अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत? सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. आरोपींना तातडीने अटक केला जाईल. या प्रकरणी 6 एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणार नाही असेही ते म्हणाले. 


 

पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं, स्वत: पंकजा मुंडे असे म्हणत होत्या; प्रकाश सोळंखे यांची टीका  

Beed Morcha: संतोष देशमुखांची हत्या होऊन 19 दिवस झाले अजून आरोपी अटक नाही. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अटकेत नाहीत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते, पंकजा मुंडे स्वत: म्हणत होत्या पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं.  हे घटनाबाह्य पद मिळल्यावर याला अडकवा, त्याला पकडा असे कामं झाले. गोदावरी नदीतून 300 गाड्या वाळू उपसा केला जातो, ह्या गाड्या कोणाच्या आहेत? असा सवाल करत प्रकाश सोळंखे यांनी टीका केली आहे.    


वाल्मिक कराडच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तो पर्यंत न्यायाची अपेक्षा ठेवता येणार नाही. जो पर्यंत हे प्रकरणाला चौकशी होतं नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे. माजलगाववतीने आम्ही 4 लाखांची मदत मस्साजोगला जाऊन देणार आहोत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, त्याना मदत करावी. असे आवाहन ही त्यांनी  केले आहे.

पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं, स्वत: पंकजा मुंडे असे म्हणत होत्या; प्रकाश सोळंखे यांची टीका  

Beed Morcha: संतोष देशमुखांची हत्या होऊन 19 दिवस झाले अजून आरोपी अटक नाही. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अटकेत नाहीत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते, पंकजा मुंडे स्वत: म्हणत होत्या पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिलं.  हे घटनाबाह्य पद मिळल्यावर याला अडकवा, त्याला पकडा असे कामं झाले. गोदावरी नदीतून 300 गाड्या वाळू उपसा केला जातो, ह्या गाड्या कोणाच्या आहेत? असा सवाल करत प्रकाश सोळंखे यांनी टीका केली आहे.    


वाल्मिक कराडच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तो पर्यंत न्यायाची अपेक्षा ठेवता येणार नाही. जो पर्यंत हे प्रकरणाला चौकशी होतं नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे. माजलगाववतीने आम्ही 4 लाखांची मदत मस्साजोगला जाऊन देणार आहोत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, त्याना मदत करावी. असे आवाहन ही त्यांनी  केले आहे.

Beed Muk Morcha : कोपर्डी प्रकरणाप्रमाणेच देशमुख हत्येविरोधात राज्यभरात मोर्चे निघतील : अभिमन्यू पवार 

Abhimanyu Pawar : कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील, अशी प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 


 

तळकोकण अन् पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट 15 जानेवारीपासून सुरू

सिंधुदुर्ग: तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख घाट मार्ग गेल्या वर्षभर बंद आहे. मात्र आता हा करूळ घाट 15 जानेवारी पासून एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्री नितेश राणे यांनी आज करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी घाटाचे 60  टक्के काम पूर्ण झाले असून 10 जानेवारी ला पुन्हा एकदा या घाटाची पाहणी करून मगच 15 जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल. 

संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अमरावतीत ठिय्या आंदोलन; बच्चू कडूही सहभागी

अमरावती: बीड परभणी संयुक्त न्याय संघर्ष समिती अमरावती तर्फे सरपंच संतोष देशमुख आणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ इर्विन चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार बच्चू कडू हे देखील सहभागी झाले. बच्चू कडू यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पारदर्शक कारवाईची मागणी यावेळी केली. बीड आणि परभणी येथील घटनांमध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी स्पष्टपणे दिसून येते. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, अशी म्हण आपल्याकडे आहे. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, ही म्हण अधोरेखित करायची नसेल तर अतिशय स्वच्छपणे कारवाई झाली पाहिजे आणि करायची असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे, की होय हे आमचे गुंडे आहे.


झालेल्या घटनेवर पारदर्शकपणे कारवाई होणे आवश्यक आहे. सत्य महत्त्वाचे असते सत्ता महत्त्वाची नसते. हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. नाहीतर याचे मोठे परिणाम उद्या सरकारला भोगावे लागतील. सत्य लपवून सत्ता चालवायचा प्रयत्न कराल तर जनता सत्यासमोर गेल्याशिवाय राहणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. 

Jitendra Awhad : वाल्मीक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू; जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका 

Jitendra Awhad on Walmik Karad : वाल्मीक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू आहे. आत्तापर्यंत 20 वंजारा समाजाचे खून त्यांने केलेत. आमची जात यांच्यामुळे बदनाम होते आहे. मी पहिली मागणी केली धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा. असे म्हणत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोचारी टीका केली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण बीड मध्ये चालवू नका, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी 

Santosh Deshmukh Beed Morcha: सरपंच  संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे. तसेच सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये जेष्ठ विधी तज्ञ् उज्ज्वल निकम साहेब व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे साहेब यांची नियुक्ती व्हावी,  त्याचप्रमाणे सदर प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे,  अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. सदर प्रकरण बीड मध्ये चालवू नये, कारण राजकीय हस्तक्षेपामूळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाहीत. यासाठीचं हे प्रकरण मुंबईलावर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुदर्शन घुले अन् कंपनी ही लादेनहून मोठी झालेली दिसते, कारण...; महिबूब शेख यांची बोचरी टीका  

Santosh Deshmukh Case : ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली ती अत्यंत क्रूर आणि अमानवी आहे. सुदर्शन घुले आणि कंपनी ही लादेनहून मोठी झालेली दिसते. कारण अमेरिकेला लादेन सापडतो, मात्र हे आरोपी सापडत नाहीत. प्रत्येक गोष्टीला एक सहनशीलता असते. बीडच्या दहशती बद्दल देखील एक संयम बाळगला होता. मात्र आता तो संपलाय. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा केली होती. मग आतापर्यंत एसआयटीची स्थापना का केली नाही? अटकेत असलेल्या आरोपींना थर्ड डिग्री द्या, तुम्ही त्यांना बाबू, बाबू म्हणून गोंजारल तर ती माहिती कशी देतील. अशी टीका करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी संतोष देशमुख हत्येवर भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


 

बीड आणि परभणीच्या विषयावर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Prakash Ambedkar meet Devendra Fadnavis : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चा निघतो आहे. तर दुसरीकडे या हत्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे.


या भेटीत दोघांमध्ये मागील तासाभरापासून चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार बीड आणि परभणीच्या विषयावर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असल्याचे बोलले जात आहे.

शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे मृत सरपंच देशमुख कुटुंबियांच्या भेटीला 

Beed Crime: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले असताना या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. दरम्यान शिवसंग्रामच्या (Shiv Sangram) नेत्या ज्योती मेटे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. दिवंगत विनायक मेटे साहेबांच्या मुर्त्युंनंतर जी अवस्था माझी आणि कुटुंबाची झाली ती पाहता मी देशमुख कुटुंबाची भेट घेतेय. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोण राजकारण करतय काय करतय याची मला माहिती नाही. पण या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक दुष्कृत्यामागे कोणी तरी असतं, तपास यंत्रणेने त्याचा शोध लावला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 


 

BJP : भाजपचे शिर्डी येथे 12 जानेवारीला महाअधिवेशन

भाजपचे शिर्डी येथे 12 जानेवारीला महाअधिवेशन


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची असणार प्रमुख उपस्थिती 


राज्यातील तब्बल 10 हजारांहून अधिक भाजप पदाधिकारी राहणार उपस्थित


तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा


मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचाही होणार सन्मान

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोसला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोसला जाणार


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनात लावणार हजेरी


मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा दावोस दौरा


देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी सुद्धा दावोस दौऱ्यावर


महाराष्ट्राला अधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे असेल आव्हान

Crime News : कुर्ल्यात प्राॅपर्टीच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या

कुर्ल्यात प्राॅपर्टीच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या


काझम हुसेन मिर्झा बेग असे या मयत व्यक्तीचे नाव आहे


या हत्ये प्रकरणी तिघांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे


सफदर हुसेन सय्यद, शबरेज हुसेन सय्यद, वासीफ हुसेन सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत


मागील 10 ते 15 वर्षांपासून आरोपी आणि मयत काझम हुसेन मिर्झा बेग यांच्यात प्राॅपर्टीहून वाद होते


याच वादातून राग विकोपाला गेल्याने तिनही आरोपींनी बेगची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे


या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.

Santosh Deshmukh : बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव आज बंद

बीड मधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद राहणार.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.


बीड मधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दुकाने आस्थापना बंद ठेवण्यात आली आहेत.


मस्साजोग गावचे सर्व नागरिक बीड मधील मोर्चात सहभागी होणार.

Nashik Fog : निफाड तालुक्यात धुक्याची चादर, जिल्ह्यात ढगाळ वातावरण

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सकाळपासून धुक्याची चादर पसरली आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज आणि उद्या ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष कांदा यासह इतर शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nashik Rains : येवल्यात बेमोसमी पावसाची हजेरी, शेती पिकांना फटका, बळीराजा हवालदिल

- येवला तालुक्यातील नगरसूल भागात बेमोसमी पावसाची हजेरी


- गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना बसला बेमोसमी पावसाचा फटका. 


- शेतकरी हवालदिल...


- आधीच शेतीपिकांना भाव नाही त्यातच बेमोसमी पावसाने दिला फटका.. 


- नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे व्हावे व तातडीने मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार, कॅबिनेट बैठकीत निर्णय

मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार 


कालच्या कॅबिनेट बैठकीतच झाला निर्णय 


गुरमंत्री अमित शाह यांनी ताबडतोब काँग्रेसला फ़ोन करून निर्णय कळवला होता 


काँग्रेसकडून काल पत्र लिहून मनमोहन सिंग यांच्या अत्यसंस्कारासाठी वेगळी जागा देऊन तिथे भविष्यात स्मृतीस्थळ उभारले जावे अशी मागणी केली होती 


आज केंद्र सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने प्रेस नोट काढून हे स्पष्ट केले आहे

भंडाऱ्याच्या लाखांदुरात पसरली दाट धुक्याची चादर

मागील काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, अशात आज पहाटेपासून भंडाऱ्याच्या लाखांदुरात दाट धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य बघायला मिळालं. या दाट धुक्याच्या चादरमुळं पुढील मार्ग काढताना वाहनधारकांना गाडीचं वेग कमी करून वाहन चालवावं लागत असल्यानं वाहनांचं वेगं मंदावल्याचं चित्र बघायला मिळालं. शेतशिवारातही मोठ्या प्रमाणात दाट धुक पसरल्यानं अक्षरश: शेतीवर धुक्याची चादर असल्याचं बघायला मिळालं. शेतातील हरभरा, गहू यांना या दाट धुक्याचा लाभ होईल, असं समाधान शेतकरी व्यक्त करीत आहे. सकाळी दाट धुक्याच्या चादरमधून सायकलनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद बघायला मिळालं.

मुरूडच्या काशीद समुद्रावर एका शिक्षकाचा बुडून मृत्यू 

रायगड जिल्ह्यातल्या मुरूड मधील काशीद समुद्रात पुण्यातून सहलीसाठी आलेल्या एका शालेय शिक्षकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना काल घडली. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पीसोरी येथील १३ जणांचा ग्रुप काल सहलीसाठी रायगडमध्ये आले असताना. काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात पोहत असताना  या ग्रुपमधील मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख ((55 वर्ष)यांचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने देशमुख यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आग 

मुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आग 


या ठिकाणी असलेल्या गोदामाला आग लागली आहे


आगीत २ गोदामने पेट घेतला आहे


झोपडपट्टी भागात ही आगनलागल्याने अग्निशामक दलाला शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत

बीड हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करा- धनंजय देशमुख

बीड हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करा, ही एकाच मागणी असल्याचं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सांगितलं. दरम्यान आज होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून द्यायचे आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचाराने चालणार राज्य आहे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे नाव घ्यायला राहिले आहोत का?, कराड मोकाट फिरत आहे, मोका लावतो म्हणाले होते. अजित पवार प्रखर म्हणाले, पण तुम्ही हे कसे खपवून घेता?, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. एक व्यक्तीला घाबरत आहे, कोण आहे यामागे? आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का?, शोधून काढले तर 2 मिनटं लागतात. कराडच्या संपर्कात कोण आहे. त्याचे खास सबंध कुणाचे आहेत. धमक असेल तर करा, धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका हे सांगणारा मी पहिला आहे. कराडला पकडल्यावर सर्व समोर येईल. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं संभाजीराजेंनी सांगितले.  

अनेक नेते आज मोर्चाला हजेरी लावणार

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी अनेक नेते आज मोर्चाला हजेरी लावणार आहेत.


खा.बजरंग सोनवणे,
आ.संदीप क्षीरसागर,
आ प्रकाश सोळंके,
आ.सुरेश धस,
आ जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया
मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजी राजे भोसले

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे. या प्रमुख तसेच देशभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.