Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा

Maharashtra Breaking News 18th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 18 Dec 2024 04:23 PM
दुख:द बातमी; राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या वडिलांचे निधन

अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झालंय. ते मृत्यूसमयी 90 वर्षांचे होतेय. व्ही. एन. उर्फ विठ्ठलराव पाटील हे 1985 ते 92 या काळात अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार होते. त्याआधी ते अकोला जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेयेत. आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अकोल्यातील उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेय. यावेळी जिल्हासह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होतेय.

वसईत हिट ॲण्ड रनची घटना; 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

वसई : वसईत आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास हिट ॲण्ड रनच्या घटनेत एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
शाहिस्ता इम्रान शाह (14) असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वाजा मोहल्ला, पापडी येथे राहात होती.


शाहिस्ता उजेफा उर्दू हायस्कूल, कोळीवाडा येथील 9 वीची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी निघाली होती. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या घटनेत शाहिस्ता गंभीर जखमी झाली होती आणि तिला तात्काळ वसईच्या कार्डीनल ग्रेसेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार 15 ते 16 वर्षाचा असल्याचा प्रत्यदर्शीने सांगितलं आहे. तर दुचाकीवर नंबर प्लेट वर गाडीचा नंबर लिहला नव्हता. तर तेथे “आदिशक्ती माय” असं लिहिलेलं होतं. घटनेनंतर दुचाकीचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या घटनेने वसई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वसईत हिट ॲण्ड रनची घटना; 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

वसई : वसईत आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास हिट ॲण्ड रनच्या घटनेत एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
शाहिस्ता इम्रान शाह (14) असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वाजा मोहल्ला, पापडी येथे राहात होती.


शाहिस्ता उजेफा उर्दू हायस्कूल, कोळीवाडा येथील 9 वीची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी निघाली होती. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या घटनेत शाहिस्ता गंभीर जखमी झाली होती आणि तिला तात्काळ वसईच्या कार्डीनल ग्रेसेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार 15 ते 16 वर्षाचा असल्याचा प्रत्यदर्शीने सांगितलं आहे. तर दुचाकीवर नंबर प्लेट वर गाडीचा नंबर लिहला नव्हता. तर तेथे “आदिशक्ती माय” असं लिहिलेलं होतं. घटनेनंतर दुचाकीचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या घटनेने वसई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच, शेतकरी हवालदिल

नाशिक: नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याचे चित्र आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900  रुपये भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त 2 हजार 800 रुपये भाव आहे. नांदगाव, मनमाड, येवला आदी बाजार समित्यांमध्येही कांदा दरात घसरण सतत सुरूच असल्याचे चित्र आहे. मागील 15  दिवसात 1 हजार 600 ते 2 हजार रुपयांनी कांदा दरात घसरण झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व  कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले असल्याचे सांगितलं जातंय. दरम्यान, कांदा निर्यात शुल्क तातडीने मागे घ्यावे ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शरद पवार २१ तारखेला बीड दौऱ्यावर, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार २१ तारखेला शनिवारी बीड दौऱ्यावर, शरद पवार मस्साजोग गावी जाऊन मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार,  १० दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार

मोठी बातमी! मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक

Suresh Dhas On Massajog Crime : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. 

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

विधानपरिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली


भाजपकडून राम शिंदे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला 


एकच अर्ज सादर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता


थोड्याच वेळात अर्जाची छाननी सुरु होणार


अर्ज छाननी नंतर उद्या विधानपरिषदेत अर्ज सादर केला जाणार


उपसभापती निलम गोऱ्हे प्रस्ताव मांडणार 


बहुमताने राम शिंदे यांची निवड होण्याची शक्यता


 

Nagpur Adhivshan: झिशान सिद्दीकी नागपूरमध्ये अजित पवारांच्या भेटीला

 अजित दादा आमचे नेता आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी विधानभवनात आलो आहे. विधान भवनाचा सदस्य नसल्यामुळे मी बाहेरच आहे आणि त्यामुळे मला वेळच वेळ आहे.  अजित दादा यांची भेट घेत त्यांच्यासोबत काही चर्चा केली जाईल. जी काही जबाबदारी मला दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेल मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे.  जर विधान परिषदेसाठी माझा विचार होत असेल तर तुमच्या तोंडात साखर पडेल... कारण आतापर्यंत विधानसभा सदस्य राहिलो आणि पुढे जर निर्णय झाला तर विधान परिषद सुद्धा जाईल.   काही वरिष्ठ नेत्यांना मंत्री पदाची संधी मिळते काही नेत्यांना मिळत नाही त्यावर मी काय बोलणार, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.


 


 


 


 


 

R Ashwin Retirement: भारताचा फिरकीपटू आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.

R Ashwin retired : आर अश्विन निवृत्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

टीम इंडियाचा फिरकीपटू आणि अल्पावधीतच अष्टपैलू म्हणून नाव कमावलेल्या आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (R. Ashwin retires from International cricket.)






 

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले

छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Winter Farmers: राज्यातील थंडीमुळे केळी उत्पादकांना मोठा फटका

कडाक्याच्या थंडीचा केळी भागांना मोठा फटका. यंदा केळी एक्सपोर्ट होण्या अवघड. केळी उत्पादक चिंतेत. लाखो रुपयाचे नुकसान सोसावे लागणार. दरवर्षी एकट्या सोलापूर जिल्ह्यातून दीड हजार कोटींची केळी होतात निर्यात.  मात्र, सध्या पडू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळी भागांवर मोठ्या प्रमाणात चीलिंग चा प्रश्न गंभीरपणे समोर येऊ लागला .. सध्या सोलापूर जिल्ह्यात दहा डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तपमान खाली उतरल्याने जिल्ह्यातील सर्वच केळी भागात चिलिंगचा प्रश्न गंभीरपणे समोर आलेला आहे. चिलींगमुळे केळीच्या साली वर परिणाम होत असून त्यामुळे केळीच्या आतील गाभा प्रक्रिया करताना खराब होत आहे . यामुळे चीलिंग मधील केळीचा रंग बदलून तो एक्सपोर्ट ला जाऊ शकत नाही

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या समर्थकांचा नाशिकमध्ये मेळावा

मंत्रीपद नाकारलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थक उपस्थित राहणार आहेत बीडहून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत नाशिक मध्ये पोहोचले आहेत छगन भुजबळ यांचा अपमान झालेला आहे त्यामुळे भुजबळ जी भूमिका घेतली ती मान्य असेल असा दावा त्यांनी केला आहे. आम्ही भुजबळ यांना काही सांगण्यापेक्षा ते काय निर्णय घेतात त्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे

Maharashtra Cabinet: खातेवाटपाचा निर्णय आज होईल: शंभुराज देसाई

आज खातेवाटप अंतिम होईल आणि कदाचित जाहीर सुद्धा केला जाईल. जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशीच आम्हाला सुद्धा आहे. तिन्ही प्रमुख नेते खाते वाटपावर चर्चा करत आहेत. आता याला उशीर का लागतोय हे तीन नेतेच सांगू शकतील. पण जवळपास खातेवाटप पूर्ण झालेला आहे. आजच्या दिवस तुम्हाला वाट पहावी लागेल, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांचा अजितदादांना टोला

अजित दादा यांचा घसा खराब असल्याने मी त्यांना खोगो ची गोळी देणार आहे, ती अजित दादांनी घशात ठेवावी.  राज्यात ४१ बिन खात्याचे मंत्री आहे. त्यांच्याकडे विभागाच नसल्याने ते जनतेचे प्रश्न सोडू शकत नसल्याने दूर पळत आहे. त्यामुळे मंत्र्यांना रविभवन सोडून हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

बीड आणि परभणी प्रकरणी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार

आज बीड आणि परभणी प्रकरणी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत 


सुरेश धस यांनी ज्यांच्यावर आरोप केले तो व्यक्ती अजित पवारांच्या पक्षातील एका मंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता 


सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर बीड प्रकरणात गंभीर आरोप केला होता

छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल

ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू 


राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार 


भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिक मधे जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता


सूत्रांची माहिती

बीड-परभणीच्या मुद्द्यावरती आज सुरुवातीलाच विधानसभेत होणार चर्चा

बीड-परभणीच्या मुद्द्यावरती आज सुरुवातीलाच विधानसभेत होणार चर्चा


नाना पटोले, नमिता  मुंदडा, संदीप क्षीरसागर, नितीन राऊत, सुनिल प्रभू, जितेंद्र आव्हाड, अबू आझमी यावर सरकरला धरणार धारेवर


या चर्चेनंतर मुख्यमंत्री यावर उत्तर देणार


कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यावर मोठी घोषणा करण्याची शक्यता

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानसभेच्यानंतर विधानपरिषदेचे प्रमुख पदही भाजपकडेच राहणार आहे. भाजप महायुतीतर्फे राम शिंदे भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.