Maharashtra Breaking News Live Updates : कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार, माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून किल्ले रायगडावर छत्रपतींना नाण्यांनी अभिषेक
नविन वर्षाचा संकल्प समोर ठेऊन समितीकडून तरुणाईला वेगळा संदेश
कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार
माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
निवडणुकीत आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची मनात भावना
शिवाय, कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता
महिनाभरात राजन साळवी घेणार निर्णय
राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा
बीड बिग ब्रेकींग
वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला सुरुवात
बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची cid पथकाकडून चौकशी
Cid कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा पहिला दिवस
एक बंद खोलीत कराडची चौकशी केली जात आहे
ब्रेकिंग
धनंजय मुंडे यांच्या वाद प्रकरणात अजितदादांच्या उत्तराची प्रतीक्षा
अजित दादा सध्या नववर्षानिमित्त परदेशात असल्याची सूत्रांची माहिती
वाल्मिक कराड शरण आल्यावर मुंडेंंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष
आज नवीन वर्षाचा म्हणजेच 2025 चा पहिला दिवस आहे... आणि आज जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय...जेजुरी येथे आज नवीन वर्षाच्या सुरुवाती निमित्त अनेक भाविक भक्त हे खंडोबाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवात खंडोबाच्या आशीर्वादाने सुरू व्हावी या भावनेतून या गडावर आज हे भाविक आलेले आहेत. हजारोंच्या संख्येने भाविक हे आज सकाळपासूनच जेजुरी गडावर दाखल झालेले आहेत. खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर मोठ्या लांब रांगा लागलेल्या आहेत...
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावली ग्रामस्थांनी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून नववर्षाचे केले अनोखे स्वागत
जावळी तालुक्यातील सावली गावाने नववर्षाचे स्वागत महा श्रमदानाने केलय. सावली गावचे लोकनियुक्त सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून हे महाश्रमदानाचा अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील रस्ते नाले शाळा परिसर स्वच्छ केले. या राबवलेल्या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावली आणि क्रांती विद्यालय सावलीचे विद्यार्थी यांनीही सहभागी झाले होते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष
सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी होणार
न्यायालयाच्या निकालावर निवडणुकांचे भविष्य
यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार
राज्यातील २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित
चार वर्षांपासून निवडणुकीच्या सुनावणीवर 'तारीख पे तारीख' सुरुच
आज पासून राज्यभरातील सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ
महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील देण्यात येणाऱ्या सुविधा नुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे
ही 20% ते 30% दरवाढ असेल
नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांची माहिती
यंदाच्या वर्षीपासून प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये साजरे होणार विविध कार्यक्रम
- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय
-
सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये 26 जानेवारी रोजी पार पडणार विविध स्पर्धा*
-
दादा भुसे यांनी शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारताच घेतला निर्णय
सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण नंतर काढण्यात येणार प्रभात फेरी
-
देशभक्तीपर गीत गायन, भाषण, चित्रकला, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा खेळ स्पर्धाचे आयोजन करण्याचे शिक्षण विभागाचे शाळांना आदेश
किनवाटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन हैदराबाद मध्ये राहत्या घरी हृदयविकारचा धक्याने झाले निधन
नाईक हे 2009 ते 2014 साली होते किनवटचे आमदार.
त्यांचा काळात वाडी तांडा या भागाचा झाला होता विकास.
2019 साली भाजपचा केराम यांनी केला होता पराभव
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर नाईक यांनी शरद पवार यांचा सोबत राहायचा निर्णय
2024 च्या विधानसभेत झाला होता निसटता पराभव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मागासलेल्या आणि नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहे... या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहे, तर काही नव्या कामांचा भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे...
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, कराड यांच्या अटकेनंतर देशमुख हत्याप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात पारा चांगलाच घसरला असून सर्वदूर थंडीचा कडाका वाडला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -