Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर

Advertisement

Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर आक्रमक झाल्याने सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स

मुकेश चव्हाण Last Updated: 25 Feb 2025 12:41 PM
मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा; देशमुख परिवाराच्या पाठीशी

मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिला आहे. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवित अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे. 


घटना घडवून 77 दिवस झाले आहेत. या कुटुंबावर दुःख ओढवले आहे 


 त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत महाराष्ट्रातील पहिली घटना आहे या घटनेमुळे एका कुटुंबाला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे


ही घटना निंदनीय आहे न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे 


वारकरी संप्रदाय देशमुख परिवाराच्या पाठीशी उभा आहे 


महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली होती 


वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. महंतांनी ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे होते. 


महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाच्या मागे उभा राहिला पाहिजे 


 प्रत्येकाने या कुटुंबाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे.

Continues below advertisement
कोळशानं भरलेल्या ट्रकची दुचाकीला जबर धडक; अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी

गोंदिया : कोळसाभरून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा जाणाऱ्या एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झालेत. तर, भीषण अपघातानंतर दुचाकीनं अचानक पेट घेतला. यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर - तिरोडा मार्गावरील देव्हाळा गावाजवळ घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. जखमी दांपत्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक झाली. विविध मागण्या पूर्ण न झाल्याने मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे. पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही, बैठकीतून ग्रामस्थांचा एकमताने ठराव मांडण्यात आला. त्यामुळे मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर आक्रमक झाल्याने सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.