एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 45 जणांच्या नावांची घोषणा
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
बाळासाहेब थोरातांच्या शिष्टाईला यश
मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला
काँग्रेस- 105 जागा
ठाकरे गट जागा 95
शरद पवार 84 जागा
उद्या पत्रकार परिषदेत होणार घोषणा
मनसेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर,
अमित ठाकरे माहीममधून रिंगणात,
रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी
संदीप देशपांडे वरळीतून रिंगणात
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी महाराष्ट्रातून 51 लोकांनी आपले अर्ज दाखल केले आहे.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
काँग्रेस-103-108
शिवसेना ठाकरे गट -90 -95
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 80-85
मित्र पक्ष - 3-6
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज ठरण्याची शक्यता आहे.
मविआकडून आजच पत्रकार परिषद घेत जागांची घोषणा केली जाऊ शकते.
निवडणूकीत राजकीय पक्ष राहिले नसून टोळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कुठ्ल्याही टोळीत न जाता निवडणुक लढवणार आहे. आम्ही जी मुद्दे मांडत आहे ते कोणीही मांडता नाहित. शेतकरी आत्महत्या कोणीही बोलता नाही. म्हणुन आम्ही निवणुका लढवायची ठरवले आहे. राज्यातील 7 विधानसभा मतदारसंघात आम्ही लढणार अशी माहिती शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी आज दिली.
लाडकी बहिण योजना राज्याला आर्थिक दिवाळखोरी जात आहे. जनतेचे चोरा करण्याचे काम हे सगळे राजकीय पक्ष करतात आणि त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. व्यवस्था बदलना अभिप्रेत होते पण त्यातलं काहीच होत नाही म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. राज्यातील सर्वच्या सर्व जागा लढण्याचा आणि प्रयत्न करणार आहोत असं ही त्या यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणूक अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उस्मानाबाद तहसील मधून 27 लोकांनी 52 अर्जांची खरेदी केली. तर परंडा तहसील मधून 28 लोकांनी 54 अर्ज खरेदी केले. तुळजापूर विधानसभेसाठी पहिल्या दिवशी 22 लोकांनी 63 अर्जांची खरेदी केली. उमरगा मतदारसंघांत 16 व्यक्तींनी 34 अर्ज खरेदी केले. जिल्हाभरात 83 उमेदवारांनी पहिल्या दिवशी 203 अर्जांची खरेदी केली.
अजित पवारांचे निकटवर्तीय आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. लोकांचा आग्रह आहे की मी निवडणूक लढावी. लोकांनी सांगितले आधी तूतारी घ्या जर नाही घेतलं तर अपक्ष लढा असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आम्ही तुतारी हाती घेण्याचे ठरवले आहे. आता उद्यापर्यत निर्णय अपेक्षित आहे. रमेश थोरात हे सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आले आहेत. र
विधानसभेसाठी पहिल्या दिवशी बीड तहसील मधून 145 तर परळी तहसील मधून 49 अर्जांची विक्री; परळीत एका उमेदवाराने दाखल केला अर्ज तर बीडमधून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही
विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. बीडमध्ये पहिल्याच दिवशी 145 तर परळीत 49 अर्जांची विक्री झाली आहे. परळी विधानसभेसाठी पहिल्या दिवशी राजेभाऊ फड यांनी अर्ज दाखल केलाय. मात्र बीड मधून कोणत्याही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. बीडच्या तहसील कार्यालयामध्ये विधानसभे करिता सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आजच्या पहिल्या दिवशी 145 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अपक्ष उमेदवारांनी अर्जाची पहिल्या दिवशी खरेदी केली. उद्या हे अर्ज दाखल करणार आहेत. तर परळीत राजेभाऊ फड यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर
जामीनाच्या अटीशर्ती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश
अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेनं केली होती जामीनासाठी याचिका
मात्र, मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार
भाजपच्या जाहीरनाम्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार सागरवर दाखल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करणार चर्चा
भाजपच्या जाहीरनाम्याकडे राज्याचे लक्ष
नेमक्या कोणत्या घोषणा भाजप करणार? हे पाहणे असेल महत्त्वाचे
आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दौंडचे माजी आमदार तुतारी घेण्यास तयार
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात अजित पवारांची साथ सोडणार
रमेश थोरात तुतारी मध्ये येण्यास इच्छुक
दौंडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी अशी केली होती मागणी
लालकृष्ण आडवाणी यांनी स्वीकारली भाजपची सक्रिय सदस्यता
भाजपचं सध्या सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.
त्या अंतर्गत आज भाजप नेते विनोद तावडे यांनी घरी जाऊन आडवाणी यांना सक्रीय सदस्यत्व दिलं
महाविकास आघाडीची दुपारी तीन वाजता वाय बी चव्हाण येथे बैठक होणार आहे
या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल ज्या दहा ते पंधरा जागांवर तिढा आहे त्यावर जवळपास मार्ग निघत असल्याची माहिती आहे
दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये जागा वाटपासाठी ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि अंतिम सूत्र ठरवलं जाईल
दहा ते पंधरा जागांवर निर्णय झाल्यानंतर जवळपास महाविकास आघाडीचे संभाव्य सूत्र
काँग्रेस-१०३-१०८
शिवसेना ठाकरे गट -९० -९५
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - ८०-८५
मित्र पक्ष - ३-६
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे.
मुंबईतून घाटकोपर पूर्व साठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची सूत्रांची माहिती
उमेदवाराना तत्काळ कामाला लागता यावं यासाठी पक्षाकडून तत्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती
भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी केला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..
भाजपा सदसत्वाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे..
राजेंद्र मस्के यांच्यासोबत यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राजेंद्र मस्के हे अनेक दिवस भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होते मात्र आता राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे
खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी घेतली फडणवीस यांची भेट
तापकीर यांच्याकडून देखील शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांसह तापकीर थेट सागरवर
तापकीर यांना कामाला लागण्याच्या सूचना
पहिल्या यादीत तापकीर यांचं नाव नसल्याने तापकीरांच्या कार्यकर्त्यांची देखील धाकधूक वाढली होती
गायक आनंद शिंदे शरद पवारांच्या भेटीला
मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही
मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापूरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही
अहिल्यानगर फ्लॅश
पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी घेतली आ.बच्चू कडू यांची भेट...
सुपा येथे आ.बच्चू कडू आणि आ.विजय औटी यांची भेट...
भेटीनंतर विजय औटी तिसऱ्या आघाडीसोबत जाणार का? ...
माजी आमदार विजय औटी निवडणूक रिंगणात उतरल्यास पारनेरची राजकिय गणितं बदलणार...
2019 निवडणुकीत विजय औटी यांचा निलेश लंके यांच्याकडून झाला आहे पराभव...
विजय औटी यांच्या एन्ट्रीने मविआच्या संभाव्य उमेदवार राणी लंके यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता...
संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे.
संदीप नाईक नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते.
जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
कोल्हापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
कोल्हापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
कोल्हापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
कोल्हापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
कोल्हापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील मातोश्रीवर पोहोचले
के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहेत इच्छुक
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार
त्यामुळं इथून के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत
माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील अकोट मतदारसंघातून इच्छुक
कॅप्टन सुनील डोबाळे देखील अकोटमधून इच्छुक, डोबाळे सैन्यातून निवृत्त
अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकळे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने रस्सीखेच सुरु
दोन दिवसांआधी देखील रणजीत पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती
कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश होणार आहे
मातोश्रीवर थोड्याच वेळात होणार प्रवेश
स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी प्रवेशावेळी मातोश्रीवर दाखल
वडगांव शेरी मतदारसंघावर भाजपचा दावा
माजी आमदार जगदीश मुळीक यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
पोर्शे अपघात प्रकरणावरून विद्यमान आमदार सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात
टिंगरे यांना उमेदवारी नको, महायुतीतील कार्यकर्त्यांची मागणी
रोहित पवार
खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेले 5 कोटी शहाजी बापू पाटील यांचे असल्याचं सांगितलं जात आहे
लोकसभेला मतदारसंघात १०० कोटी वाट ले
आता विधानसभेला ५० कोटी वाटतील असं वाटतंय
जो मलिदा त्यांना मिळालाय तो वाटत आहे
मुंबईकडून हा पैसा जात होता
पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता त्याला बधणार नाही- रोहित पवार
भाजपचे माजी आमदार सुरेश धस देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
धस आष्टी मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक
बीड जिल्ह्यात महायुतीत रस्सीखेच कायम
आष्टी आणि गेवराई विधानसभेवरून पेच कायम
आष्टी आणि गेवराईत अदलाबदल करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चर्चा
अनेक पदाधिकारी अजित पवारांच्या पक्षातील नाराज आहेत. अनेक जण आमच्या सोबत येत आहेत- रोहित पवार
शहाजी पाटील यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे. एकूण ५ गाड्या होत्या. २५ कोटी रुपये होते अशी माहिती आहे. लोकसभेला यांनी खूप पैसा वाटला मात्र तरीदेखील लोकांनी याना स्वीकारलं नाही- रोहित पवार
शरद पवार यांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात मातोश्रीवर जाणार
१२ वाजता मातोश्री वरती जाऊन कांग्रेस हायकमांडचा निरोप पोहोचवणार
बाळासाहेब थोरात यांच्या चर्चेनंतर आज महाविकास आघाडीतील जागा वाटपांचा तोडगा निघणार
- मध्य नागपूर मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वीच पक्षाचे नेते भास्कर पराते यांनी घेतला निवडणूक उमेदवारी अर्ज
* पक्ष नेत्यांच्या निर्देशाप्रमाणेच उमेदवारी अर्ज घेत आहे- भास्कर पराते
- भास्कर पराते माजी नगरसेवक आणि भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव
- भास्कर पराते हे नागपूरातील बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक उमेदवारी अर्ज घेणारे पहिले उमेदवार ठरले...
- मध्य नागपूर मतदारसंघात हलबा समाजाला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली
- उमेदवारी जाहिर होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज घेऊन पक्षाच्या नेत्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांचा प्रयत्न आहे का असा ही प्रश्न
- पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या सुचनेनुसारच अर्ज घेतल्याचा पराते यांचा दावा
- भाजपने जारी केलेल्या पहिल्या यादीत मध्य नागपूर उमेदवार घोषित केले नसून या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे
- मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे हे विद्यमान आमदार आहेत
भाजपचे माजी खासदार संजय काकडे सागरवर दाखल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला काकडेंची सागरवारी
पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याची काकडेंनी नाराजी व्यक्त केली होती
काकडे यांची नाराजी सागरवर दूर होणार का? याकडे लक्ष
राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला
गायत्री शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक
राजेंद्र शिंगणे यांनी घड्याळाची साथ सोडताच गायत्री शिंगणे यांचा तुतारीची साथ सोडण्याचा निर्णय
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेद्वारी दिल्याबद्दल महायुतीत तणाव?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी?
आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच केला होता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार.
एवढं सगळ असतानादेखील त्यांच्या पत्नीला भाजपने उमेद्वारी दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य
भाजपच्या सेफ मतदारसंघात दावेदारी वाढली
बोरीवली मतदारसंघात पक्षांतर्गत रस्सीखेच सुरु
विद्यमान आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी
गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, स्नेहल शाह आणि शरद साटम यांची नावे चर्चेत
पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे बघणं महत्त्वाचं
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुती मध्ये पेच
-
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याना महायुतीतुनच आव्हान
-
माजी आमदार धनराज महाले शिवसेना शिंदें गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक
नरहरी झिरवाळ याना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी
-
- धनराज महाले बंड करण्याच्या तयारीत
-
24 तारखेला धनराज महाले उमेदवारी अर्ज भरणार
धनराज महाले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट
दिंडोरी मधून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विद्यमान आमदार
इगतपुरी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ला दिल्यानंतर दिंडोरी ची जागा शिवसेनेला सुटावी यासाठी शिवसैनिक आक्रमक
*
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर धनराज महाले ठाम
अखेर अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म घेतला
मागच्या काही दिवसांपासून अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जातील अशी चर्चा होती
मात्र अतुल बेनके यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेऊन एबी फॉर्म घेतला त्यामुळे इतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे
अखेर अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म घेतला
मागच्या काही दिवसांपासून अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जातील अशी चर्चा होती
मात्र अतुल बेनके यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेऊन एबी फॉर्म घेतला त्यामुळे इतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे
अखेर अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म घेतला
मागच्या काही दिवसांपासून अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जातील अशी चर्चा होती
मात्र अतुल बेनके यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेऊन एबी फॉर्म घेतला त्यामुळे इतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे
काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीने आणखी ३३ उमेदवारांची नावे निश्चित केली.
याआधी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत.
त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने आपले ८७ उमेदवार फायनल केले आहेत
आज काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओकला पोहोचले
बाळासाहेब थोरात यांना नाना पटोले यांच्या जागी समन्वय साधण्यासाठी काँग्रेसकडून जबाबदारी देण्यात आल्यानंतर बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांच्या भेटीला
आज महाविकास आघाडीची यादी येऊ शकते तत्पूर्वीची ही महत्वाची भेट
२०२६ ला बदलणार महाराष्ट्रातील ‘या’ ५ विधानसभा मतदारसंघाची नावं
सोबतच, ३ लोकसभा मतदारसंघांचीही नावे देखील बदलणार
डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार
औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ३ नावात बदल होणार
औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे नाव बदलणार
डिलिमिटेशन नंतर छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व अशी नावं होणार
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर तर उस्मानाबाद मतदारसंघाचं नाव धाराशिव होणार
त्याचप्रमाणे लोकसभेच्याही ३ मतदारसंघांची नावं बदलणार
अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा असे नामकरण होणार
या शहरांची नावे बदलली असली, तरी २०२६ पर्यंत मात्र मतदारसंघांची नावे जुनीच राहणार
मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) असतो
मुंबईच्या डोंगरी येथील बाल निरीक्षक गृहातील धक्कादायक प्रकार
एका विधीसंंघर्ष मुलाने बराकमधील दुसर्या मुलावर जबरदस्ती अनैसर्गिक करण्याचा केला प्रयत्न
अल्पवयीन तरुण हा नैसर्गिक विधीसाठी गेला असताना
आरोपी मुलाने मागून येऊन तरुणाच्या तोंडात गोळ्यांच पाकिट आणि पांढऱ्या रंगाची पावडरकोंबून
त्या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केले
या प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात ४,८,१२ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत
नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव च्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावच्या हद्दीत आज सकाळी भारतीय वेळेनुसार 06:52 वाजता 3.8 रिश्टर स्केलचा सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला. यावेळेस भूकंपाचं केंद्र जमिनीखाली पाच किलोमीटर एवढी होतं. याची दखल भारतीय भूकंप मापण यंत्रणेवर घेण्यात आली
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सांगली विधानसभा मध्ये चार जण उमेदवारी अर्ज भरणार आहेत. डॉ. संजय पाटील, युवराज शिंदे, विलास देसाई, अमोल गोटखिंडे या चार जणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मराठा समाजाची सांगली विधानसभा संदर्भात मराठा उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आदेशानुसार या चार जणांची उमेदवारी भरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 29 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जर त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून एखाद्या उमेदवारास किंवा सर्व उमेदवारास अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिल्यास मागे घेतील किंवा त्यातलाच एक उमेदवार उभे करण्याचे बैठकीमध्ये ठरविण्यात आलेय.
महाविकास आघाडी विदर्भ अपडेड
विदर्भात महाविकास आघाडी मध्ये १२ जागांसाठी टोकाचा संघर्ष सुरू असताना विदर्भातील एकूण १७ अजूनही होल्डवर ठेवण्यात आल्या..
आज ३ वाजता मुंबई येथे होणाऱ्या महाविकास आघाडीची बैठक आहे त्यात यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कळते.
ठाकरे गट व शरद पवार गटाने आपल्या प्राबल्य असलेल्या भागातल्या जागा सोडवून घेतल्या
मात्र शेवटच्या टप्प्यात फक्त विदर्भातल्याच जगाचा वाद रेंगाळत राहिल्याने काँग्रेसची मोठी दमछाक होतांना पाहायला मिळत आहे.
ही सुनियोजित रणनीती तर नाही ना असा प्रश्न काही काँग्रेसच्या नेत्यांनी काल दिल्लीत पक्ष श्रेष्ठी समोर उपस्थिती केला होता
आज पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होत आहे.
सकाळी ११ ते ३ ही अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे.
आयोगाच्या पत्रकानुसार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भारताचा कालावधी ठेवला आहे.
मात्र शनिवार व रविवारला उमेदवारी अर्ज भरता येणार नसल्याने उमेदवारांना अर्ज भरायला फक्त ६ दिवस मिळणार आहे.
त्यामुळे अनेक पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने उमेदवारांना शेवटच्या टप्प्यात अर्ज भरायला मोठी दमछाक करावी लागणार आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षबदल करत आहेत. तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेता, नेतेमंडळी हा निर्णय घेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील जागावाटपाचे त्रांगडे अद्याप मिटलेले नाही. संपूर्ण जागावाटप झालेले नसले तरीही भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने एकूण 99 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासा सुरुवात होणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. सकाळी 11 ते 3 ही अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे. त्यामुळे आजदेखील राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या घाडमोडी घडणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -