Maharashtra Breaking News LIVE Updates: Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: सतीश भोसले उर्फ खोक्याला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार आहेत. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 13 Mar 2025 06:53 PM
आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

ब्रेकिंग


आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी


(आयआयसीटी म्हणजे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी)


फिल्मसिटीत जागा देणार, केंद्र सरकार यासाठी ४०० कोटी देणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घोषणा

अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या... आधी दारू पाजली अन् कोयत्याने गळा चिरून केली हत्या

अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या... आधी दारू पाजली अन् कोयत्याने गळा चिरून केली हत्या... गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील सावंगी पदमपुर शेतशिवारातील घटना... 


Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे... श्रवण सोनवणे (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे...


मृतक नरेश चौधरी व आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून काल रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले.. तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला... दोघांनी मद्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश याच्यावर धारधार कोयत्याने वार केले.. यातच नरेश याचा मृत्यू झाला... आज सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे.. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...  घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...

पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली, आयटीयन्स न्यायालयात धावली.

पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली, आयटीयन्स न्यायालयात धावली.


आयटी हब हिंजवडी अन लगतच्या परिसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. परिणामी वाकड, ताथवडे परिसरातील रहिवाश्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्यानं आता हा लढा थेट न्यायालयात पोहचला आहे. वकील विकास शिंदेंनी न्यायालयात तशी याचिका दाखल केलीये. भविष्यात प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडू शकतं, हा संभाव्य धोका लक्षात घेत अनेक आयटीयन्स रस्त्यावर उतरले होते. तेंव्हा प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली, मात्र परिसरातील सिमेंट क्रशरच्या कारखान्यांना अभय देण्यात आलं. म्हणून अखेर न्यायालयात धाव घेत, शुद्ध हवेसाठी लढा लढला जातोय.


अॅड. विकास शिंदे आणि वाकड-ताथवडे येथील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये वाकड, ताथवडे आणि आसपासच्या भागांतील रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट्समुळे होणाऱ्या गंभीर हवेच्या आणि आवाजाच्या प्रदूषणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


या कायदेशीर नोटीसमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून AQI ३०० च्या वर गेली आहे, त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि IT क्षेत्रातील व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या RMC प्लांट्सनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून धूळ नियंत्रणाचे उपाय न केल्याने घरांच्या आत आणि रस्त्यांवर सिमेंटच्या धूळीचा थर निर्माण झाला आहे.


मुख्य मुद्दे:


१०-१२ हून अधिक RMC प्लांट्स हे शाळा आणि निवासी सोसायट्यांच्या अगदी जवळ कार्यरत आहेत.
(उदा. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल इ.)


ट्रकची अनियमित वाहतूक प्रचंड धूळ, आवाज आणि रस्त्यांचे नुकसान करत आहे.


प्रशासन जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.



सरकारी दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ५०० हून अधिक रहिवाशांनी ८ मार्च २०२५ रोजी शांततापूर्ण आंदोलन केले. हे आंदोलन वाकड-ताथवडे हाऊसिंग सोसायटी फोरमच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


नोटीस मधील प्रमुख मागण्या:


1. १५ दिवसांत RMC प्लांट्सची MPCB, PMRDA आणि PCMC यांनी संयुक्त तपासणी करावी व अहवाल जाहीर करावा.


2. प्रदूषण नियंत्रणाचे नियम कठोरपणे अंमलात आणावेत. (उदा. धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी, बॅरिकेड्स, संपूर्णपणे बंदिस्त यंत्रणा आदी.)


3. नियमांचे पालन न करणारे RMC प्लांट्स कायमस्वरूपी बंद करावेत किंवा रहिवासी क्षेत्राबाहेर हलवावेत.


अॅड. विकास शिंदे यांनी, जर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर या प्रकरणात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढली जाईल. असा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय.

सोळा लाखांचा हरभरा पळवणाऱ्या तिघांना अटक

: नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथून व्यापाऱ्यांचा सोळा लाख रुपयांचा हरभरा चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी चोरीच्या ट्रकसह हरभरा जप्त करत फिर्यादी व्यापाऱ्याला परत केलाय. आरोपींनी ट्रकला बनावट नंबर प्लेट लावत सहाशे पोते हरभरा पळवला होता. पोलिसांनी या चोरीचा छडा अवघ्या 48 तासात लावलाय.

विरार बारावी परीक्षेचे उत्तरपत्रिका पेपर जळीत प्रकरण अपडेट

विरार :- विरार बारावी परीक्षेचे उत्तरपत्रिका पेपर जळीत प्रकरणात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.. 


शासनाचा प्रतिनिधी म्हणून जोत्स्ना शिंदे ह्या पेपर जळीत प्रकरणात बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून, गुन्हा दाखल करीत आहेत. 


ज्योत्स्ना शिंदे यांच्या सोबत पालघर च्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगीता भागवत याही सोबत आहेत. 


ज्या शिक्षकाच्या घरी बारावी च्या उत्तर पत्रिका जळाल्या त्या शिक्षिकेला ही पोलीस ठाण्यात बोलाविले आहे. 


या सर्व प्रकरणाचा बोळींज पोलीस ठाण्या समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी


wkt प्रभाकर कुडाळकर

आत्महत्या केलेले युवा शेतकरी कैलास नागरे यांच्यावर अंतिम संस्कार

*बुलढाणा फ्लॅश


आत्महत्या केलेले युवा शेतकरी कैलास नागरे यांच्यावर अंतिम संस्कार .


कैलास नागरे यांचा मूळ गावी शिवनी आरमाळ या गावी अंत्यसंस्कारविधी संपन्न.


मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम विधी संपन्न.


देऊळगाव राजा व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी अंत्यविधीला उपस्थित.


आज सकाळी कैलास नागरे यांनी केली होती आत्महत्या.

जयंत पाटील हवेहवेसे वाटताहेत ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे: सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे


महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या खूप खूप शुभेच्छा


रंग लावा बाईक बाईक वर फिरा परंतु सांभाळून हेल्मेट वापरा घरी कोणीतरी वाट पाहता येईल हे लक्षात ठेवा


मतदारसंघांमध्ये आले की कामाचा आढावा घेत असते


छोट्या मोठ्या गोष्टी सोडवाव्या लागतात 


Co ordination करून या गोष्टी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे 


पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली आहे 


कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते


मी माननीय मंत्री गडकरी साहेबांचे आभार मानते


 सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केले म्हणून आता हा पूल होत आहे


गडकरी साहेबांचे नेहमीच सहकार्य असतं त्यांचं मी पुन्हा आभार मानते


ऑन खोक्या


आजकाल वर्दीची भीतीच राहिली नाही 


अगदी वाल्मीक कराडने देखील व्हिडिओ टाकला आणि मी येतोय असं सांगितलं


हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मीक कराडने केलेला अपमान आहे


महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली 


पुण्या मधला डेटा सांगतो किती मोठी गुन्हेगारी वाढली आहे


ऑन बीड गुन्हेगारी


मी बीडच्या पोलीस अधीक्षकांचे पहिल्यांदा आभार मानते 


त्यांनी फक्त पहिलं नाव लावायचं अशी मोहिम हाती घेतली त्यांच्या मी आभार मानते 


त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत 


अनेक गोष्टी बीडमध्ये घडत होत्या त्या बाहेर येत नव्हत्या त्यात बाहेर येऊ लागले आहेत


मी दोन्ही कुटुंबाच्या संपर्कात आहे 


आधीपेक्षा सगळ्या तपासात सुधारणा आहे पण अजून खूप काही करण्यासारख आहे


सरकारने नैतिकता दाखवली नाही परंतु माध्यमांनी नैतिकता दाखवली


ऑन धंगेकर


माध्यमांमध्ये काही बातम्या आले आहेत तुम्हालाच माझ्यापेक्षा चांगलं माहिती की नेमका प्रवेश का केला आहे



पुण्याचे पालकमंत्री आता बीडचे पालकमंत्री आहेत त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावली आहे मागील गुन्ह्यांची 


परंतु आमची मागणी आहे पारदर्शकपणे ही सगळी इन्क्वायरी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे


ऑन जयंत पाटील


मी इकडे यायच्या अगोदर जयंत पाटलांना एक तास भेटून आली आहे 


राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केल आहे


इतकी मोठी संघटना इतका मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेहवेसे वाटताहेत ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे



चंद्रकांत पाटील ड्रग्स मुक्त अभियान
 
चंद्रकांत पाटील केवळ कोथरूडचे नेते नाहीत ते राज्याचे नेते आहेत त्यांनी संपूर्ण पुण्यात ड्रग्समुक्त अभियान केले पाहिजे


ऑन जेजुरी ड्रेसकोड


आपण महाराष्ट्रातील नागरिक आहोत 


आपण सगळे चांगले व्यवस्थित कपडे घालून जातो 


देवस्थान ने अशी ऑर्डर का काढली हे मला माहित नाही


 देवस्थान शी बोलून ठरवेल 


परंतु त्यांना असे ऑर्डर का काढावे लागली हे त्यांच्याशी बोलून ठरवेल

जालना – परतुरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला!

जालना – परतुरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला!



होळी निमित्ताने अवैध रित्या दारू साठा करून विकणाऱ्यांवर कारवाई साठी गेलेल्या पथकावरती हल्ला. 


परतुर तालुक्यातील गुळखंड तांडा येथील घटना.


अँकर -जालना जिल्ह्यातील परतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळखंड तांडा येथे दुपारी दारूबंदी पथकावर जमावाने हल्ला केला.


दारू साठ्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण आणि दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी जखमी झाले आहेत.


दारूबंदी पथकात २ अधिकारी, ४ कर्मचारी आणि १ महिला कर्मचारी होते. दुपारी खबरेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने या गावात छापा टाकला ,मात्र छाप्यादरम्यान अचानक जमाव आक्रमक झाला आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून 


परतुर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

खोक्याच्या घरावर बुलडोझर

खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली आहे. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोख्या उर्फ सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. 

मेहबूब शेखांकडून पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न, शरद पवार गटातील नेत्यांचे शरद पवारांना पत्र

ब्रेकींग
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युथ विंगचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांचं पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पत्र 



पत्रात युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची पक्ष प्रमुखांकडे तक्रार 


मेहबूब शेख यांच्याकडून स्वतःचा गट निर्माण करण्याच्या प्रयत्नातून अनेक पदाधिकार्यांना डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख 


टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या नादात पक्षाचा टप्प्यात कार्यक्रम सुरू असल्याचा पत्रात आरोप

अंबा-एकवीरा संस्थानमध्ये नवसाच्या नारळाची होळी

अंबानगरीच्या होळीला पौराणिक इतिहास आहे.


अंबा-एकवीरा संस्थानमध्ये नवसाच्या नारळाची होळी.


दोनशे वर्षाची परंपरा असलेली अंबादेवी मंदिरातील अनोखी होळी..


नारळ-चाकोलीचे हार भाविक अर्पण करत असतात. 


अमरावतीच्या होळीला पौराणिक इतिहास आहे, शहराची कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये होळीच्या दिवशी जाळण्यात येणारे होळी पौर्णिमेला उभारले जाते, ज्याला भक्ती वृक्ष म्हणून आध्यात्मिक महत्त्व आहे, ही होळीची झाडे, ज्याची स्थापना होळीच्या एक महिना आधी (माघ पौर्णिमेला) केली जाते...


माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमा या महिनाभरात अंबादेवी, एकवीरा देवी संस्थानमध्ये या होळीच्या झाडांना नारळ-चाकोलीचे हार अर्पण केल्या जाते.. आज या होळीचे दहन होईल..

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती लोकसभा मधील खडकवासला दौऱ्यावर 

पुणे 


खासदार सुप्रिया सुळे आज बारामती लोकसभा मधील खडकवासला दौऱ्यावर 


सुप्रिया सुळे वारजे येथील पुलावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाची पाहणी करणार 


खडकवासला मतदार संघात सुरू असलेल्या पुलाच्या प्रकल्पाची सुप्रिया सुळे करणार पाहणी 


थोड्याच वेळात सुप्रिया सुळे दाखल होणार


Live out given

वाशिम मध्ये पेटवली वाईट व्यसनांची होळी...

वाशिम
वाशिम मध्ये पेटवली वाईट व्यसनांची होळी...
 वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाम इथं गेल्या 19 वर्षा पासून वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा रूढ झाली आहे..
मानवी जीवनात  व्यसनाधीनंता अधिक वाढ होतयं ..त्या मुळे मानवी जीवणास वाईट असलेली व्यसनाची होळी पेटवण्यात आली. मानवी शरीरासाठी हानिकारक असलेल्या तंबाखू, बिड्या, सिगारेट, गुटखा या होळीमध्ये जाळण्यात आले. संकल्प फाऊडेशनच्या वतीने आयोजित  स्मशान होळीनिमित्त स्वच्छ करण्यात आले गेल्या 19 वर्षा पासून हा स्मशान होलिकोत्सव साजरा केला जातो.

परभणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी शिक्षक सेनेंचे जोरदार आंदोलन 

परभणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी शिक्षक सेनेंचे जोरदार आंदोलन 


शिक्षकांनी अर्थसंकल्पाची होळी करत सरकार विरोधात मारली बोंब 


सरकारने आश्वासन देवुनही राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षकांसाठीचा २०%टप्पा वाढ अनुदानासाठी तरतूद न केल्याने परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी शिक्षक सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक सेनेच्या राज्याच्या अर्थसंकल्प प्रतीची होळी करण्यात आली यानंतर राज्य सरकार विरोधात या शिक्षकांनी होळीच्या दिवशी बोंबा मारुन आंदोलन केले आहे सरकारने आम्हाला हलक्यात घेवून नये लवकरात लवकर टप्पा वाढ झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी दिला आहे.

कशेडी टनेल मध्ये कडाक्याच्या उन्हात देखील मोठ्या प्रमाणात गळती

ब्रेकिंग 


कशेडी टनेल मध्ये कडाक्याच्या उन्हात देखील मोठ्या प्रमाणात गळती.


बोगद्याच्या वरील बाजूने प्रचंड प्रमाणात पाणी झिरपत असल्यामुळे प्रवाशांचा उडतोय गोंधळ.


गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पावसाळ्यात करण्यात आली पाहणी.....मात्र. बोगद्यातील गळती रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाला अपयश.


भर उन्हाळ्यात देखील बोगद्यात अखंडितपणे सुरू असलेला पाण्याच्या गळतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने संभ्रम.


कोकणात येणाऱ्या चाकर मागण्यांसाठी बोगद्याच्या दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली.


मात्र अर्ध्याहून अधिक बोगद्यातला वीजपुरवठा बंद...

चार दिवसांपूर्वी बनवण्यात आलेलं रस्त्यावरचं डांबर लगेच उखडलं

कोल्हापूर


चारच दिवसांपूर्वी बनविण्यात आलेल्या रस्त्यावरील डांबर वितळले


रस्त्यावरून गाड्यांची ये-जा झाल्याने हे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले 


कोल्हापुरातल्या पाण्याच्या खजिन्यापासून बिनखांबी गणेश मंदिर रोडवरील प्रकार


स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले सवाल

पुण्यात ओळखीचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार

पुण्यात स्वारगेट चे घटना ताजी असतानाच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केलाय इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात आहे. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वीस दिवसानंतरही त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही... पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे... तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले...यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे...


 

पेण कोळीवाड्यातील गंगनचुंबी होळी नागरिकांचे खास आकर्षण 

40 फूट उंचीची होळी पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने नागरिक राहतात उपस्थित 


Anchor - कोकणात सध्या गावाकडे ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोळी बांधवांचा हा आवडीचा सण आहे. या सणाची पूर्व तयारी म्हणून जंगलातील उंच अशा सावरीच्या झाडांची निवड करुन ती होळी वाजत गाजत कोळीवाड्यात आणली जाते.कोळी  बांधव हा सण पाच दिवस साजरा करतात.यंदा पेण कोळीवाड्यात ४० फूट उंच होळी उभारण्यात आली आहे.आकाशाला भिडणारी ही उंच होळी पाहण्याकरिता हजारो नागरिकांची पेण शहरात  आज रात्री मोठी गर्दी उसळणार आहे.

मनपा मालमत्ता कर भरणार नाही उद्योजकांची भूमिका नोटीसीची केली होळी

मनपा मालमत्ता कर भरणार नाही उद्योजकांची भूमिका नोटीसीची केली होळी.. हलगी लावली.. मिरवणूक काढली नोटीसीची होळी केली...


महापालिकेने मालमत्ता कर भरणा करण्यासाठी बजावलेल्या नोटीसीची लातूरच्या एमआयडीसीतील उद्योजकांनी केली होळी; मालमत्ता कर भरणा न करण्याची उद्योजकांची भूमिका



     लातूरच्या एमआयडीसीतील उद्योजक गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर रद्द करावा, यासाठी संघर्ष करताहेत... त्यातच लातूर महापालिकेने आता उद्योजकांना मालमत्ता कराच्या वसुलीबाबत अंतिम नोटीसा बजावल्या असून, यामुळे उद्योजकांनी आता हा महापालिकेने आकारलेला जाचक मालमत्ता कर आम्ही भरणार नाही, असा पवित्रा घेत आज महापालिकेच्या नोटीसांची होळी केली. लातुरातील एक नंबर चौकात एमआयडीसीतील उद्योजकांनी एकत्रित येत गोवऱ्यांची होळी रचत त्यात नोटीसांचे दहन केले. एमआयडीसीतील उद्योजकांना कसल्याही प्रकारच्या सुविधा न देता महापालिकेकडून मालमत्ता कर आकारला जात आहे. तसेच राज्यात अनेक एमआयडीसी महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आल्या आहेत. त्याच प्रकारे लातूरच्या एमआयडीसीला महापालिका हद्दीतून वगळावे, अशी मागणी उद्योजकांनी राज्य सरकारकडे केलीय.

कांदिवलीचा एलआयसी कार्यालयामध्ये मनसेच्या ठिय्या आंदोलन सुरू

मागील अर्धा तासापासून कांदिवलीचा एलआयसी कार्यालयामध्ये मनसेच्या ठिय्या आंदोलन सुरू आहे



एलआयसी कडून माफीनामा घेतला शिवाय मनसे कार्यकर्ता LIC कार्यालय मधून बाहेर निघणार नाही


मनसे आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कांदिवली एलआयसी कार्यालयामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

नाशिकमधील घरफोड्या चर्चेचा विषय 

नाशिक ब्रेकिंग -


- नाशिकमधील घरफोड्या चर्चेचा विषय 


- नागरिकांसह पोलिसांच्याही घरी चोरीच्या घटना 


- गेल्या पंधरवाड्यात ८ ते १० घरफोडीच्या घटना 


- म्हसरूळ परिसरातील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद 


- स्वामी विवेकानंद परिसरातील हत्यारबंदी चोरट्यांचा धुमाकूळ 


- चोरट्यांना पकडण्याचे नाशिक पोलिसांसमोर आव्हान


- तर नागरिकांकडून कठोर कारवाई मागणी...

आखाडा बाळापूर दगडफेक प्रकरणी परस्पर तक्रारीवरून २०० जनावर गुन्हा दाखल 

हिंगोली 


काल रात्री किरकोळ वादातून झाला होता राडा 


अँकर 
काल रात्री हिंगोलीच्या आखाडा बाळापुर येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता या वादामध्ये नागरिकांनी मोठ्या   प्रमाणात दगडफेक केली होती त्यामुळे आखाडा बाळापूर गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून तब्बल 200 जणांच्या विरोधामध्ये आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची पोलीसाकडून आता धरपकड सुरू करण्यात आली असून आता गावात शांतता आहे

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी तीन आरोपी अद्यापही  फरार

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी तीन आरोपी अद्यापही  फरार आहेत,या सगळ्या संदर्भात एकनाथ खडसे यांच्या सोबत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे
छेड खानी प्रकरणात जे आरोपी फरार आहेत,ते त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण असल्याने,त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने पोलिस त्यांना  जाणीव पूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे
नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही,शेतकरी साठी या मधे कोणतीही तरतूदी नाही,शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहिण योजना या निवडणुकी साठी जिंकून येण्या साठी योजना होत्या,मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट असल्याने,या योजना साठी सरकाराला पैसे देणे मोठे काम आहे

पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान विभागाने कालपासून तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. काल अकोला राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर होतंय. काल अकोल्याचं तापमान 41.3अंशावर गेलंय. अकोलेकर सध्या या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झालेयेत. गेल्या आठवडाभरात अकोल्याचं तापमान सातत्यानं 39 ते 41 अंशांदरम्यान फिरंतये. काल अकोल्याचा पारा 41.3अंशांवर होताय. आजही अकोल्यात तशीच परिस्थिती आहेय. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम झालाय तो अकोला शहरातील जनजीवनावर. 

आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धोका पोहोचल्यामुळे ते धांदांत खोटा आरोप

भाजप आमदार अतुल भातखळकर बाईट
 


ऑन अमोल मिटकरी मुस्लिम मावळे यादी


अमोल मिटकरी यांचा इतिहास कच्चा आहे 


छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच या देशातील मुघल आक्रमण संपवण्याकरता झाला होता 


छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदू धर्म हिंदू संस्कृती करिता काम केलं 



त्यामुळे खोटा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत 


रायगडावर मशीन बांधली होती असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही


 छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचा आराध्य दैवत आहेत ते मुगल आक्रमक यांच्या विरोधात आहेत 


ऑन वरळी भोंगा आदित्य ठाकरे नाराज


मुळात कुठल्याही लाऊड स्पीकर असे खाली केले नाहीत 


मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न मी उपस्थित केला त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धोका पोहोचल्यामुळे आदित्य ठाकरे असा दादांत खोटा आरोप करत आहेत 


अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीच्या वेळी दिले यावेळी याविषयी उभाटाची काय भूमिका आहे ते त्यांनी स्पष्ट करावे 



ऑन पुरस्कार विजेता शेतकरी आत्महत्या


अत्यंत दुर्दैवी घटना आहे 


कोणीही आत्महत्या करणे विशेषतः शेतकऱ्याने आत्महत्या करणे 


माझी विरोधी पक्षांना विनंती राहील यावर राजकारण करू नका


 केंद्रात दहा वर्षे कृषी मंत्री पद हे त्यांच्या नेत्यांनी भूषवलं होतं 


शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याच्या दिशेने या सरकारने खूप पावले उचलली आहेत


 बळीराजा कृषी संजीवनी योजना , पंतप्रधान कृषी संजीवनी योजना,  जलसंपत्ती खात्याच्या मार्फत वेगवेगळे प्रोजेक्ट आणि शाश्वत शेतीकडे कमी जाण्याचा प्रयत्न करतो. 


येणाऱ्या काळात प्रत्येकाला शाश्वत शेती मिळेल असा आमचा प्रयत्न असेल 



ऑन मनगुंटीवार नाराजी


 नाराज नाहीत की त्यांनी सांगितलं आहे अशा नाराजीच्या बातम्या तुम्ही चालवता 


त्या संदर्भात त्यांनी या गाण्याचा उल्लेख केला त्यामुळे मला असं वाटतं की चुकीच्या बातम्या करणे योग्य नाही 


ऑन राज्यावरील कर्ज


जगात असं कोणतं सरकार नाही ज्यावर कर्ज नाही 


अमेरिकेवर देखील कर्ज आहे


 कुठले राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली की वाईट हे ठरवण्याचा एक मापदंड महत्त्वाचा असतो 


तो म्हणजे त्याच्या राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचा असलेल्या प्रमाण 


आपल्या देशात राज्य सरकारच्या उत्पन्नाचे उत्पन्न 25% असेल तर राज्य आर्थिक स्थितीत सुस्थितीत आहे हे हा आरबीआयचा मापदंड आहे 



ऑन आचार्य तुषार भोसले 


ग्रामसभेने एक निर्णय घेतला होता ग्रामसभेचा निर्णय तहसीलदारांनी रद्द केला


 जेव्हा ग्रामसभेने काही निर्णय घेतला तेव्हा काही विचारपूर्वक घेतला होता 


तहसीलदारांनी तो रद्द केला


 त्या ठिकाणच ग्रामस्थ यातून जो मार्ग काढतील तो आवश्यक काढतील 


ऑन अबू आजमी


अबू आजमी ला बडगा मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणारे ट्विट देखील केलं 


त्यामुळे या देशातील हिंदू हा नेहमीच सहिष्णु असतो, शांतता प्रिय असतो 


मुस्लिम समाजाला दिला आहे तो योग्य दिला आहे


 त्यामुळे त्यांना मी एवढेच सांगेल या देशात कायद्याचं राज्य आहे 



कायद्या अंतर्गत प्रत्येकाने वागलं तर मुख्य म्हणजे अबू अजमीने आपलं तोंड बंद ठेवलं तर असे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत....

होळी आणि धूलिवंदनासाठी वसई-विरारमध्ये पोलीस सतर्क

विरार :  होळी आणि धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वसई विरार शहरातील मुख्य रस्ते, चौक, समुद्रकिनारे आणि संवेदनशील भागांत पोलीस तैनात करण्यात आले असून,  सीसीटीव्हीद्वारे ही देखरेख केली जात आहे. 
वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सणाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

मृतदेहाचा पित्याने परस्पर दफनविधी केल्याने आईला मुलीच्या घातपाताची संशय, पोलिसात तक्रार

नाशिक ब्रेकिंग...


- एक वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूचा आईला संशय पोलिसात केली तक्रार


- मृतदेह पोलिसांनी स्मशानभूमीतून काढला उकरून  


- खेळताना विहिरीत पडल्याचा दावा खोटा असल्याचा आईचा आरोप...


- पती-पत्नीच्या वादामुळे चिमुकली होती राहण्यासाठी वडिलांकडे , वडिलांकडे असतानाच झाला मृत्यू


- बालिकेच्या मृतदेहाचा पित्याने परस्पर दफनविधी केल्यामुळे  आईने मुलीचा घातपाताची संशय व्यक्त करत पोलिसांकडे केली तक्रार


- वैष्णवी विकास वळवी ही चिमुकली मखमलाबाद शिवारात सोमवारी पडली होती विहिरीत ..



- मृतदेह बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेला मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले ..



- मृतदेह जिल्हा रुग्णालयात न नेता आईला गावावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने वडिलांनी मृतदेह पुरून टाकला...
  
- आईने  डायल ११२ ला केलेल्या तक्रारीनंतर , न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी मृतदेह उखरून जिल्हा रुग्णालयात केला दाखल ...


-  पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद  ...


- पोलीस तपासात आणि शवविच्छेदनात काही आढळल्यास कारवाई केली जाणार - पोलीस उपायुक्त.

विरार येथे जळालेल्या उत्तर पत्रिकेप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार 

वसई - विरार येथे जळालेल्या उत्तर पत्रिकेप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार 


संबंधीत शिक्षक आणि प्राचार्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार 


उत्तरपत्रिका कॅालेज मध्येच तपासणी करणे नियमाने बंधनकारक असताना 
घराकडे घेवून गेल्याने गुन्हा दाखल होणार 


जळालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्याचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.


गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे. 


आत्पकालीन परिस्थिती आल्यास उत्तरपत्रिका नष्ट झाली असल्यास….
 इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून संबंधीत विषयाचे गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होतं नाही 


गेल्या आठवड्यात कामोठे येथे रस्त्यावर पडलेल्या उत्तरपत्रिके प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडलेल्या उत्तरपत्रिका सुरक्षित मिळाल्या आहेत.

ठाण्यात चरई परिसरात 14 दुकानांमध्ये झाली चोरी

Flash 


ठाण्यात चरई परिसरात 14 दुकानांमध्ये झाली चोरी, 


एकाच चोरट्याने तब्बल 14 दुकानांचे शटर फोडून आठ दुकानांमधील 27 हजारांचा मुद्देमाल केला लंपास


या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज मधून चोरी झाली उघड 


नौपाडा पोलिसांनी या चोराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 A आणि कलम 331 द्वारे गुन्हा केला दाखल 


काल पहाटे घडला प्रकार

'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे' पोस्टरकर्त्यानं केलं बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मराठी लोकांची इच्छा आहे... अशा आशयाचे पोस्टर्स सेना भवनाच्या समोर काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते 


 पोस्टर्स लावणारे मोहनिश राऊळ यांनी "बंधू मिलन" कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केला आहे... यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे...

हसन मुश्रीफ बाईट मुद्दे हसन मुश्रीफ ऑन समरजित घाटगे शाहू हॉल 100 ते 150 वर्षांपासून नगरपालिकेच्या ताब्यात आहे विक्रम सिंह राजे यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते आता त्यांच्या पूर्वजांनी जागा दिली होती ती आता परत द्या असं म्हणणं कितपत उचित आहे मी त्यांना विकास यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती राजकारणात, समाजकारणात आला असेल तर समाजासहित बघणं देखील गरजेचे आहे फक्त आपली इस्टेट सांभाळणं काम नाही ठीक झालं छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या नाहीत ते शाहू महाराज कुठे आणि हे कुठे? त्यांनी मान्य नाही केलं तर जनता रस्त्यावर उतरले हसन मुश्रीफ ऑन लाडकी बहीण आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो आम्ही योग्य वेळी 2100 रुपये करू आणि योग्य वेळी कर्जमाफी करू याची चिंता कोणी करू नये: हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ बाईट मुद्दे


हसन मुश्रीफ ऑन समरजित घाटगे


शाहू हॉल 100 ते 150 वर्षांपासून नगरपालिकेच्या ताब्यात आहे


विक्रम सिंह राजे यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते


आता त्यांच्या पूर्वजांनी जागा दिली होती ती आता परत द्या असं म्हणणं कितपत उचित आहे


मी त्यांना विकास यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती


राजकारणात, समाजकारणात आला असेल तर समाजासहित बघणं देखील गरजेचे आहे फक्त आपली इस्टेट सांभाळणं काम नाही


ठीक झालं छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या नाहीत


ते शाहू महाराज कुठे आणि हे कुठे?


त्यांनी मान्य नाही केलं तर जनता रस्त्यावर उतरले



हसन मुश्रीफ ऑन लाडकी बहीण


आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही


जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो आम्ही योग्य वेळी 2100 रुपये करू आणि योग्य वेळी कर्जमाफी करू याची चिंता कोणी करू नये

ठाण्यात चरई परिसरात 14 दुकानांमध्ये झाली चोरी

ठाण्यात चरई परिसरात 14 दुकानांमध्ये झाली चोरी, 


एकाच चोरट्याने तब्बल 14 दुकानांचे शटर फोडून आठ दुकानांमधील 27 हजारांचा मुद्देमाल केला लंपास


या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज मधून चोरी झाली उघड 


नौपाडा पोलिसांनी या चोराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 A आणि कलम 331 द्वारे गुन्हा केला दाखल 

पुण्यातील नामांकित ILS लॉ महाविद्यालयाकडून उकळली जातेय अतिरिक्त फी, विद्यार्थ्यांचा आरोप 

पुण्यातील नामांकित ILS लॉ महाविद्यालयाकडून उकळली जातेय अतिरिक्त फी, विद्यार्थ्यांचा आरोप 


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आंदोलन 


विद्यार्थ्यांनी मागितलेली माहितीच्या अधिकारातील माहिती धक्कादायक समोर आली होती 


चार ते पाच हजार फी ऐवजी घेतली जात आहे 41 ते 42 हजार रुपये फी, त्यामुळे विद्यार्थी आक्रमक


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी झाल तर कायदेशीर कारवाई करू, अशा नोटीस महाविद्यालयात लावून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न 

भंडाऱ्यात 200 बैलजोडींच्या मदतीनं गरदेव यात्रेसाठी आणलं भलंमोठं कापलेलं वृक्ष

भंडारा : पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही अनेक ठिकाणी तेवढ्याचं उत्साहात साजरा होत असल्याचं बघायला मिळतंय. भंडाऱ्याच्या आष्टी गावात धुळवडीच्या दिवशी साजरी होणारी गरदेव यात्रेची मागील 170 वर्षांची परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी होतेय. या यात्रेसाठी जंगलातून एकमेकांसमोर उभे असलेले दोन भलेमोठे उंच वृक्ष कापून ते गावातील 200 बैलजोडींच्या मदतीनं ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात ओढत आणलं जातं. ही परंपरा यावर्षीही ग्रामस्थांनी कायम ठेवली असून मोठ्या उत्साहात हे दोन वृक्ष गरदेव यात्रेसाठी आणल्या गेलं. धुळीवंदनाच्या दिवशी या लाकडांची भक्तिभावानं पूजा करून त्यावर वांग्याला गर लावून ते चारी दिशेनं फेकण्याची परंपरा आहे. या यात्रेत महाराष्ट्रचं नव्हे तर, लगतच्या मध्यप्रदेशातूनही लाखो श्रद्धाळू आष्टी गावात येत असतात.

धुळ्यात काँग्रेसने केली भ्रष्टाचाराची होळी

धुळे : जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन येथे होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसने भ्रष्टाचाराची होळी करत राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा निषेध व्यक्त केला. राज्यामध्ये वाढती बेरोजगारी, वाढती गुंडगिरी महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण यासह महानगरपालिकेत भाजपाने केलेला भ्रष्टाचार याचा निषेध व्यक्त करीत काँग्रेसने भ्रष्टाचाराची होळी केली. काँग्रेस भवन येथे झालेल्या या होळीच्या कार्यक्रमात भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

होळीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी गोवऱ्या दाखल

नाशिक : होळीनिमित्ता पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी गौऱ्यांचा वापर केला जातो. नाशिकमध्ये गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. नाशिक शहराच्या आजूबाजूच्या गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या माध्यमातून नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या गौरी पाटांगणावर गोवऱ्या विकण्यासाठी आदिवासी बांधव दाखल झाले आहे. होलिकोत्सवासाठी शहरातील विविध मंडळे येथून गोवऱ्या खरेदी करतात. गेल्या वर्षी 3 रुपयांना 1 गौरी तर 300 रुपये शेकड्याने गोऱ्या उपलब्ध होत्या. यंदा मात्र या गौऱ्यांना 400 रुपये तर थोड्या मोठ्या गोऱ्या 500 रुपये शेकड्याने विक्री होत आहेत. वाहतुकीचा, जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढल्याने गोवऱ्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन

शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन


17 मार्च रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा


हिंदुराष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मोर्चा


शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे ही मागणी


तेलंगणाचे भाजप आमदार टी राजासिंह राहणार मोर्चासाठी उपस्थित

राज्य अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या १० हजार कोटींच्या निधीला कात्री

राज्य अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या १० हजार कोटींच्या निधीला कात्री.


राजकिय साठमारीत राज्यातील शहरांमधील विकास कामांचा वेग मंदावणार.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, नीधी कपातीमुळे विकास कामांना खिळ बसेल आणि त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होऊ शकतो.


गेल्या अडीच वर्षात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विकास कामांना प्रचंड वेग आलेला आहे. नगरविकास विभागाने त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला होता.


पण या निधीला आता अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विकास कामांची निधी अभावी रखडपट्टी होण्याची शक्यता आहे.


 तसेच शहरांतील पायाभूत विकासाची नवी कामे हाती घेणंही शक्य होणार नाही.  नगरविकास निधीला कात्री लावल्यामुळे केवळ शिवसेनेच्या आमदारांनध्येच अस्वस्थता नसून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस आमदारही नाराज असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.


अर्थसंकल्पात आपल्या पक्षाकडे असलेल्या खात्यांवर अन्याय होतोय अशी शिवसेनेच्या आमदारांची तक्रार असून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार आपली नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती विरष्ठ सूत्रांनी दिलीय.

लय भारी यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराचं पोलीस कोठडीत उपोषण

लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात मागील 4 दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करत पोलीस कोठडीत गांधीगिरी पद्धतीने सुरू केले उपोषण...


तुषार खरात यांच्या वकिलांनी दिली माहिती..


चार दिवसापासून तुषार खरात यांचा अन्न पाण्याचा त्याग


तुषार खरात यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार...


तुषार खरात यांच्या विरोधात दहिवडी,वडूज सह इतर पोलीस ठाण्यात खंडणी ॲट्रॉसिटी विनयभंग बदनामी करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत ओरोस येथे असलेले अनधिकृत बांधकाम पाडले

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत ओरोस येथे असलेले अनधिकृत बांधकाम पाडले.


नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांनी केली कारवाई.


अब्दुल हमीद सबुराती यांच्या मालकीच्या गादी कारखान्यावर कारवाई.


हायवे लगत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे केली कारवाई 


पोकलेन आणि जेसीबीने अनधिकृत बांधकाम पाडले.


कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचर दुकानावर कारवाई.

किरीट सोमय्या आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर...

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर येत असून सायंकाळी पोलिस तसेच महापालिका प्रशासनाची भेट घेऊन मालेगावातील बनावट जन्म दाखला घोटाळ्याची माहिती घेणार आहे..तसेच भाजप मालेगाव शहराध्यक्ष देवा पाटील यांनी आयोजित  केलेल्या होळी उत्सव कार्यक्रमात होणार सहभागी होणार आहे..होळी उत्सवासोबत रोहिंग्या आणि बांगलादेशींचे पुतळेही किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत दहन केले जाणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगाव इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा

कोकणात सुरू झालेल्या शिमगोत्सवासाठी मुंबईतील प्रवासी आपल्या गावी येण्यासाठी सज्ज झालाय मात्र मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. रात्री निघालेला प्रवासी अजूनही या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळ गावी जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकर चाकर मान्याला 3 तासाच्या प्रवासासाठी तब्बल आठ तास मोजावे लागत आहे.त्यामुळे होळीसाठी निघालेला मुंबईकर अजूनही वाहतूक कोंडीत अडकल्याचं पहायला मिळतंय रखडलेला बायपास चा प्रश्न या वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतोय.

टीआयएसएसने विद्यार्थ्याला देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली निलंबित

TISS च्या दलित पीएचडी विद्यार्थ्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली


टीआयएसएसने विद्यार्थ्याला देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली निलंबित केलेलं आहे


रामदास के.एस. यांनी दाखल केलेल्या याचिकेत TISS अधिकारप्राप्त समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी केली होती


सदर समितीने त्याच्या निलंबनाची शिफारस केली होती


पॅनेलनं मनमानी पद्धतीने तपास केल्याचा केला गेला होता याचिकेतून आरोप


रामदास यांनी संस्थेच्या विरोधात कोणतेही राजकीय संबंध वापरण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांचा निलंबन आदेश चुकीचा होता कारण अनेक सहकारी विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता

पाटणच्या केरा पुलावर अज्ञाताची बसवर दगडफेक

पाटण शहरातील केरा नदीवरील पुलावर कराडला निघालेल्या एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली असल्याने बस पुलावरच थांबवण्यात यश आले असून दगडफेक करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. रात्री उशिरा दगडफेकीची घटना घडली, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्याने एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार

- शासकीय मेडिकल रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यात राडा 


- एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्याने एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार केली आहे 


- पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप महाराष्ट्र सुरक्षा बल च्या जवानांनी केला आहे 


- महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान शुभम गायधनी याच्या तक्रारीनुसार पोलीस आयुक्तालयातील अंमलदार मनीष पवार आणि त्याचा मेहुना रवींद्र आढे हे वार्ड क्रमांक 47 च्या मागील बाजूस दारू पीत जोरात लाऊड स्पीकर वाजवत होते 


- वाकी टॉकी वरून माहिती मिळाल्यावर गायधनी तेथे पोहोचला 


- मनीष आणि रवीने गायधनीला शिवीगाळ केली आणि लाकडी डॉक्टरने प्रहार करत जखमी केले तसेच इतर जवानांसोबत धक्काबुक्की केली

विद्यार्थिनींची छेड, आणखी एका मुख्याध्यापकाला अटक

गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड येथील समूह निवासी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने चार विद्यार्थिनींची छेड काढल्या प्रकरणी भामरागड पोलिसांनी मुख्याध्यापकाला बुधवारी अटक केली. मालू नोगो विडपी असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातीलच कुक्कामेटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांची छेड काढल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.  त्याच्यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आणखी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी मालू विडपी याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुण्यातील खराडी भागात हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस 

पुण्यातील खराडी भागात हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस 


टोळक्याकडून एका हॉटेलमध्ये घुसत हॉटेलची तोडफोड 


हॉटेल मालकाला देखील बेदम मारहाण 


काल रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्यातील खराडी भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये घडली घटना 


अचानक आलेल्या तीन ते चार जणांकडून हॉटेलची तोडफोड 


तोडफोडीचे कारण अद्याप अस्पष्ट 


पुणे पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या टोळक्यांचा शोध सुरू

खोक्या भोसलेचा बीड पोलिसांनी घेतला ताबा 

खोक्या भोसलेचा बीड पोलिसांनी घेतला ताबा 


बीड वरून गेलेल्या पोलीस पथकाने खोक्या भोसलेचा घेतला ताबा 


प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून घेतला ताबा 


आज अकरा वाजता प्रयागराज न्यायालयासमोर केले जाणार हजर 


आजच खोक्या भोसलेला बीड साठी आणले जाणार 


मुंबई किंवा छत्रपती संभाजी नगर विमानतळावर आणले जाणार खोक्या भोसलेला 


दिल्लीवरून छत्रपती संभाजी नगर विमानतळावरही आणण्याची शक्यता 


आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसले बीड जिल्ह्यात होणार दाखल

शिक्षा माफीसाठी अबू सालेमची  हायकोर्टात याचिका

शिक्षा माफीसाठी अबू सालेमची  हायकोर्टात याचिका


राज्य सरकारला सालेमच्या याचिकेवर 26 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश


साल 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमने आपली उर्वरीत शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे


न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत


गँगस्टर अबू सालेम याला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे

जीर्ण इमारततीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन गिरवतात शिक्षणाचे धडे

परंडा तालुक्यातील सिरसाव येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पहिली ते चौथीच्या वर्गात 96 विद्यार्थी शिक्षण घेतात. वर्गांच्या खोल्याला तडे गेले आहेत. त्यामुळे अक्षरशः विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. इमारतीच्या छताचे डफले पडलेल्या अनेक घटना समोर येऊनही जिल्हा परिषद प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे. इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांच्या छापेमारीत १९ लाखांच्या दारूसाठ्यासह हातभट्टी उध्वस्त

भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या तिरावरील संगम आणि तिड्डी गावाच्या सीमेतील बेटावरील मोहफुलाचा दारू अड्डा जवाहरनगर पोलिसांनी उध्वस्त केला. वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातून बोटीच्या सहाय्यानं चित्तथरारक प्रवास करीत जवाहरनगर पोलिसांनी बेटावरील १८ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मोहफूल दारू बनविण्याचं साहित्य जप्त करीत ते नदीपात्रात फेकून हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. याप्रकरणी फरार असलेल्या ५ दारूअड्डा चालकांविरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळीच्या सणात मोहफुल दारूची विक्री करण्याचा बेत जवाहरनगर पोलिसांनी हाणून पडल्यानं दारू अड्डा चालकांचे धाबे दणाणले आहे.

धाराशिव जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू

धाराशिव  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १२ मार्च २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. धार्मिक सण,उत्सव,जत्रा तसेच विविध पक्ष,संघटनांच्या आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश लागू करण्यात आला आहे.

दुचाकीच्या डीक्कीतून लांबविले 50 हजार रुपये

नाशिकच्या सटाण्यातील मर्चंट बँक सटाणा नजीकच्या वर्दळीच्या ठिकाणावरून दुचाकीच्या डीक्कीत ठेवलेले पन्नास हजार रुपये मोटार सायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने लांबविल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे..बाभूळणे येथील देविदास मोरे यांनी आपल्या वेतनाची रक्कम स्टेट बँकेतून काढून दुचाकीच्या डीक्कीत ठेवली होती.

प्रेमसंबंधांच्या विरोधामुळे महिलेची प्रियकरासह आत्महत्या..

प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर श्री.शनिदेव मंदिराजवळ घडली.या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी होळी-धूलिवंदन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

चंद्रपूर : आगामी होळी-धूलिवंदन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम... ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे राहणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांनी केली कारवाई, अशा आस्थापनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पोलिसांना मिळाल्या होत्या तक्रारी, विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका बारमध्ये किरकोळ वादातून पोलीस शिपायाची झाली होती हत्या, त्यामुळे धार्मिक सणांमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सुरू केली प्रतिबंधात्मक उपाययोजना

नागपूरमध्ये होणार अपंगाचे सर्वेक्षण 

अपंगांचा एकत्रित डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक अपंग व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होत असल्याने महापालिका लवकरच शहरातील अपंगांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. सर्वेक्षणामुळे पुढील काळात अपंगांच्या उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित करण्यास मदत  होईल

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आज होलिका दहन असून देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल, महिषासुर आणि संकासुराच्या खेळानं रंगत वाढली आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार आहेत. बीडमधील अमानुष मारहाणप्रकरणी खोक्याला अटक करण्यात आली. तर पुण्यातील स्वारगेट बलात्कारप्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता गाडेवर आणखी तीन कलमांची वाढ देखील करण्यात आली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.