Maharashtra Breaking Today LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 12th August 2024 Marathi News LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Aug 2024 08:48 AM
Pune Zika Virus : झिकाची रुग्णसंख्येत वाढ सुरुच, शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 75 वर 

Pune Zika Virus : झिकाची रुग्णसंख्येत वाढ सुरुच


शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 75 वर 


आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू 


शहरातील 75 रुग्णांपैकी 30 गर्भवती; झिकाचा बाळाला संसर्ग नाही


30  गर्भवती महिलांपैकी एकाही महिलेच्या बाळाला किंवा गर्भाला संसर्ग झाला नाही त्यामुळे काही प्रमाणात दिलासा आहे.


डहाणूकर कॉलनीत झिकाचे सर्वाधिक रुग्ण

Yavatmal Crime : सोयाबीनवर उंट अळी, ऍलो मोझाकचा प्रादुर्भाव

Yavatmal Crime : 15 दिवसापासून पाऊस सुरू होता. पावसानं उघाड देताच  यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये  सोयाबीन पिकांवर पिवळा व्हायरस आणि पांढरी माशी, उंट अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक  शेतकऱ्यांची सोयाबीन पीक धोक्यात आहे. पिकांची वाढ झाली तरी उत्पादक क्षमता कमी झाली आहे. तीन महिन्यांच्या नगदी पिकातून शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर मोठ्याप्रमाणात पिवळा व्हायरस आल्याने संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहे. 


 
Ahmednagar News : भाजप निष्ठावंतांना संधी देत का? हे पाहायचंय : पाचपुते


Ahmednagar News :  लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेकांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली असून आता सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत.

 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आहेत. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे असून भाजपमधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का? की ठिकाणी खांदेपालट होणार याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागून आहे.

 

श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पाठोपात आता भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदार संघात जनसंपर्क करत आहेत. त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे "फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार" अशा आशयाचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले आहेत त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

 

सुवर्णा पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती. मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. मात्र यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते यांनी केला आहे. त्यातच गेल्यावेळी बाहेरच्या पक्षातून प्रवेश झाले पक्षाने आपल्याला थांबायला सांगितले मात्र जे मुळ भाजपमधील आहेत त्यांच्यात नाराजी पाहायला मिळाली आता पक्ष निष्ठावंतांना संधी देणार का हे पाहायचे आहे असं पाचपुते म्हणाल्या. बाहेरून पक्षात आलेल्यांना निष्ठावंतांना नेहमीच डावलले असंही पाचपुते म्हणाल्या.


Maharashtra News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ, आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर

Maharashtra News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ


आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर


अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर


गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी वाढवली अजित पवारांची सुरक्षा
 
ताफ्यातील रुग्णवाहिका आणि बोनेट उघडून चेकिंग करून पोलिसांनी केली खात्री

Yavatmal News : पाण्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
Yavatmal News : धबधबा पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विध्यार्थीचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत त्याचे तीन मित्र बचावले़ ही गंभीर घटना यवतमाळच्या किटा कापरा परिसरातील कापरा शिवारात घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. अर्णव उर्फ श्याम सुनिल जोशी (16) रा. प्रगती सोसायटी, महादेवनगर वडगाव असे डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. पार्थ योगेश भांदककर, ऋषीकेश मनोज गढीकर आणि मंदार बोरकर, सर्व रा. प्रगती सोसायटी, महादेवनगर वडगाव अशी या घटनेत सुदैवाने जिव बचावलेल्या मित्रांची नावे आहेत. हे सर्वजण रविवारी सुट्टी असल्याने धबधबा पाहण्यासाठी गेले होते दरम्यान ही घटना घडली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 12th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. आज अजित पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर, दोन्ही जिल्ह्यात जनसन्मान यात्रा आयोजित.


2. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात, या यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे राहणार उपस्थित.


3. भाजपच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपसंदर्भात बैठकीत चर्चा,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आशीष शेलार,रावसाहेब दानवेंसह अनेक नेते उपस्थित


4. साताऱ्यात मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील  कोविड घोटाळा प्रकरणात जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल,या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले


5.बारामतीत जयंत पाटील,अमोल कोल्हेंकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत,'युगेंद्र पवारांना साथ देऊन आपण नवं नेतृत्व देऊ पाहत आहात',कार्यकर्त्यांना संबोधताना जयंत पाटलांचं वक्तव्य 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.