Maharashtra Breaking News Live Updates: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार
Maharashtra Breaking News 11 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
परभणीत रस्त्यांवर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय फोडले
काही आंदोलन महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आणि या महिलांनी काचा दरवाजे टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे
अर्ध्या तासापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि इतर आंदोलकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं केलं होतं आवाहन
वनविभागाने 4 लक्ष रुपयाचा सागवान केला जप्त....
सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात होत आहे... त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा-2 ... या चित्रपटांमध्ये चंदनाची तस्करी करत असल्याचे दाखविले आहे. अगदी तशाच पद्धतीने मध्य प्रदेश राज्यातून उच्च प्रतीच्या सागवनाची तस्करी करुन सागवान साठवून ठेवणाऱ्यावर गोंदिया वनविभागाने कारवाई केलेली आहे.. गोंदिया वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना मध्यप्रदेशातील जंगलातून सागवान तोडून त्याचा अवैध साठा गोंदियातील मुंडीपार येथे असलेल्या रांदल गोदामात असल्याची माहिती मिळाली. वनविभागाच्या पथकाने छापा टाकून चार घनमीटर (140 घनफूट) लाकूड जप्त केले. त्याची अंदाजे किंमत 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी गोदाम चालक चिराग पटेल याला वनविभागाकडे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे... पुढील तपास गोंदिया वनविभाग कडून सुरू आहे...
जिल्हाधियाक्र्यानी काढले जमाबंदीचे आदेश
५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
आज दुपारी १ वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार
इंटरनेट, ध्वनी क्षेपक, टेलिफोन, एसटीडी, झेरॉक्स केंद्र, फैक्स केंद्रही बंद ठेवण्याचे आदेश
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे.
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आणखी एक आरोपीला केली अटक
गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
प्रतीक घुले याला रांजणगाव मधून केले अटक..
एकूण आठ आरोपी पैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात..
उर्वरित फरार आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना
सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधिशाला अटक
जिल्ह व सत्र न्यायाधिश धनंजय निकम यांच्या सह तिघांना अटक
पाच लाखाच्या लाच प्रकरणात न्यायाधिशासह तीघांना अटक
फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखाची मागणी
न्यायालयाच्या आवारातच घडामोडी
साताऱ्यातील एका हाॕटेलमध्ये सापळा
मध्यस्तीं नंतर न्यायाधिशांना आटक
सांगली- तासगाव मार्गावरील कुमठे फाट्याजवळ वडाप चालकाने ओव्हरेटकच्या नादात दुचाकींस्वाराला उडवले
दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
दोन लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू, एकजण जखमी
तासगावहुन सांगलीकडे वडाप येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवले
परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंद करण्यात आले होते या बंदला हिंसक वळण लागले.आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलीये पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आता परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आला असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून "वैयक्तिक" कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने च हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातून च केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी ५ पैकी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केलीय. या संपूर्ण घटनेच्या बाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस शहरात तैनात
परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला हिंसक वळून लागलेल आहे मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी बंद दुकानावर दगडफेक केलीये तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आलीय काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचा दिसून येते पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल अकरावीत शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्वच आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करावं या मागणी साठी हजारो विद्यार्थी आणि अंबड शहरातील नागरिक रस्त्यावर उतरलीत, शहरातील चक्री चौकातून हा मोर्चा सध्या तहसील कार्यालयावरती धडकला आहे.. दरम्यान मयत भाग्यश्रीच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये अटक असलेल्या आरोपीं सोबत इतर आरोपी असून हे सामूहिक रॅकेट असल्याचा आरोप करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत मुलीच्या आईने केली आहे..
जागतिक पातळीवर सीरिया आणि इजरायलमध्ये सुरू झालेले युद्ध ,तसेच चीनने मोठ्या प्रमाणात सुरू केलेली सोने खरेदी ,याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर अनेक गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळविला असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी गेल्या चोवीस तासात महाराष्टाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये ज्वारीला कमी भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी ज्वारीला 5000 भाव होता मात्र यावेळेस 1800 रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने शेतकऱ्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे या भावामध्ये मजुरी देखील निघत नाही त्यामुळे भाव वाढवून मिळावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. गेल्या वर्षी 5 हजार रुपये इतका होता भाव यंदा केवळ 1800 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा आहे.
परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर आज या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. तर आंबेडकर प्रेमी जनतेकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे परभणी शहरातील खानापूर फाटा,पाथरी रस्ता,जिंतूर रस्ता आदी ठिकाणी टायर जाळून रस्ता रोकोही करण्यात आलाय.विटंबना करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले त्याची नार्को टेस्ट करून त्याच्या मागे नेमक कोण आहे याचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलीय.
राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या विज महाग मिळत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ - ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार
मंत्री पदाचा तीढा सोडविण्यासाठी ही दिल्ली वारी असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
हिवाळी अधिवेशना आधी ही भेट होत असल्याने अधिवेशनापूर्वीच मंत्री मंडळ विस्तार होणार का याकडे आता लक्ष असेल
अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह करत तिच्यावर अत्याचार केल्याने बार्शीत पतीसह आई वडील आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बळजबरी अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मूळचा मध्यप्रदेश येथील असलेल्या आणि सध्या बार्शीत मजुरीचे काम करत असलेल्या एका तरुणाचा विवाह बार्शीतील एका अल्पवयीन मुलीशी करण्यात आला. मुलगी 15 वर्ष 11 महिन्यांची असल्याचे माहिती असताना देखील मुलीच्या आई वडील आणि मुलाच्या आई वडिलांनी हा विवाह केला. या विवाहला मुलीने विरोध केला होता. मात्र त्यानंतर ही 27 एप्रिल 2024 रोजी बळजबरीने विवाह करण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील पतीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पोटदुखीच्या त्रासामुळे तिला बार्शीत खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पती, सासू-सासऱ्यासह आई वडील अशा एकूण पाच जणांच्या विरोधात पांगरी पोलिसात पॉकसो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय.
बुलढाणा फ्लॅश
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील अगदी मोक्याच्या जागी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला रात्री भीषण आग लागली. याआगीत अनेक वर्ग खोल्या जळून खाक झाल्या तर शाळेतील फर्निचर, कपाटे, दप्तर व विद्यार्थ्यांचे बाक जळून खाक झालेत. नांदुरा , खामगाव आणि जळगाव जामोद अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल तरी मात्र आगीच्या कारणांवर आता शंका उपस्थित राहत आहेत. शहराच्या अगदी मोक्याच्या जागी असलेली ही शाळा इंग्रज कालीन असून यावर अनेक दिवसांपासून काही भूमाफियांचा डोळा असल्याने आता आगीच्या करणांबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.
आज मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेली आहे . आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागत असून मुखदर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागत आहे . मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरीच्या वाटेवर हरीनामाचा गजर केला
कोल्हापूरच्या कागल येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नवीन सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा सीमा तपासणी नका सुरू केलाय. हा नाका आधुनिक व संगणकृत सीमा तपासणी नाका असल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अवजड वाहनधारकांची संघटना असलेल्या लॉरी असोसिएशनचा या सीमा तपासणी नाक्याला विरोध असल्यानं पोलीस बंदोबस्तात नाका सुरू करण्यात आला आहे, या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने 12 डिसेंबरनंतर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
भाजप महविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी.
विधानसभेत दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून होणार अधिवेशनात सहभागी
मुंबईतील विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे अनुपस्थित होते मात्र नवीन सरकारच्या नागपूर येथील अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील
15 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे मुंबईतुन नागपुरला विमानाने रवाना होतील
16, 17 डिसेंबर ला कामकाजात सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा नागपूरला अधिवेशनात उद्धव ठाकरे सहभागी होतील
सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी २ जणं ताब्यात
सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी २ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी २ जणं होते
आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला
आत्तापर्यंत या प्रकरणात आता ४ जणं पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सांस्कृतिक ऐल चे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात आज मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळीनी आज सकाळी देवेगिरी निवासस्थानी अजित पवार यांची भेट घेतली
ओंकार भोजने,सविता मालपेकर, मिलिंद दास्ताने,सुनील गोडबोले,निर्माते नितीन धावणे, दिग्दर्शक शिरीष राणे,निर्माते चंद्रकांत विसपुते,अभिनेत्री स्वाती हममघर उपस्थित होते
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्या अजित पवार यांच्याकडे सर्व कलाकारांनी आज मागणी केली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दुपारी दिल्लीत जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेणार
ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता
आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार
अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट
काँग्रेससोबत एकत्र लढण्याची कोणतीही शक्यता नाही - केजरीवाल
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस जागावाटपावर चर्चा करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या
त्यावरून अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राचे आतां होणार आधुनिकरण
कचऱ्याची प्रक्रिया जलद गतीने प्रभाविपणे करण्यावर पालिकेचा भर
यात शहरातील ४६ केंद्राचा समावेश
डंपिंग ग्राउंड वर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे व सुक्या कचऱ्यावर शक्यतो विभागातच प्रक्रिया व्हावी या दृष्टीने मुंबई पालिकेने अनेक विभागात कचरा संकलन केंद्र उभारली जाणार
कचऱ्याची प्रकिया जल्द गतीने प्रभाविपने व्हावी यासाठी केंद्राचे आधुनिकरण केले जाणार
कोकणात फिरायला जाताना आणि समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्यानो सावधान...
समुद्रकिनारी मौज मजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका
मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीजवळच्या भाटये बीचवर एका दाम्पत्याची थरारक सुटका
संपूर्ण घटनेचे थरारक व्हिडिओ आले समोर
अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या दांपत्याची मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी केली सुटका
मच्छीमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये ठरले दाम्पत्यासाठी देवदूत
ड्यूटीवर तैनात असलेल्या वायुसेनेच्या कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या…
नागपूर वायुसेना नगर येथील घटना..
आत्महत्येचे कारण अस्पष्ट…
गिट्टीखदान पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल…
घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडेबाजाराला 14 डिसेंबर दत्त जयंती पासून सुरुवात होणार.....
देशभरातून घोडे दाखल होण्यास सुरुवात आतापर्यंत सातशे घोडे विक्रीसाठी दाखल
देशभरातून घोडे या ठिकाणी विक्रीसाठी येतात
यावर्षी विक्रमी 3000 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी येण्याचा आयोजकांचा अंदाज
चेतक फेस्टिवल आणि घोडेबाजाराची तयारी अंतिम टप्प्यात
सोयाबीनच्या अद्रतेमुळे राज्यभरात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. केंद्र सरकारने 15% पर्यंत आद्रता असेल तरी सोयाबीन खरेदी कराव असं परिपत्रक काढल. महिनाभरापूर्वी परिपत्रक काढूनही अजूनही सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रावर 12% च्या वर आद्रता असेल तर सोयाबीन खरेदी केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यात भर म्हणून ज्या यंत्रावर आद्रता मोजली जाते त्यातही गोंधळ असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आले.
एस टी महामंडळाची आज महत्वाची बैठक..
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले घेणार बैठक..
नियमांची काटेकोर अंबलबजावणी करण्यासंदर्भात बैठकीचा महत्वाचा मुद्दा..
एसटीतील कंत्राटी बस कंपन्यांनाही बैठकित बोलवणं
कुर्ला अपघात प्रकरणानंतर एसटीचे असे अपघात होऊ नयेत यासाठी बैठकीत सूचना केल्या जाण्याची शक्यता सूत्रांची माहिती
पूरस्थिती रोखण्यासाठी आराखडा तयार करा, पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश
पुण्यात निर्माण होणारी पूरस्थितीची कारणे शोधणारा अहवाल तयार केल्यानंतर त्याचा आता अल्पकालीन व दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
पुण्यातील पुराचे खरे कारण शोधण्यासाठी महापालिकेने चार सदस्यीय समिती नेमली होती
या समितीने अहवाल सादर केल्यानंतर आज महापालिकेत याची पहिली बैठक झाली
यावेळी आयुक्तांनी पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामे करण्याची सूचना
भविष्यातील धोका टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले
जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्या जवळ रात्री कार मधून आलेल्या अज्ञात आरोपी कडून ट्रक चालकावर गोळीबार केल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती असून . या घटनेत मुंबई येथील राहणारा मोहम्मद रिजवान नावाचा ट्रक चालक जखमी झालाय,त्याला उपचारासाठी जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलय, या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
सातारा जिल्ह्यात म्हसवड येथे चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फौंडेशन संचलित माण देशी चॅम्पियन्सच्या क्रिडा संकुलनास भारतीय क्रिक्रेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्या सोबत भेट दिली. म्हसवड येथे मेगा सिटीत नव्याने तयार केलेल्या आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर क्रिडा संकुलातील मैदानावर क्रिडा प्रशिक्षणासाठी असलेल्या नवोदित खेळाडूंशी सचिन तेंडुलकर यांनी संवाद साधला. याबरोबरच मुलांसमवेत सचिनने आणि मुलगी सारा हिने रस्सी खेच खेळातही सहभाग घेतला.
बुलढाणा जिल्हा गारठला , तापमान १० अंशापर्यंत खाली , रब्बी पिकांना फायदा.
जळगाव जामोद शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला आग , आगिच कारण संशयाच्या भोवाऱ्यात.
मलकापूर येथील शासकीय सोयाबीन केंद्र गेल्या २० दिवसांपासून बंद. हजारो शेतकरी अडचणीत.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन बनला पांढरा हत्ती , ग्रामीण भागातील औषधी दुकानांची तपासणी अनेक महिन्यांपासून नाहीच.
नाशिक महापालिका हद्दीतील सकाळ सत्राच्या शाळाची घंटा एक तास उशीराने वाजणार
थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिक मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरणार
महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय
मनपाच्या शाळा 7 ऐवजी 8 वाजाता भरणार
तर खाजगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता भरणार
शहारत गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत आहे
लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये यासाठी मनपाने घेतला निर्णय
नंदुरबारमध्ये डिसेंबरमधील पाच वर्षातील निच्चांकी तापमान
सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाव परिसरात दवबिंदू गारठले...
दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर...
दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी ...
रात्री डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर व गवतावर हिमकण साचलेले दिसून आले.
कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील कुर्ला या भागात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडलं आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेनंतर वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पातळीवरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजही या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात थंडी वाढली आहे. पारा घसरल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटताना दिसतेय. राज्याच्या राजकारणातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही रंगल्या आहे. या सर्व घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -