Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे.
देशाच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे.. हे बजेट अर्थव्यवस्थेला चालना देणारा बजेट आहे.. केंद्र सरकार पायाभूत सुविधाना नेहमीच प्राधान्य देत होतं.. त्या संदर्भातील तरतुदी यंदा वाढवल्या आहे, त्यामुळे रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात त्याचा मोठा फायदा होईल... तसेच शेती क्षेत्र आणि शेतकरी आत्मनिर्भर करण्यावर विशेष भर दिला आहे..
आयकर संदर्भात नवीन नियम आणून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.. मध्यम वर्गाचा विचार करून बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केला आहे...
भारत 22 लाख कोटींचा इंधन आयात करतो.. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होतील... जे 150 डॉलर प्रति किलोवॅट प्रती तास होते, ते भविष्यातील 100 डॉलर प्रति किलोवट प्रति तासच्या खाली जाईल आणि त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्स स्वस्त होतील.. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल...
रेल्वेगाड्या,बोगींसाठी ४५ हजार ५३० कोटी
नव्या रेल्वेमार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी
रेल्वेमार्गांच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटी
रेल्वेचे गेज बदलण्यासाठी ४ हजार ५५० कोटी
रेल्वे सेवा,यार्ड आधुनिकीकरण व इतर कामांसाठी ८ हजार ६०१ कोटी
रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी
रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉमसाठी ६ हजार ८०० कोटी
रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणासाठी ६ हजार १५० कोटी
पूल,बोगदे व अन्य बांधकामांसाठी २ हजार १६९ कोटी
भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
रणजितसिंह मोहिते पाटील आज तब्बल तास-दीड तास मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित
एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे
मोदी सरकारच निवडणुकीत नंतरच अंदाजपत्रक आहे. निवडणुकी नंतर पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आर्थिक सुधारणा करता येतात. असं काहीतरी होईल असं आम्हाला अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाहीदेशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने देखील ते मान्य केलं आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहात का? ते याची नेमकी व्याख्या सांगत नाही. देश गरीब आहे परंतु लोकं गरीब आहेत अशी सध्या परिस्थितीत आहे. दरडोई उत्पन्नात आपण १४७ क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होतं मात्र तसं दिसत नाही. आम्हला देश विकसित झालेला आवडेल मात्र केवळ घोषणाबाजी सरकार करत आहे. महत्वाचे धाडसी निर्णय सरकारने घेण गरजेचे होतं मात्र तसं केलं नाही. केवळ बिहार निवडणुका डोळ्या समोर ठेऊन काही घोषणा यांनी केल्या आहेत. महागाई वर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत.
श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना
- कॉमन मॅन्स बजेट आहे
- सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे
- सामान्य वर्गाला दिलासा आहे
- माननीय प्रधानमंत्री मोदींचे आभार व्यक्त करतो
- १० वर्षे तिसऱ्यांदा एनडीए सरकार आलं
- शेतकरी , महिला , युवक यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देणारा अर्थसंकल्प
माझी फार गुंतवणूक नाही, मी लोकांमध्ये गुंतवणूक करतो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री ऑन विरोधक
मागच्या वेळी देखील विरोधकानी आरोप केले होते राज्याला काही दिले नाही
पण मी मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील काय काय राज्याला मिळाले याची आकडेवारी देईन
विमा क्षेत्रात 100 टक्के एफडीआय महत्वाच आहे.विमा क्षेत्रात जो पैसा असेल तो भारतात गुंतवावा लागेल
मागच्या काळात Lic ने मदत केली तशी आता विमा कंपनीला मदत करावी लागेल
कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय .200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत
36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आलीय.कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय
200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत.36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आलीय
जास्त व्याज मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका एवढं मी नवीन तरुणाना सांगतो
जास्त व्याज मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका एवढं मी नवीन तरुणाना सांगतो
मी फार काही गुंतवणूक केली नाही मी लोकांमध्ये गुंतवणूक करतो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिले आहे
12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही
याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे
यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे
अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे.
देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
तेल बियांच्या बाबत देखील निर्णय घेतला
शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे
मासेमारी करणार्यांना फायदा होणार आहे
शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे
स्टार्ट अपसाठी 20 कोटी रुपयाची क्रेडिट लिमिट करण्यात आलीय
पिपीपी प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात आलेली आहे
युवाच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थ संकल्प आहे
सर्व समावेशक अर्थ व्यवस्थे कडे चाललेला हा अर्थ संकल्प आहे
अंबादास दानवे
- बिहार आणि उत्तरप्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे
- त्या ठिकाणी सत्ता यावी यासाठी हे विशेष प्रयत्न आहे
- खरतर महाराष्ट्रातून सर्वात जास्त निधी केंद्राला पाठवला जातो.
- अशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रातून महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायल हवं, मात्र महाराष्ट्रात गद्दार गॅग काहीही करत नाही
- आजच्या बजेटमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पाडलाय
- याची अंमलबजावणी मात्र होत नाही
- मागच्या बजेटमध्ये पंचसूत्रीची घोषणा केली मात्र अंमलबजावणी किती झाली
- जल जीवन मिशन चांगली योजना आहे
- शेतकर्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची कर्जाची मर्यादा वाढवली आहे. मात्र धान्याला भाव नाही
- आजच्या बजेट घोषणेचा औषधांवर परिणाम दिसतोय
मध्यमवर्गावर विशेष लक्ष केंद्रित करून वैयक्तिक उत्पन्न कर सुधारणा
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपात मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली
पंतप्रधान-स्वनिधी योजनेचा फायदा ६८ लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना झाला आहे. ही योजना बँकेकडून कर्ज सुविधा आणि ३०,००० रुपयांच्या मर्यादेसह UPI लिंक्ड क्रेडिट कार्ड आणि क्षमता बांधणी कार्यक्रमासह नवीन स्वरूपात सुरू केली जाईल
समरजीत घाटगे यांनी कागल मधील शासकीय जमिनी बेकादेशीर रित्या बळकावल्या
शहरातील शाहू हॉल सह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजीत घाटगे यांनी नावावर करून घेतल्याचा मुश्रीफ यांचा गंभीर आरोप
शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांचा समरजित घाटगे यांच्यावर हल्लाबोल
संबंधित जमिनी ताबडतोब परत करा अन्यथा जन आंदोलन उभारू
हसन मुश्रीफ यांचा इशारा
संपत्तीचा एवढा हव्यास करू नका,जनतेने योग्य ती जागा तुम्हाला दाखवली आहे
जाहीर कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल
युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता: युरियाचा पुरवठा आणखी वाढवण्यासाठी आसाममध्ये वार्षिक १२.७ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारला जाणार
एमएसएमईसाठी नवीन वर्गीकरण नियम, एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट वाढवणार, वर्गीकरणासाठी उलाढाल मर्यादा दुप्पट करणार
स्टार्टअप्ससाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद
पहिल्यांदा स्टार्टअप उभारणाऱ्या एससी/एसटी महिलांना कर्ज स्वरुपात मदत केली जाणार
२ कोटी रुपयांची महिलांना स्टार्टसाठी मदत केली जाणार
भारताला खेळण्यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवणार, त्यासाठी देखील योजना
नाॅन लेदर फुटवेअर उत्पादकांना देखील मदत करणार
कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार
आयआयटीच्या क्षमतेत विस्तार करणार
मेडिकल काॅलजेसमध्ये पुढील वर्षात १० हजार अतिरिक्त जागा तर पुढील ५ वर्षात ७५ हजार जागा उपलब्ध होणार
शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार
एआय उत्कृष्टता केंद्रासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
लघु आणि मध्यम उद्योगांना मदत
निर्यातीला प्रोत्साहन
कृषी विकास
ग्रामीण भागातील संपन्नता
उत्पादकता आणि वित्तीय समावेशन
गरीब
युवा
शेतकरी
महिला
करप्रणाली
ऊर्जा क्षेत्र आणि नगरविकास
डाळी आणि खाद्यतेलात स्वयंपूर्णता: तूर, अरहर आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी ६ वर्षांचे अभियान
भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी, त्यांचा कार्यक्षम पुरवठा करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल
मकाना बोर्डची बिहारमध्ये स्थापना करणार
बोर्डाकडून मकाना उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार
अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन
कापूस उत्पादकतेसाठी ५ वर्षांचे अभियान जाहीर
किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठा निर्णय… कर्जाची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवली
- प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणाऱ्या वन मजुर राजेंद्र साळुंखेच उपचारा दरम्यान मृत्यू
- वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करण्याचा दिला होता इशारा
- वनपाल सागर पाटील यांच्याकडून त्रास दिली जात असल्याची होती तक्रार
- सागर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल..
- इतर दोषींवर देखील कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी
दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा
- वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ साळुंखे यांनी आत्मदहन केले होते आत्मदहन
- आत्मदहन वेळी 80 टक्के पेक्षा जास्त भाजपल्याने प्रकृती गंभीर होती अखेर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला..
बड्या अर्थव्यवस्थांपैकी भारताची अर्थव्यवस्था सर्वात तेजीत
गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर
या अर्थसंकल्पात विकासासाठी १० व्यापक उपाययोजनांचा समावेश
शेती, एमएसएमई, निर्यात, गुंतवणूक ही सुधारणांची चार इंजिन आहेत
पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राज्यांसोबत चालवली जाणार
१०० जिल्ह्यांत ही योजना राबवणार, सस्टेनेबल ॲग्रीकल्चरवर भर देणार
१.७ कोटी शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ होणार
आत्मनिर्भर इन एडिबल आॅईल सीड्स साठी केंद्र सरकार प्रयत्न करणार
जालना जिल्हा नियोजन समितीची आज बैठक..
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बैठक होणार आहे..
थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ३१ जानेवारीपासून म्हणजे कालपासून सुरू झाले. काल सांसदेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर उपराष्ट्रपती श्री जगदीपजी धनकड यांच्यासोबत खासदार सौ सुनेत्रा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी इतरही राजसभा खासदार उपस्थित होते.
- आता अपेक्षा काय असणार...
- सर्वसाधारणपणे शेतकरी, कर्मचारी, गोरगरीब त्यांच्या कल्याणाचे हे बजेट असलं पाहिजे...
- सारखी जी टीका होते...
- श्रीमंत अधिक श्रीमंत होत असतो तर गरीब अधिक गरीब होतो..
- थांबण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली त्याला वेग देण्याची आवश्यकता...
- आपल्याला पाच ट्रिलियनचे उद्दिष्ट गाठायचा असेल...
- काही वर्षांमध्ये आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून घोषित करायचा असेल आपला विकासदर आणखीन वाढवावा लागेल...
- तेवढ्यावरच थांबता कामा नये...
- विकासदर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे...
- त्याची अपेक्षा आहे बजेट मधून आहे..
उद्योगपतीना १३ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात अली आता शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. यासोबतच विविध खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे गरजेचे आहे. मागील काळात ही सबसिडी कमी करण्यात आली आहे. यासोबतच जीएसटीच्या जाचातून विविध शेती संदर्भातील साधने आणि संसाधने यांना वगळल पाहिजे ही आमची मागणी आहे असं डॉ. अजित नवले, किसान सभा म्हणाले.
राज्याचा एक सामान्य नागरिक म्हणून आजपासून सुरू होणाऱ्या केंद्राच्या बजेटकडून माझ्यासहित एकंदरीत महाराष्ट्रालाच मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये ४० %, इन्कम टॅक्समध्ये ३२%, GST मध्ये २० % वाटा असणाऱ्या महाराष्ट्राला निधी देताना खरंच केंद्र सरकारकडून न्याय मिळतो का? असा प्रश्न आहे.
प्रत्यक्ष कराच्या महाराष्ट्रातून जमा होणाऱ्या १०० रूपयांपैकी महाराष्ट्राला केवळ ७ रुपये परत मिळतात. दुसरीकडं गुजरातला १०० रुपयामागे ३२ रुपये, उत्तर प्रदेशला ३३३ रुपये मिळत असतील तर हा महाराष्ट्रावरील अन्यायच नाही का?
हा अन्याय बजेटमधून दूर करणं गरजेचं असताना केंद्र सरकारने मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न भूमिका घेतलीय. किमान यंदा तरी केंद्र सरकार वास्तववादी भूमिका घेऊन महाराष्ट्राला न्याय देईल, ही अपेक्षा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजून गेले तरी देखील दाढ धुके पसरल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांना आपल्या गाड्या हाकताना सावकाश हाकाव्या लागत आहेत. धुक्यामुळे हवेतील दृश्य मानता कमी झाल्याने काही फूट अंतरावरील दिसत नसल्याने महामार्गावरील वाहन चालकांना आपली वाहने सावकाश हाकावी लागत आहेत. तसेच आंबा, काजू पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे आंबा, काजू वर थ्रीप सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी भांडवली बाजाराचा सावध पवित्रा
सुरुवातीला निर्देशांक खालवल्यानंतर आता बाजार ‘पॉझिटिव्ह’
सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला तर निफ्टी ५४ अंकांनी वर
बॅंक, पीएसयू आणि आयटी क्षेत्रातील समभागात घसरण
रिॲल्टी क्षेत्रातील समभागात वृद्धी
आर्थिक सर्व्हेक्षणात भारताचा जीडीपी पुढील आर्थिक वर्षात ६.३-६.८ टक्के राहण्याचा अंदाज
केंद्र सरकारकडून वित्तीय तूट काहीशी कमी करण्यात देखील यश
-GBS च सावट असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आळंदी मधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली
-गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळत आहे
-इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे आळंदीकर नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचे स्पष्ट
-पिंपरी चिंचवड मधील अवैध्यरित्या चालणाऱ्या कंपन्या ह्या इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडतात आणि नदी प्रदूषित करतात मात्र किरकोळ कारवाई करून संबंधित कंपन्यांना अभय दिले जाते
-गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात GBS चे रुग्ण आढळून येत असताना इंद्रायणी नदी मधील पाणी फेसाळल्याने स्थानिक नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण
मावळमध्ये शाळकरी मुलांचा भररस्त्यात राडा, व्हिडीओ समोर
पुण्याच्या मावळमध्ये शाळकरी मुलांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडलाय. लोणावळ्यानंतर आता कामशेतमध्ये ही विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झालाय. किरकोळ कारणांवरून भररस्त्यात मुलांनी गदारोळ माजवला, काल झालेल्या भांडणांचा व्हिडीओ ही समोर आलाय. दोन महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील एसटी स्टँडवर ही शाळकरी मुलांनी असाच राडा केला होता, शाळकरी मुलांमध्ये वाढणारे हे वाद चिंतेचा विषय बनलाय.
गणेश जयंती निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांनी गजबजलं आहे. लाडक्या दगडूशेठ बाप्पाच दर्शन घेण्यासाठी पहाटे पासून गर्दी करत आहेत. मंदिरावर फुलांनी मुशक साकारण्यात आले आहेत. दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास महागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे ही दरवाढ मीटर पासिंग आधी व्हायला हवी होती, सीएनजी चे दर वाढले आहेत, महागाई जोराने वाढली आहे आणि त्यानंतर टॅक्सी दर वाढले अश्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया टैक्सी चालकांनी दिल्या आहेत.
तो सोनेरी मुकुट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपला केला सुपूर्द..
मुकुटच्या पैशांनी समाजपयोगी कार्यात खर्च करावा अशी दिली सूचना
तो मुकुट किती रुपयांचा आहे याची मला कल्पना नसून पण त्या मुकुटपासून मिळणारे पैशाचे समाजपयोगी कार्यात तो खर्च करावा अशी सूचना बावनकुळे यांनी दिल्याची माहिती भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली...
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष तथा माजीमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत केले होते.
मात्र भाजपाला मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला असल्याने आपण हा सोनेरी मुकुट भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत असे स्पष्ट करून चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी असे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला...
नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील चिखली येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर सागवान तस्करांची दगडफेक केली .. यावेळी पोलीसांनी नियंत्रित बाळाचा वापर केला .. सागवान तस्करिसाठी कुख्यात असलेल्या चिखली गावात कारवाई साठी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी गेले होते. यावेळी ही घटना घडली . दरम्यान या कारवाईत 6 ट्रॅक्टर अवैध सागवान जप्त करण्यात आले...दगडफेक करणाऱ्यावर किनवट पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला ..
केंद्रीय अर्थसंकल्प 2025: बजेटपूर्वी एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला
अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी १ फेब्रुवारीपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. मात्र, ही कपात 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. आता हे सिलिंडर ७ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे नामदेव शास्त्री बाबा यांची भेट घेतली, यानंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रावर परिषद घेतली या पत्रावर परिषद मध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत असं सांगितलं परंतु बीड मधील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यात घराघरात एकच चर्चा चालू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे यासाठी जे मध्यंतरी मोर्चे काढले ते मोर्चामध्ये मी स्वतः सहभाग घेतला होता, अजून पर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांना धमकी येत असल्याचे समजत आहे, बाब अत्यंत गंभीर आहे, परंतु आता आम्ही आंबेडकरवादी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयाबरोबर आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत आज १ फेब्रुवारीपासून बदल होणार आहे, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची वेळ सकाळी 8.45 ते दुपारी 4 अशी होती, ती बदलण्याची मागणी पालकांनी केली होती.
सांगलीच्या आटपाडीतील मासाळवाडी येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडाला. उभा पट्ट्या पद्धतीच्या शर्यतीमध्ये हडपसरच्या नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्या व शिरसवाडीच्या पंकज घाडगे यांच्या रायफल या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत पाच लाखांचं बक्षीस जिंकले आहे.विजेत्या बैलगाडी स्पर्धकांना राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम
शहरात डिसेंबरपाठोपाठ जानेवारीमध्येही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक
पुण्यात यंदा गेल्या दहा वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद
जानेवारी महिन्यात यंदा तापमान 36 अंश सेल्सिअस डिग्रीच्या वर
१० वर्षातला सर्वाधिक उष्णतेचा उच्चांक
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामती शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी अजित पवार आज भेटी देतील तसेच यावेळी अनेक उद्घाटन समारंभांना देखील अजित पवार हजेरी लावणार आहेत. बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भल्या सकाळी सुरू केले आहे.
मालेगाव तालुका पोलीसाना मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार स्विफ्ट कार ( MH 17:CX 3350 ) या वहानामधुन गांजा तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलीसानी ४० गाव चौफुली येथे सापळा रचुन हे वाहन ताब्यात घेत सुमारे ५६ किलो गांजा जप्त केला..बाजारात या गांजाची किंमत ५ लाख ५१ हजार रुपये असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली..या कारवाईत एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
सहा वर्षाच्या मुलाची जीबीएसवर मात; बाहेरच जेवल्याने झाला होता त्रास
गणेश जयंती निमित्त आज पुण्यातील मध्य भागातील वाहतुकीत बदल; छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; पुण्यातील शास्त्री नगर परिसरातील घटना
पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातले तीन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला, भारती विद्यापीठ परिसरातील घटना
पुणे जिल्ह्यातील शाळांचा होणार कायापालट; यावर्षी ३०३ आदर्श शाळा आणि १०८ आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित होणार
अहमदपूर-अहमदनगर महामार्गावरील केज तालुक्यातील चंदन सावरगाव या ठिकाणी दोन कारच्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाला उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी ही माघी गणेश चतुर्थी किंवा विनायक जयंती म्हणून साजरी केली जाते. आजचा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो… माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास महागणार
मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे
नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे.
रिक्षाचे भाडे ११ टक्के आणि टॅक्सीचे भाडे १० टक्के वाढले आहे. कूल कॅबच्या भाड्यात २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
अकोल्यातल्या अकोट शेगाव मार्गावर चारचाकी वाहनाचा अपघात झालाय. अकोट अकोला राज्य महामार्गावरील पाटसूल गावाजवळ मध्यरात्री हा अपघात झाला.. पाटसूल गावाजवळ चुकीच्या ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमूळ हा अपघात झाल्याचे समजते आहे. स्पीड ब्रेकर अतिशय मोठ असल्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलला धडकली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सितारमण यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. तर आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. आज गणेश जयंती देखील आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -