एटीएसच्या अहवालामुळे आता एकनाथ खडसे या प्रकरणातही निर्दोष सुटण्याची चिन्हं आहेत. एटीएस तपास अहवाल सायबर सेलकडे सोपवणार आहे.
यापूर्वी कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचं नाव नाही.
दरम्यान, आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांनी 4 जून रोजी मंत्रिपदाची राजीनामा दिला होता. खडसेंनी त्यांच्याकडील महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली होती.
संबंधित बातम्या
पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील