Maharashtra ATS Arrests Four : महाराष्ट्र एटीएसकडून (ATS) दोन पीएफआय (PFI) कार्यकर्त्यांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने रात्री उशिरा पनवेल येथून दोन पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. केंद्र सरकारने पीएफआय (PFI) म्हणजेट पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) आपल्या संघटनेवर बंदी घातली आहे. मात्र बंदी घातल्यानंतरही पीएफआय आपल्या संघटनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पीआयएफ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पनवेल येथून अटक करण्यात आलेले दोघे पीएफआय संघटनेच्या विस्ताराशी संबंधित आहेत. दोन पीएफआय सदस्यांसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने एकूण चार लोकांना अटक केली असून आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयावर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. या कारवाईत पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. 


महाराष्ट्र एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे


दरम्यान, याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर (PFI) केलेल्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. महाराष्ट्र एटीएसला औरंगाबादमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आलं होतं.






दहशतवादी विरोधी पथकाकडून कारवाईला वेग


गेल्या काही काळापासून दहशतवादी विरोधी पथकाकडून कारवाईला वेग आला आहे. याआधीही महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत पीआयएफ संघटनेशी संबंध असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांनाही अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक भागांत कारवाई केली होती. याशिवाय देशभरात दहशतवादविरोधी कारवाई कठोर करण्यात आली. पीआयएफच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी कारवायांना पैसे पुरवल्याचा आरोप पीएफआय संघटनेवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर एटीएस आणि एनआयएने देशभरात कारवाई केली. तसेच केंद्र सरकारने पीआयएफ संघटनेवर बंदीही घातली. 


केंद्र सरकारकडून PFI संघटनेवर बंदी


देशविरोधात कट रचल्याचा आरोपामुळे पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली. पीएफआय संघटनेवर दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचा आणि दहशतवादी कारवायांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. तपासात पीएफआयबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश पीएफआयच्या रडारवर होते अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय सदस्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी एटीएसने ही माहिती दिली होती.