Saroj Ahire In Session : आजपासून नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरवात झाली असून नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembly) राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. कारण अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची (Legislature) पायरी चढली असून आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले. 

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आल्या आहेत... त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही.. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या.. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत...मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे... तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं आहे..

Continues below advertisement

अडीच महिन्याचा प्रशंसक दिसला विधान भवन परिसरातविधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. 30 सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होता...

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रशंसक हा केवळ अडीच महिन्यांचा असून  माझ्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून  त्याला इथे घेऊन आलेलो आहे, जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलेली आहे. स्वतःला नशीबवान समजेल आणि माझ्या बाळाला पण ती इतक्या पवित्र इमारतीमध्ये त्याचं पहिलं पाऊल म्हणजे घरातून त्याला पहिल्यांदाच बाहेर काढले  आहे. त्यानंतर तो थेट नागपूर समृद्धी महामार्गाने नागपूरला आलेला आहे. आज विधानभवन सारख्या ठिकाणी त्याचबरोबर नागपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये त्याचं पहिलं पाऊल आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे, तो बजावणं आवश्यक आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी आली असून आई म्हणून जे कर्तव्य आहे, ते देखील पूर्ण करायचा असल्याचे मत आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केले आहे.