मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं, त्यानंतर काल(शनिवार)पासून विशेष अधिवशन बोलावण्यात आलं आहे. काल आणि आज (शनिवारी आणि रविवारी) नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पडला. काल शपथविधीवरती महाविकास आघाडीसह विरोधी आमदारांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता. 288पैकी राहिलेल्या विरोधी आमदारांनी आज (ता.8) शपथ घेतली. काल आणि आज 280 आमदारांचा शपथविधी पार पडला, पण 8 आमदार अधिवशनाला आले नाहीत, त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचं कारण समोर आलं आहे. (Maharashtra Assembly special session)
आज 114 पैकी 106 आमदारांनी शपथ घेतली आहे. अद्याप 8 आमदारांचा शपथविधी बाकी आहे, शपथविधी सोहळ्यात 8 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे. उद्या उर्वरित काही आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याउलट काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतील. शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. (Maharashtra Assembly special session)
शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित
आजच्या शपथविधीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. वरूण सरदेसाई आणि मनोज जामसुतकर हे आमदार गैरहजर होते. वरूण सरदेसाई यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे मुंबई बाहेर असल्या कारणाने शपथ घेऊ शकले नाहीत तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly special session)
तर आमदार शेखर निकम यांचा मुलगा ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेतो. त्याच्या कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम आहे. त्यासाठी पालक उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यामुळे निकम हे ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. यापूर्वी मुलाच्या कॉन्व्होकेशनला दोन ते तीन वेळा ते गैरहजर राहिले होते. पण यावेळी मात्र ते आवर्जून उपस्थित आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही.(Maharashtra Assembly special session)
विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुकारले असता सर्व आमदार बाहेर पडले. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी शपथ न घेता कामकाजावर बहिष्कार टाकला होता.