Maharashtra Politics अमरावतीराज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज लढाई असणार्‍या काही मतदारसंघात अमरावतीचा (Amravati) समावेश आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत महायुतीसाठी (Mahayuti) काहीसा डोकेदुखी ठरल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील घटकपक्ष असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापुरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ (Navneet Rana) आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे.


दरम्यान, आता हाच वाद विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण नवनीत राणा यांनी परत एकदा नाव न घेता कॅप्टन अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर त्यांच्या टीकेला अभिजीत अडसुळांनी जोरदार पलटवार करत थेट महायुतीलाही इशारा दिला आहे.  एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही. असे म्हणत महायुतीला अभिजीत अडसुळांनी इशारा दिला आहे.


आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही- नवनीत राणा 


दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही. या मतदारसंघात केवळ कमळचाच उमेदवार निवडून येईल आणि तो अमरावती जिल्ह्याचाच राहील, असा टोला नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना लगावला. आज शिवसेना शिंदे गटाचा मेळावा दर्यापूर मध्ये पार पडला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरसाठी दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांचे नाव न घेता हा टोला लगावला आहे. लोकसभेत नवनीत राणा यांचा प्रचार अडसूळ पिता-पुत्रांनी केला नाही, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता विधानसभेत दर्यापूर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत चांगलंच रान उठणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही- अभिजित अडसूळ


अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे, तरी देखील काही लोक इथे अडचणी निर्माण करत आहेत. त्यांना आम्हाला सांगायचे आहे की, एकदा आम्ही गप्प बसलो, मात्र आता गप्प बसणार नाही. असा थेट इशारा मुख्यमंत्र्‍यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ यांनी महायुतीसह राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षरीत्या दिलाय.


अमितभाई शाहांच्या सांगण्यावरून अमरावती लोकसभेची जागाही भाजपला सोडली आणि आपला घात झाला. आपल्या हातून ही जागा गेली. आम्ही सांगत होतो लोकांचा येथे विरोध आहे, ही जागा निवडून येणार नाही, असेही अभिजीत अडसूळ म्हणाले. आज दर्यापूरात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी अभिजित अडसुळ हे बोलत होते.


हे ही वाचा