Maharashtra Budget : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी राज्यातील रोजगार आणि उद्योगासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30 हजारांपेक्षा अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. याबरोबरच मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 189000 हजार कोटी रूपये गुंतवणूक करून रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी निर्माण करण्यात येतील अशी घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
कोरोनामुळे राज्यातील अनेकांचे रोजगार गेले आहेत.त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पातून उद्योग आणि रोजगारांच्या योजनांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच कौडगाव आणि शिंदाळा (जि.लातूर), साक्री (जि.धुळे), कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. या सर्व प्रकल्पांसह राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी राज्यात 11530 कोटी रुपयांचे पाच प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याबरोबरच ई-वाहन धोरणांतर्गत 2025 पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा दहा टक्के आणि मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्दीष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहानांना चालना देणेयासाठी राज्यभरात सुमारे पाच हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Agriculture Budget Highlights : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
- Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा
- Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी
- Maharashtra Agriculture Budget Highlights : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?