Maharashtra assembly budget session 2021 live updates : सुधीर मुनगुंटीवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग
Maharashtra assembly budget session 2021 live updates : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरु झालं आहे.या अधिवेशनातील महत्वाच्या घडामोडींसाठी फॉलो करा हा लाईव्ह ब्लॉग...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2021 01:44 PM
पार्श्वभूमी
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) 1 मार्चपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर...More
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) 1 मार्चपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. अधिवेशनात पहिल्या दोन दिवसांमध्ये वैधानिक विकास महामंडळं, वीज कनेक्शन तोडणी या मुद्द्यांवरुन देखील विरोधकांनी आवाज उठवला. विरोधकांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवण्याचे आदेश देखील काल दिले आहेत. यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही. Maharashtra Assembly Budget Session | 1 ते 10 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही होणार नाही! वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका अधिवेशनात नेमके किती दिवस कामकाज होणार?- पहिला दिवस (1 मार्च) - राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव- दुसरा, तिसरा दिवस (2 मार्च, 3 मार्च) - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा- चौथा, पाचवा दिवस - (4 मार्च, 5 मार्च) - पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान- सहावा, सातवा दिवस (6 मार्च, 7 मार्च) - शनिवार, रविवारची सुट्टी- आठवा दिवस (8 मार्च) - अर्थसंकल्प सादर होणार- नववा दिवस (9 मार्च) - शासकीय कामकाज- दहावा दिवस (10 मार्च) - अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सुधीर मुनगुंटीवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग*
- हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे अध्यक्षांचे निर्देश
- अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं १५ डिसेंबर २०२० रोजी आश्वासन दिले होते
- सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे
- हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे अध्यक्षांचे निर्देश
- अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं १५ डिसेंबर २०२० रोजी आश्वासन दिले होते
- सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे