पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरु असलेल्या वादानंतर ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या ट्रस्टमार्फत चालवली जाते त्या ट्रस्टचे सचिव दीपक गिरमे यांनी एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये अविनाश पाटील करत असलेले आरोप धादांत खोटे असून हमीद आणि मुक्ता दाभोलकर ट्रस्टच्या कोणत्याही पदावर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दाभोलकर कुटुंबाने ट्रस्टवर कब्जा केलेला नसून उलट समितीच्या सातारमधील कार्यालयासाठी स्वतःची मालमत्ता उपलब्ध करून दिल्याच म्हटलंय. 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी सात कोटी रुपयांच्या ट्रस्टवर कब्जा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलय. अविनाश पाटील वैयक्तिक आकसातून आरोप करण्यात आल्याच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टने कढलेल्या या पत्रकात नमूद करण्यात आलंय


अनिसमध्ये दोन गट
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला हत्या झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र अनिसमधील वाद उफाळून आला. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करु लागला तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत गेला. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वादाला नवं कारण मिळालं.  एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला.  मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलं.  हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्यावर महाराष्ट्र सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप करताना अनिसच्या कामात घराणेशाही सुरु झाल्याचा आरोपही अविनाश पाटील यांनी केलाय.


महत्त्वाच्या बातम्या: