Orange Crop : बदलत्या वातावरणाचा (Climate Change) फटका सध्या सगळ्याच पिकांना बसत असल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच अन्य विविध संकटाचा शेतकरी सामना करत आहेत. अशातच काही शेतकरी योग्य नियोजन करत प्रयोगशील शेती करत आहेत. वाशीम (Washim) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आठ एकर संत्रा पिकातून (Orange Crop) 35 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा.


आतापर्यंत साडेतीन हजार क्रेट संत्रा तोडला 


वाशीम जिल्ह्यातील भूर गावातील गोपाल देवळे या शेतकऱ्याकडे आठ एकर शेती आहे. गोपाल देवळे यांनी सर्वच म्हणजे आठ एकर क्षेत्रावर संत्राबाग फुलवली आहे. यावर्षी या बागेतून त्यांना 35 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या वर्षी याच बागेमधून गोपाल यांना 3 हजार 200 क्रेट संत्र्याची फळे मिळाली होती. तर याकरता एकूण खर्च चार लाख 50 हजार रुपये वजा जाता 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पाच हजार क्रेट संत्रा उत्पादन निघण्याची शक्यता असल्याचे देवळे यांनी सांगितले.


700 रुपये प्रति क्रेट दरानं संत्रा पिकाची विक्री 


700 रुपये प्रति क्रेट दरानं संत्रा पिकाची विक्री झाली आहे. आतापर्यंत साडेतीन हजार क्रेट संत्रा तोडला आहे. राहिलेला माल तोडणे चालू असल्याची माहिती देवळे यांनी दिली. आत्तापर्यंत 22 लाखांचे उत्पन्न मिळालं आहे. राहलेल्या संत्रा पिकातून 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगतिलं. संत्रा पिकाचं उत्पादन घेताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाल्याची माहिती संत्रा उत्पादक शेतकरी गोपाल देवळे यांनी दिली. खतांचा योग्य वापर, फवारणी, छाटणी आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्याचे देवळे यांनी सांगितले. 


Climate Change : हवामान बदलाचा शेती पिकांवर मोठा परिणाम


बदलत्या हवामानाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. याचा मोठा फटका पिकांना बसत आहे. संत्रा बागेवर देखील याचा परिणाम होत आहे. यावर्षी अनेक ठिकाणी संत्रा फळगळती झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आली होती. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी संत्रा बाग काढून टाकण्याचा देखील निर्णय घेतला होता. अशातच वाशीम जिल्ह्यातील भूर गावातील गोपाल देवळे यांनी संत्रा पिकाची यशस्वी शेती केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Orange Farming : संत्रा उद्योगावरील मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह; संत्रा उत्पादक क्षेत्रातील आमदार असमाधानी